“कमीत कमी लढून हारा” हे सांगणारा मार्गदर्शक!

प्रत्येक व्यक्तीस यशस्वी होण्यासाठी एका चांगल्या सुजाण मार्गदर्शक गुरूची गरज असते, जेणेकरून व्यक्तीचे आयुष्यच बदलेल, त्याला दिशा मिळेल आणि त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळेल. ती व्यक्ती स्वत:च्या आयुष्यात यशस्वी होईल.

इतकेच नव्हे तर काही तरी उत्तम कामगिरी आपआपल्या क्षेत्रात करून दाखवेल. अशी दिशा दाखवणारे, प्रबळ बनवणारे, स्वावलंबी बनवणारे आणि जबरदस्त इच्छाशक्ती स्वत:ही बाळगणारे आणि ती देणारे, प्रगतीचा राजमार्ग दाखवणारे यशस्वी मार्गदर्शक आपल्यात आहेत ज्यांच्या बोलण्याने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडू शकते.

ते आपल्यामध्ये एक प्रकाशदायी ज्ञानज्योत तेवत ठेवून आपल्याला स्वत:च्या पायावर उभे करू शकतात. तर असे धडाकेबाज, तरुण, तडफदार व्यक्तिमत्त्व आणि उद्योग, व्यवसायाचे तेजोसूर्य म्हणजे मार्गदर्शक संतोष सकपाळ.

यशस्वी उद्योजक बनण्याची ‘मास्टर-की’ अर्थात संतोष सकपाळ. संतोष सकपाळ ह्यांचे शिक्षण बी.कॉम. ग्रॅज्युएशन झाले असून न्यूरो लँग्वेजचेही त्यांनी धडे गिरविले आहेत. १३ वर्षे श्रमिक सहकारी बँकेत म्हणजेच आत्ताच्या साहेबराव देशमुख को.ऑप बँकेत नोकरी केल्यावर त्यांनी नोकरीस रामराम ठोकला.

इथेच त्यांच्या करीअरला कलाटणी मिळाली. त्यांच्या प्रगतीने वेगळा मार्ग धरायचे ठरविले. तेव्हा २००७ सालापासून ते व्यक्तिमत्त्व विकासपर प्रशिक्षण देऊ लागले. एशियन टेक, एचडीएफसी ह्या नामांकित व इतर अनेक कन्सल्टन्सी कंपन्यांमध्ये तीन तासांपासून ते वर्षभरापर्यंतचे व्यवसायविस्ताराचे प्रशिक्षण शिबिर घेतात ज्यामध्ये व्यवसायाची प्रगती आणि त्याचा चढता आलेख यावर विशेष ते भर देतात.

संतोष सकपाळ ह्यांनी आजवर एक लाख उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे. मुंबईत तर ते प्रशिक्षण देतातच सोबत महाराष्ट्रातही ते शिबिरे घेतात. याशिवाय भारतात अकरा राज्यांमध्ये त्यांनी यशस्वीरीत्या उद्योगासंबंधी शिबिरे घेतली आहेत. त्यांची ही यशस्वी वाटचाल एवढ्यावरच थांबलेली नाही, तर देशाबाहेर सातासमुद्रापार जाऊन थायलंड, दुबई, मस्कत इथेदेखील त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे.

त्यांना विशेषकरून नवोदित तसेच युवा उद्योजकांना मार्गदर्शन करण्यास विशेष आवडते. ते पुढे असे सांगतात की, शालेय शिक्षणासोबत आपल्यातील जे कौशल्य आहे त्याचाही उपयोग केला पाहिजे आणि व्यवसायात उतरले पाहिजे.

आजवर त्यांच्या परखड, स्पष्ट आणि सकारात्मक बोलण्याने अनेक जण प्रेरित झालेत. इतके की, त्यांच्याच काही मित्रांनी नोकरी सोडून व्यवसायाचाच मार्ग धरला, तर काही सीबीएससीच्या मुलांनी परीक्षेत उत्तमरीत्या प्रावीण्य मिळवले आहे.

अनेक उद्योजकांसाठी त्यांनी लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचेही आयोजन केले आहे. एक हजारहून अनेक जणांचे त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेत. त्यावर ते पुढे सांगतात की, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी २०२० पर्यंतची भारताची दूरदृष्टी दाखवलेली जी सक्षम आणि प्रबळ बनवणारी आहे त्याच दृष्टीला डोक्यात ठेवून त्यांना व्यावसायिकांना व उद्योजकांना मार्गदर्शन करायला आवडते.

त्याहीपुढे ते अभिमानाने सांगतात, ‘ट्रांसइंटीरियर’ सारखी कंपनी त्यांनी केलेल्या व्यवसाय मार्गदर्शनामुळे दोन कोटींच्या उलाढालीवरून तब्बल अठरा कोटींच्या घरात व्यवसाय करू लागली. तसेच ‘दीपसमर्थ एंटरप्रायझेस’ला फायनांस मॅनेजमेंट म्हणजेच आर्थिक नियोजनाबद्दलही मार्गदर्शन केले आहे.

त्यांनी आपले कार्य एवढ्यापुरते मर्यादित ठेवले नाहीय, तर ‘कामयाब कदम’ आणि ‘मार्केटिंग की गुरुकिल्ली’ अशी पुस्तकेही लिहिली आहेत, ज्याच्या ५०,००० प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यांना त्यांच्या या आशादायक दमदार कर्तृत्वाबद्दल बेस्ट बिझनेस मॅनेजमेंट, एमएलएम अशा अनेक नामांकित पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.

संतोष सकपाळजी अजून पुढे बरेच कार्य करताहेत. काही विधवा महिला ज्यांच्या पतींचे अकाली निधन झाले आहे त्यांना स्वबळावर उभे राहून पुन्हा जगण्याची जिद्द, उमेद त्यांनी दिलीय आणि परिस्थितीशी लढायला व शिकवून घर चालवायला शिकवले आहे. ‘जानो तो मानो’, ‘उद्योगावर बोलू काही’ असे कार्यक्रम ते करतात त्यातून नवे उद्योजक तयार करून ते घडवत आहेत.

आजवर त्यांनी पन्नासपेक्षा अधिक वक्ते तयार केलेत, तर अनेक नगरसेवकांना भाषण कसे द्यावे हे शिकवले आहे. उद्योजकांसाठी ते अक्षरश: झटतात. सर्व काही उलाढाली करून त्यासाठीच धडपडतात.

अशा ह्या संतोष सकपाळ नावाच्या चालत्याबोलत्या उद्योग विद्यापीठाची स्वत:ची ‘मास्टर-की’ नावाची नवी मुंबई येथे इंस्टिट्यूट असून तिथे त्यांनी चार प्रशिक्षक तयार केले असून बाकी स्टाफसुद्धा तयार केलाय. ते एकच वाक्य आवर्जून सांगतात की, आयुष्यात पळून हार मानू नका; तर कमीत कमी लढा तरी, लढून हारा.

संपर्क : संतोष सकपाळ – ९३२४६७८८६७

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?