‘सायंटिफिक लोगो’ ही संकल्पना प्रसूत करणारा सुभाष

scientific logo concept developer subhash bothare

सुभाष बोथरे एक असा तरुण उद्योजक ज्याने शून्यातून झेप घेतली आणि दीर्घ पल्ला गाठून आज यशाला गवसणी घालतो आहे. ते एका सामान्य कुटुंबात जन्माला आले, पण त्याची स्वप्न काही असामान्य करण्याची. या त्याच्या स्वप्नांना जोड सतत प्रयोग करण्याची वृत्ती आणि मूळचा कष्टाळू स्वभाव.

याच्याच आधारावर डिजिटल मार्केटिंग आणि लोगो डिझायनिंग, ब्रॅण्डिंग या क्षेत्रात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवाळी अंक आणि स्मार्ट उद्योजक पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतीचा हा गोषवारा….

सुभाष यांना व्यवसायाच बाळकडू मिळालं ते आपल्या वडिलांकडून. वडील हिरे पॉलिश करण्याचा व्यवसाय करायचे आणि संध्याकाळी पार्ट टाइममध्ये कपडे विकायचे. चौथी-पाचवीत असताना सुभाष संध्याकाळी त्यांच्यासोबत जायचे आणि मित्रमंडळीमध्ये कपडे विकायचे. उन्हाळ्यात वडील आंबे विकायचे आणि सुभाष त्यांचा गल्ला सांभाळायचे.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

अकरावी, बारावी नाईट कॉलेजमधून करता करता सुभाष यांनी मोबाईल दुरुस्तीचा कोर्स केला आणि दोन वर्ष मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात पार्ट टाइम नोकरी केली. एका छोट्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानापासून ते सॅमसंग सर्व्हिस सेंटरपर्यंत असा बारा वर्षांचा मोठा काळ त्यांनी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये घालवल्यानंतर स्वत:चं काही निर्माण करण्याच्या ध्यासाने सुभाष डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे वळले.

स्वत: त्यात पारंगत झालेच, पण स्वत:सोबत पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण दिलं. आपल्या क्लाएंटच डिजिटल मार्केटिंग करत असताना एका प्रश्नाने सुभाषला कोड्यात टाकलं की आपण एकाच प्रकारच्या दोन व्यवसायांची मार्केटिंग एकाच पद्धतीने करतोय.

मेथड्ससुद्धा समान वापरतोय तरी त्या दोघांना मिळणार्‍या रिझल्ट्समध्ये कमालीचं अंतर आहे. या कोड्याची उकल करताना तो याच्या मुळाशी पोहोचले ते रंग आणि आकार याच्या शास्त्राकडे. जेव्हा या प्रश्नाचं उत्तर सापडलं तेव्हा सुभाष या करिअरकडे वळले आणि यातून जन्म झाला ‘सायंटिफिक लोगो’चा.

सुभाष बोथरे यांना मी मुलाखतीत पहिलाच प्रश्न हा विचारला की लोगो बनवणं ही एक कला आहे, ते कलाकाराचं काम आहे मग यात विज्ञान कुठे आलं? त्यावर ते म्हणाले, रंग आणि आकार यांचा अभ्यास करून व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणते रंग आणि कोणते आकार त्याला अशाप्रकारे रिझल्ट देतील याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार त्या व्यक्तीचा लोगो तयार करण्याचे शास्त्र म्हणजे ‘सायंटिफिक लोगो’.

Smart Udyojak Podcast Scientific logo concept subhash bothare
सुभाष बोथरे यांच्यासोबत ‘सायंटिफिक लोग’ या संकल्पेनेविषयी झालेला संपूर्ण संवाद पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी ते ग्राफोलॉजीचाही उपयोग करतात. ग्राहकाच्या हस्ताक्षर आणि स्वक्षारीचा अभ्यास करून मग त्याच्या लोगोची स्ट्रेटेजी ठरवली जाते.

लोगोचं एखाद्या व्यवसायात काय महत्त्व असतं, याबद्दल सुभाष म्हणतात, कळत नकळत लोगो तुम्हाला एखाद्या व्यवसायाकडे आकर्षित करतो. याचं कारण की तो रंग आणि आकार यांचा परिणाम आहे. रंग आणि आकार बदलले की व्हायब्रेशन्स बदलले जातात.

एखादा उद्योजक स्वत: किंवा ऑनलाइन टूल्सच्या साहाय्याने जेव्हा एखादा लोगो बनवतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आतमध्ये जे पॅटर्न असतात, तेच त्याच्या लोगोमध्ये उतरतात. त्याच्या आवडीनिवडीचे रंग आणि आकारच त्याच्या लोगोमध्ये उतरतात. पण त्याला हे माहीत नसतं की त्याच्यासाठी चांगलं काय आहे. कोणत्या गोष्टी त्याच्या व्यवसायाला उपयुक्त अशा व्हायब्रेशन्स घेऊन येतील.

अनेक जण आपला लोगो बनवताना ज्योतिष शास्त्राचाही उपयोग करतात. सुभाष यांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, लोगो जर व्यक्तीच्या कुंडलीनुसार बनवला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात जे चढउतार होणार आहेत, त्याचा परिणाम त्याच्या व्यवसायावरसुद्धा होईल म्हणून आम्ही कुंडली लोगो बनवून देत नाही. कुंडली लोगो बनवून तो व्यवसाय व्यक्तीकेंद्रित राहतो.

हातावरच घड्याळ याकडेसुद्धा तुमच्या आयुष्याच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून पाहिलं जाऊ शकतं, हे मला पहिल्यांदा कळलं ते या माणसाला भेटलो तेव्हाच. सुभाष ‘सायंटिफिक लोगो’सोबत व्रिस्ट वॉच रेमेडीसुद्धा देतात. बोथरे यांच्या मते व्रिस्ट वॉच रेमेडी ही पेनकिलरप्रमाणे काम करते.

ती तुमच्या आयुष्यातील मोठ्या समस्यांवर सात दिवसात परिणाम दाखवून देऊ शकते. तुम्ही योग्य प्रकारे योग्य ते घड्याळ वापरलं की तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल हे अतिशय जलद होऊ शकतात.

सुभाष बोथरे यांनी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करायलाही सुरुवात केली आहे. एखाद्या स्टार्टअपला स्केल करण्यासाठी सुभाष त्यांच्या व्यवसायात मार्केटिंगमध्ये २५ ते ५० लाखांची गुंतवणूक करतात.

याशिवाय अनेक व्यवसायांना माणसं निवडण्यात अडचणी येतात. योग्य माणसं भेटत नाहीत, जे भेटतात ते टिकत नाहीत. अशा सगळ्या व्यवसायांसाठी सुभाष न्युमरोग्राफी या शास्त्राच्या आधारावर एक टूल तयार करत आहेत. ज्यामध्ये उमेदवाराची जन्मतारीख आणि स्वाक्षरी यांचं अवलोकन करून तो जॉब प्रोफाइलसाठी उपयुक्त आहे की नाही हे सांगितलं जाईल.

पहिले एक वर्ष ते लोकांना ही सर्व्हिस मोफत देणार आहेत. या एक वर्षांच्या अनुभवावर पुढे एआय आधारित एक प्लॅटफॉर्म तयार करून तिथे ज्याला ही सर्व्हिस हवी असेल तो फक्त महिना ९ हजार रुपये भरून ती घेऊ शकतो.

संध्या कुशवाहा या सुभाष यांच्याको-फाउंडर आहेत. सर्व टीमला व बॅकेंडची कामे त्या सांभाळतात. शिवाय सुभाष यांनी आपल्या व्यवसायात नवीन दृष्टिकोन यावा यासाठी आपल्या तरुण मुलीलाही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून सहभागी करून घेतलं आहे.

तरुण उद्योजकांना सुभाष असा सल्ला देऊ इच्छितात की वेगवेगळे प्रयोग करा. त्यात लवकर अपयश मिळवा, कारण जितक्या लवकर अपयश येईल तेवढ्याच लवकर त्याला यशात परावर्तित करू शकाल. अपयशाची चिंता करू नका.

संपर्क : सुभाष बोथरे – 98923 22200

सुभाष बोथरे यांच्यासोबत ‘सायंटिफिक लोग’ या संकल्पेनेविषयी झालेला संपूर्ण संवाद पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Author

  • हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?