स्टार्टअप

दहावीत चार वेळा नापास झालेला संतोष आज कंपनी एमडी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


संतोष नलावडे हा सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील देवळाली या गावातला एक तरुण. घरात अत्यंत गरीबी. आईवडिलांसोबत काबाडकष्ट करण्यासाठी पुण्यात आला. तिथेच शिक्षणाची सुरुवात केली, पण शहरात गरीबी काही जगू देत नव्हती म्हणून आईवडिलांनी पुन्हा गाव गाठलं.

संतोष एका हॉटेलमध्ये पोर्‍या म्हणून कामाला राहिला. पडेल ते काम करायचं, मिळेल ते खायचं आणि शिक्षण घ्यायचं असा प्रवास सुरू झाला.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

दहावीच्या परीक्षेत चार वेळा अपयश आलं. सामान्य कोणी असतं तर इथेच हार मानून आहे त्या परिस्थितीत दिवस काढले असते. पण संतोषने जिद्द सोडली नाही. शालांत परीक्षेतील अपयशाला यशात परिवर्तित करून त्याने पुढे मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा केला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्पादन क्षेत्रात नोकरीला सुरुवात केली. जीवनात प्रगती करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभव घेण्याची गरज संतोषला कळत होती म्हणून त्याने वेगवेगळ्या क्षेत्रांत अनुभव घ्यायला सुरुवात केली. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये विविध राज्यांतील प्लान्टसवर काम केले.

जीवनात यश मिळवायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर स्वतःचा व्यवसाय हवा, उद्योजक व्हायला हवं, ही गोष्ट एव्हाना त्याला कळली होती. वयाच्या ३३व्या वर्षी त्याने उद्योजक होण्याचा संकल्प करून नोकरीला कायमचा रामराम ठोकला. नोकरी सोडली त्यावेळी त्याच्याकडे महिन्याभराचा खर्च चालवायलाही पैसे जवळ नव्हते. मुलाचा पैशांचा गल्ला फोडून पहिल्या महिन्याचं सामान भरलं.

संतोषला शेअर्स आणि गुंतवणुकीचं महत्त्व सुरुवातीपासून माहीत होतं. दहा वर्ष नोकरी करताना त्याने म्युच्युअल फंडात जी रक्कम जमा केली होती तिचा त्याच्या व्यवसायाच्या भांडवलासाठी उपयोग झाला. ती रक्कम आणि भागीदारांची गुंतवणूक धरून पाच लाखांचं भांडवल गोळा झालं. संतोष आणि त्याची टीम म्हणजे प्रेमराज कर्पे, परेश कमलाकर, सुशील नलावडे यांनी एफएमसीजी मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत सगळ्याची यंत्रणा उभी केली. टॉयलेट क्लिनर आणि डिशवॉश लिक्विड अशा दोन प्रॉडक्ट्सपासून व्यवसायाची सुरुवात केली. ट्रेडमार्क रजिस्टर केला आणि बाजारात ‘संप्रेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ ही नवी कंपनी जन्माला आली. रॉयल या ब्रॅण्ड नावाने ते आपली प्रॉडक्ट्स बाजारात आणत आहेत.

ग्रामीण भागात उत्पादन आणि शहरी बाजारपेठेत विक्री हे मोठं जिकरीचं काम होतं. यासाठी छोट्या शहरांत आपली वितरण यंत्रणा उभी करायला सुरुवात केली. पाच तालुक्यांत स्वतःची सप्लाय चैन उभी करून कामाला सुरुवात केली.

थेट विक्रेत्यांना जोडून त्यांच्या माध्यमातून रॉयलची प्रॉडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली. वाजवी किंमतीत आणि उत्तम गुणवत्तेची प्रॉडक्ट्स अशी संतोष यांना आपल्या उत्पादनांची ओळख निर्माण करायची आहे आणि हीच ओळख घेऊन शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायचे आहे.

खेडेगावातला एक मुलगा सर्व अडचणींचा सामना करत वयाच्या पस्तीसाव्या वर्षी स्वतःच्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.

संपर्क : संतोष नलावडे – ८८३००६५१४०


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!