छंदाचे व्यवसायात रूपांतर करणारा शिल्पकार


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


वास्तू नुसती भक्कम असून किंवा त्यात काय सोयीसुविधा दिल्या आहेत, असे असून चालत नाही, तर ती दिसायला आकर्षकसुद्धा हवी. भक्कम काम, उत्तम पाया आणि आकर्षक बांधकाम ह्या सर्व गोष्टींचा मेळ साधता आला तरच उत्तमरीत्या समन्वय साधता येऊ शकतो. बांधणारे कोण आहेत?

नावाजलेले अथवा प्रतिष्ठित आहेत याबरोबरच किंबहुना यापेक्षा सोयीसुविधा आणि पर्यावरण यांचा समतोल राखूून त्यांचा एकमेकांशी सलोख्याचा संबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे का, हे जास्त महत्त्वाचे आहे. असेच कार्यशील असणारे; परंतु अत्यंत साधी राहणी आणि साधंसरळ जीवन जगणारे संतोष देवधर ह्यांचा परिचय आपण आज करून घेणार आहोत.

वास्तुस्थापत्याच्या पडद्यामागील कलाकार म्हणजेच संतोष देवधर होय. त्यांचे शिक्षण सिव्हिल इंजीनीयरिंग आणि एबीए बीट्स पिलानीमध्ये झाले आहे. २४ वर्षांमध्ये फिनोलेक्स ते रहेजा अशी वाटचाल करत नंतर हिरानंदानी, त्यांनी – VP (Technology) हे पदसुद्धा भूषविले. तसेच बीएआरसीसारख्या नामांकित कंपन्यांत नोकरी केली. व्यवस्थापनसुद्धा त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्राचे कौशल्य जाणल्यावर स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली.

त्यांची स्वत:ची डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे. मागणी, वेळ, खर्च, कुशलता ह्या चार गोष्टींवर डेव्हलपमेंट अवलंबून असते, असे ते मानतात. नुसते मानत नाहीत तर तसे ते येथे आवर्जून नमूद करतात. नाशिक, काठमांडू, रांची, पोर्ट ब्लेअर, दिल्ली, गुजरात अशा अनेक ठिकाणी त्यांनी हॉटेल्स, टाऊनशिप, इमारती, रिसॉर्ट्स अशा अनेक वास्तूंचे डिझाईन, आरेखन आणि कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट केले आहे.

पुढे ते सांगतात की, आपल्याकडे सांडपाणी व्यवस्थापन आणि जैवविविधता संरक्षण याकडे पुरेसे लक्ष असावे. लँडस्केपिंग म्हणजे इमारतीला निसर्गाशी एकरूप होण्याची संधी देणे. त्या दृष्टीने जैवविविधता हा नैसर्गिक घटक डिझाईनमध्ये वापरला तर? तसेच पाम ट्री लावतात त्यापेक्षा स्थानिक प्रजाती लावण्याकडे कल असला पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. ह्या मुख्य गोष्टींना ते जास्त महत्त्व देतात.

इतके सारे काम करूनही ते पर्यावरणाचा खूप गांभीर्याने विचार करतात. खरंच, ते पर्यावरणप्रेमी आहेत, हे त्यांनी जोपासलेल्या छंदांमधूनही दिसून येते. त्यांच्याकडे विविध कॅमेरे आहेत. त्यातून त्यांनी अनेक छायाचित्रे टिपली आहेत, तर काही पर्यावरणपूरक लघुचित्रपट बनवलेत.

त्यांच्या अनेक लघुचित्रपटांस इकोटॉप फिल्म्स स्लोव्हाकिया, सीएमएस वातावरण, नवी दिल्ली महाराष्ट्र शासन (पर्यावरण विभाग), किर्लोस्कर वसुंधरा, डीएसटी नवी दिल्ली अशा अनेक नामांकनांनी आणि पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी एफ.डी. आय, मुंंबईसाठीदेखील लघुचित्रपट बनविला आहे.

त्याचसोबत त्यांनी आजपर्यंत विविध विषयांवरती लेख लिहिले असून अनेक वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. व्यवसाय आणि छंद यांचा मेळ कसा साधता येतो हे ह्यावरून लक्षात येते. याचबरोबर पर्यावरण व्यवस्थापन विषयांशी संबंधित अनेक दुर्मीळ पुस्तकेही त्यांच्या संग्रही आहेत.

त्यांचे कार्य एवढ्यावरच थांबत नाही तर त्यांचा औरंगाबादला ट्रेनिंग इंस्टिट्यूटमध्ये सहभाग आहे जिथे इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच ते NMIMS मध्येे काही वर्षांपर्यंत एमबीए (टेक) विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचे, तर सध्या SPJIMR येथे Adjunct Faculty म्हणून एफएमबी विभागात बांधकाम क्षेत्राशी संबंधित बिझनेस प्रशिक्षण देतात. तसेच आवश्यकतेनुसार रेमीमध्येही (Real Estate Management Institute) प्रशिक्षण देतात. या सल्लागार सेवेसाठी त्यांचे स्वतःचे बिझनेस मॉडेल खूप वेगळे आहे.

त्याशिवाय तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी चित्रफितीसुद्धा तयार करतात. नुकताच त्यांचा आयटीएमच्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये केस स्टडी ऑफ अप्लाइंग व्हॅल्यू मॅनेजमेंट फॉर अफोर्डेबल हौसिंग प्रोजेक्टमध्येही ग्राहकांचा संतोष आणि डेव्हलपरचा फायदा यांचे यशस्वीरीत्या समीकरण मांडणारा रीसर्च पेपर त्यांनी सादर केला आहे. Affordable housing हा सध्या महत्त्वाचा बांधकाम घटक आहे, त्यामुळे ते वेळेत आणि फायदेशीर कसे पूर्ण करावे याविषयी ऊहापोह करणारा हा संशोधन पेपर आहे.

आतापर्यंत त्यांनी आठ ठिकाणी असलेले इनऑर्बिट मॉल, पवईमध्ये हॉटेल्स, पनवेल तसेच चेन्नईमध्ये टाऊनशिप, काठमांडूतील हॉटेल अशा अनेक वास्तूंची डिझाईन आणि प्रकल्प व्यवस्थापन केले आहे.

शेवटी ते एक मोलाचा संदेश देतात की, नोकरी तर कराच, पण त्यासोबतच छंदही जोपासा. कारण छंदांचे केव्हा व्यवसायात रूपांतर होईल हे सांगता येत नाही. आजवरचा हा सर्व प्रवास त्यांनी घरच्यांच्या साथीनेच केला हेही ते सांगतात आणि त्यांनाही ते तितकेच महत्त्व देतात. अशा व्यक्तिमत्त्वाला खरंच मनापासून सलाम.

संपर्क : संतोष देवधर – ९८२०९३२२४८


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?