संकीर्ण

शनिबदलाचे रिअल इस्टेट होणारे परिणाम

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

येणार्‍या वर्षात शनीने तीन उद्योगांना जास्तीत जास्त प्रभावित केले जाईल.
१. रिअल इस्टेट
२. पर्यटन
३. सुविधा व्यवस्थापन.

प्रत्येक उद्योगासाठी परिणाम भिन्न असेल, त्यामुळे उपायदेखील वेगवेगळे होतील. या लेखात आपण रिअल इस्टेट उद्योग पाहू.

Advertisement

हा एक उद्योग आहे ज्याचा आलेख १९९० पासून २०१० पर्यंत दोन दशकांपेक्षा जास्त काळ चढता राहिला आहे. हा जीडीपी वाढीमागचा एक उद्योग आहे. या काळात शनीचा या उद्योगावर फारसा प्रभाव नसल्याने येथील विकास दर वास्तविकतेपेक्षा दिखावा अधिक असा होता. मोठ्या अपेक्षांमुळे भाव वाढले. यापूर्वी एका चौरस फूटची विक्री १०० रुपये करण्यात आली होती. कोणत्याही अपेक्षित खर्च, उपयोग किंवा वापरामध्ये कोणताही बदल झालेला नसताना, वाढत्या अपेक्षांच्या जोरावर हा उद्योग वाढत गेला.

आपल्याला माहीत आहे की, शनी ताकदींवर मारतो. तो आपल्या शक्तिस्थानाचे आपल्या कमजोरीत रूपांतर करतो. हेच कारण आहे की, शनीला लोक खूप घाबरून असतात. आपण आपल्या शक्तींचा वापर करून कोणत्याही अडचणीवर मात करू शकता, परंतु शनीस सामोरे जाताना आपले सामर्थ्य आपली दुर्बलता बनते. रामायणमधील वाली अजिंक्य होता याचे कारण हेच होते. त्याच्या विरोधात उभा असलेल्या कोणत्याही शत्रूची अर्धी शक्ती त्याला मिळत असे. शनीला जिंकले जाऊ शकत नाही, परंतु संतुष्ट केले जाऊ शकते.

शनीचा एक वृद्ध मनुष्य म्हणून विचार करा, जो हातात काठी घेऊन पाय घासत चालत आहे. ज्या शरीराने त्याला सबंध जगभर फिरवले, ज्या शरीरामुळे त्याने वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला तेच शरीर त्याला आता ओझे बनले आहे. काल जी मालमत्ता त्यांची संपत्ती होती तीच आज त्यांचे लोढणे झाले आहे.

रिअल इस्टेट उद्योगावर शनीचा प्रभाव कसा लागू पडला ते पाहू या.

रिअल इस्टेट क्षेत्र दोन स्रोतांवर वाढले. बाजारातील नगद पैसे आणि लोकांच्या अपेक्षा आणि सरकारी नियंत्रणातील त्रुटी. कच्चा माल म्हणजे जमीन. जमीन मोठ्या प्रमाणावर मर्यादित होती आणि कृत्रिम मागणी जी उच्च होती. बिल्डर विकासक एक योजना जाहीर करायचा, पैसे गोळा करणे सुरू करायचा. त्यानंतर ते पैसे इतर आगामी प्रकल्पांकडे वळवयाचा. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. सध्या सुरू असलेल्या चांगल्या प्रकल्पामुळे पाच अधिक प्रकल्प उभे राहू शकायचे आणि ही मालिका सतत विस्तारात जायची. जशीजशी अधिक जमीन उपलब्ध होईल तशी तारणात वाढ व्हायची आणि धनकोंकडून अधिक पैसा यायचा. यामुळे तर आलेख सतत चढता राहिला.

शनी कशा प्रकारचा परिणाम करतो?

शनी म्हणजे आकुंचन, शनी म्हणजे मंद गती आणि शनी म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती किंवा वास्तव.

पुण्यातील एका सुप्रसिद्ध बिल्डरचे उदाहरण घ्या. ते उद्योगासाठी बँकांकडून तारणासकट कर्ज उचलायचे; परंतु बँक फक्त ७०% पर्यंत कर्ज देते. बाकीचे पैसे उद्योजकाने बाजारातून उभे करणे अपेक्षित आहे. यांनी लोकांकडून मुदत ठेवी घेतल्या. त्यावर त्यांनी चांगले व्याज देऊ केले. यात दोघांचाही फायदा होता. एका बाजूला उद्योगाला विनातारण कर्ज मिळाले जे त्यांना बाजारभावापेक्षा स्वस्त पडले आणि दुसर्‍या बाजूला मुदत ठेवीधारकांना उत्तम परतावा मिळाला. कर्ज मुदत ठेवींच्या स्वरूपात होते. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढली आणि मुदत ठेवीही वाढल्या. या मुदत ठेवी म्हणजे त्यांची ताकद होती.

इतर बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे त्यांनीदेखील स्वत:च्या उद्योगाचा विस्तार केला जो त्यांच्या ताकदीपेक्षा बराच बाहेर होता. नोटाबंदीमुळे बाजारपेठेतील तरलता संपली आणि दुय्यम अर्थव्यवस्थेला धक्का बसला. त्यामुळे बिल्डिंग उद्योग हादरला. कर्ज देणार्‍या बँकांनी काहीही सांगितले नाही, कशाला पैसे मागणार, त्यांच्याकडे तारण होते ना. मात्र ठेवीदार वाट पाहू शकत नव्हते. ते पोलिसांकडे गेले आणि आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
बघा, कसे एक बलस्थान दुर्बलतेमध्ये रूपांतरित झाले!

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

शनीचे परिणाम काय आहेत? याबद्दल काय करता येईल? रिअल इस्टेट उद्योजकाने काय करावे आणि काय पहावे? आपण येथे ज्यांचा विचार करणार आहोत ते सर्वसाधारणपणे उपाय आहेत. हे शनिबदल, व्यवसाय कुंडली आणि उद्योग वैशिष्ट्यांच्या स्वरूपावर आधारित उपाय आहेत, परंतु विशिष्ट उद्योगांसाठी त्यांना लागू पडतील असे उपाय करावे लागतील. एकच औषध सगळ्यांना लागू पडत नाही, रोग तोच असला तरी.

शनीचा अंमल असतो वेळेवर. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे वेळ मिळवणे, खरेदी करणे, मागून घेणे किंवा उसनवार घेणे. उद्योजक कर्जदारांना जाऊन कर्जांची पुनर्रचना करून वेळ मिळवू शकतात. काही कर्जांचे मालकीत रूपांतर केले जाऊ शकते. अल्प मुदत कर्जाचे दीर्घ मुदतीच्या कर्जात रूपांतर केले जाऊ शकते.

शनी इतर व्यावसायिक किंवा परदेशी उद्योग दर्शवितो.तेव्हा परदेशात जाऊन आपला उद्योग विकण्याचा प्रयत्न करणे किंवा विदेशी भागीदार घेणे या पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो. परकीय गुंतवणूकदारांना भारतात उद्योग सुरू करण्यासाठी बराच वेळ लागतो. भागीदारी केल्यामुळे त्यांचा हा वेळ वाचू शकेल. वेळ म्हणजे शनी आपण आधी बघितलेच.

तिसरा उपाय रिअल इस्टेट उद्योगाच्या अंतर्गत कामकाजाशी संबंधित आहे. या उद्योगात प्रदर्शन आणि भव्यता भरपूर आहे, परंतु प्रत्यक्षात ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानामध्ये हा उद्योग किमान दोन दशके मागे आहे. आताच वेळ आहे. त्यांनी प्रतिसाद वेळ कमी करावा, उद्योगाचे संगणकीकरण करावे आणि उद्योग प्रक्रिया आणि नफा पारदर्शक बनवणे जरुरीचे आहे. असे झाले तरच जागतिक बाजारपेठेत आपण तरू शकू.

या लेखात आपण उद्योग ज्योतिषाच्या मूलभूत तत्त्वांचा वापर करून उद्योगांचे विश्‍लेषण केले आहे. यात ही तत्त्वे कशी थेट लागू पडतात ते तुम्हाला दिसलेच असेल.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६ / anand.ghurye@gmail.com

Smart Udyojak Subscription

Help-Desk
%d bloggers like this: