उद्योजक Profiles

महाराष्ट्रातली ही उद्योजिका आज दुबईमध्ये आपले पाय रोवते आहे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मी मूळची नाशिकची. बी.कॉम ग्रॅज्युएशन नशिकला करून एमबीएसाठी पुण्यात आले. २००६ मध्ये एमबीए (systems) पूर्ण केल्यावर पहिल्या नोकरीची सुरुवात मुंबईमध्ये केली आणि मग गोरेगावकर झाले. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये HTML डेव्हलपर / वेबसाइट डेव्हलपर या पदासाठी कामे केली.

माझ्या प्रत्येक नोकरीने मला व्यवसायातील वेगवेगळ्या टप्प्यांची ओळख करून दिली. ग्राहक संवाद, मार्केटिंग, डेव्हलपमेंट या सगळ्याचा मूलभूत अनुभव मला मिळाला. २०१२ साली जेव्हा शेवटची नोकरी सोडली तेव्हा वेबसाइटची कामे मी स्वतंत्र हाताळू शकते एवढा आत्मविश्वास आला होता. त्यातूनच पुढे माझ्या व्यवसायाची म्हणजे ‘Activelink’ ची सुरुवात झाली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

सुरुवातीची कामे कमी मनाधनावर करून दिली. त्या वेळी व्यवसायाशी निगडीत सर्व विभाग मी एकटीनेच सांभाळले. हळूहळू कामे वाढू लागली. Activelink ने तोवर आफ्रिकेतल्या टांझानियासारख्या देशामध्येसुद्धा आपला विस्तार केला होता. या देशातील महाराष्ट्र मंडळाची वेबसाइट तसेच इतर एक-दोन कंपन्यांच्या वेबसाइट्सची कामे करून दिली.

सायली विनायक प्रभुदेसाई

Activelink ने हळूहळू वेबसाइटच्या कामामध्ये सहाय्यक जोडायला सुरू केले. २०१५ आमच्यासाठी सगळ्यात यशस्वी वर्ष ठरले. या एका वर्षात आम्ही जवळपास १६-१७ यशस्वी वेबसाइट्स करून दिल्या.

२०१६ मध्ये मी दुबईला आले. सुरुवातीला ओळखीतून कामे मिळवली. दुबईमधील या क्षेत्रातील मागणी, त्यांच्या ऑनलाइन व्यावसायिक गरजा, मार्केटिंगचे प्रकार हे सगळे जाणून घेण्यासाठी एक वर्ष एका वेबसाइट कंपनीमध्ये पुन्हा नोकरी केली.

२०१९ ला मी दुबईमध्ये स्वतःचे trade license घेतले. माझ्या नावाने माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. डिसेंबर २०१९ मध्ये दुबईच्या स्थानिक रेडिओ चॅनेलवर मला माझ्या व्यवसायाबद्दल बोलण्याची संधी मिळाली. Activelink द्वारे आतापर्यंत शंभरहून अधिक कामे यशस्वीरीत्या पूर्ण करून आम्ही अनेक ग्राहकांशी जोडले गेलो आहोत.

पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये Activelink दहा वर्षे पूर्ण करेल. मला आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मदत केलेल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते.

सायली विनायक प्रभुदेसाई

व्यवसायाचे नाव : Activelink Web Design
Designation: संस्थापक आणि मालक
अनुभव : १०+ वर्षे
सेवा : वेबसाइट designing, वेबसाइट development, ग्राफ़िक्स, डिजिटल मार्केटिंग
पत्ता : दुबई

Contact: +971 565761544
Email : info@activelinkwebdesign.com
Website: activelinkwebdesign.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!