कमी खर्चात सुरू करता येऊ शकेल सिक्युरिटी एजन्सी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


सिक्युरिटी एजन्सी सुरू करणे हा आजघडीचा भारतातील सर्वात जास्त उभरत्या व्यवसायांपैकी एक आहे. मॉल, ऑफिसेस, हाऊसिंग सोसायट्या या सर्वांनाच सिक्यूरिटी गार्ड्सची आवश्यकता असते. गरजेपेक्षा पुरवठा मात्र कमी पडतो. नव्याने व्यवसाय उद्योगात येणाऱ्यांसाठी हा एक चांगला व्यवसाय आहे.

सेवा क्षेत्रात मोडणार्‍या व्यवसायात मनुष्यबळ विकास आणि त्याचे नियोजन हेच प्रमुख काम आहे. सैन्य दलातून आणि अर्धसैन्य दलातून निवृत्त झालेल्या उमेदवारांना नोकरी म्हणून यामध्ये प्राधान्य दिलं जातं. जेणेकरून निवृत्तीनंतर त्यांना रोजगारही मिळतो शिवाय सैन्य दलासाठी त्यांनी घेतलेले प्रशिक्षण आणि अनुभव याचा या नोकरीत पुरेपूर वापर त्यांना करता येतो.

एक छोटेखानी कार्यालय घेऊन तिथून या उद्योगाची सुरुवात करता येऊ शकेल. भांडवल कमी लागत असले तरी कायदेशीर बाबी आणि सरकारीदृष्टीने विविध नोंदण्या करणे याकडे जातीने लक्ष द्या. ‘सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘द एशियन प्रोफेशनल सिक्यूरिटी असोसिएशन’ यासाठी आपल्याला मार्गदर्शन आणि मदत करू शकते.

आवश्यक सामुग्री : १० x १० ची एक खोली. स्वत:चा इंटरनेटसह लॅपटॉप, फोन, प्रिंटर, ऑफिस स्टेशनरी, व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड इ. इ.

परवाना आणि परवानगी : स्थानिक पोलीस प्रशासनाकडून विशेषत: परवानगी काढावी लागते. हत्यारांची आवश्यकता असल्यास त्याप्रकारे तुम्हाला त्यांचे लायसन्स काढावे लागते.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?