1007 annual marketing

मनाचे दोरखंड तोडा…

Elephants powers e1622199680878एकदा एक माणूस एका हत्तीच्या बाजूने जाता जाता अचानक थांबला. अवाक होऊन तो समोरचे दृष्य पाहत होता. त्या एवढ्या बलाढ्या हत्तीच्या पायात साखळदंड नव्हते तर केवळ एक छोटी दोरी त्याच्या पुढच्या पायाला बांधली होती. खरं तरं तो महाकाय प्राणी अशा अवस्थेत कोणतीही नासधूस करू शकला असता, पण तो शांत उभा होता.

नेमकी हीच गोष्ट त्या पाहणार्‍याला खटकली होती आणि तो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या हत्तीचा माहुत तिथेच जवळ होता. तो माणूस त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं, “हा महाकाय प्राणी केवळ एका पायात एवढीशी दोरी बांधलेली असूनही इतका शांत कसा?”

माहुताने उत्तर दिलं, “जेव्हा हा हत्ती लहान होता, तेव्हा त्याच्या पायात हा दोर बांधत असू. त्यावेळी त्याला काबूत ठेवण्यसाठी तो दोर पुरेसा होता. तेव्हा त्याने हा तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला तेव्हा ते शक्य नव्हतं. पुढे जसंजसा तो मोठा होत गेला तसं त्याच्या मनात हे रूजलं की आपण हा दोरखंड तोडू शकतच नाही. त्यामुळे आता तो ते तोडण्याचा प्रयत्नच करीत नाही.

ऐकणार्‍याला हे आश्चर्य वाटलं. एवढा अवाढव्य प्राणी कधीही तो दोरखंड दूर करून स्वत:ला स्वतंत्र करू शकला असता, परंतु त्याच्या मनात हे रूजलं की हे बंधन आपण तोडू शकत नाही, त्यामुळे तो आजही जिथल्या तिथेच खिळला आहे.

अगदी या हत्तीप्रमाणेच आपणसुद्धा आपल्या आयुष्यात आपल्याला काही जमणार नाही, अशी समजूत बाळगून जगत असतो. एकदा अपयश आलं की पुन्हा जमणारच नाही, असं मनाशी ठाम करून घेतो.

WhatsApp Channel Banner

निष्कर्ष : अपयश आपल्याला खूप काही शिकवते, पण त्या अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत राहिले की एक ना एक दिवस यश नक्की मिळते.

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा