Advertisement
उद्योगोपयोगी

‘ई-मंडई’वर विक्रेते व्हा आणि आपली उत्पादने विका!

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

सध्या भारत हा एक विकसनशील देश म्हणून नाही, तर जागतिक बाजारपेठेतील एक बलाढ्य स्पर्धक म्हणून ओळखला जातो. हे जाणून विदेशी उत्पादकांनी आणि गुंतवणूकदारांनी, कमी किंमतीत जास्त उत्पादने उपलब्ध करून अतिशय कौशल्याने भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे पुरेशी संधी न मिळाल्याने भारतीय उद्योजकांनी तयार केलेल्या उत्तम दर्जाच्या वस्तू डावलल्या जातात.

यावर तोडगा म्हणून सुरू झालेली चळवळ म्हणजे ‘युथ फॉर डेमोक्रसी’ या स्वयंसेवी संस्थेने सुरू केलेली ‘स्वदेशी मंडई’. स्वदेशी का विकत घ्यावे इथपासून स्वदेशी कसे/कुठे विकत घ्यावे याचा मार्ग. नवोदित उद्योजकांना सहकार्य करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


त्या धर्तीवर सुरू केलेली ‘ई-मंडई’ ही ऑनलाईन वेबसाईट लघू आणि सूक्ष्म उद्योजक, महिला उद्योजक, बचत गट आणि सामाजिक संस्था यांनी बनवलेल्या उत्पादनांची विक्री करण्यास साहाय्य करते. याद्वारे स्वदेशीचा पुरस्कार केला जातो, भारतीय उद्योजकांना माफक दरात उत्पादने विकण्याची संधी मिळते आणि सभोवतालच्या अनेक लघुद्योगांना नवीन बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जातो.

ग्राहकाला दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या गोष्टी, अगदी घरात बनणार्‍या लसूण चटणीपासून ते बचतगटात बनणार्‍या फराळापर्यंत, हाताने विणलेल्या तोरणांपासून ते कारखान्यात बनवलेल्या विद्युतमाळांपर्यंत, घरात बनणार्‍या चॉकलेट आणि केकपासुन ते परफ्यूम आणि शोभिवंत दागिन्यांपर्यंत सारे काही स्वदेशी ‘ई-मंडई’वर विकले जाते.

या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू / सेवा आपल्या आसपास असणार्‍या स्थानिक उद्योजक, स्वतंत्र महिला उद्योजक, महिला बचत गट आणि सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या स्वयंसेवी संस्था यांनी तयार केलेल्या आहेत.

स्वदेशी ‘ई-मंडई’ हे ऑनलाईन वेबसाईटद्वारे स्थानिक उत्पादनांची विक्री करण्याचे माध्यम तर आहेच, पण ते उद्योजकता विकासाचा एक भागही आहे.

प्रत्येक व्यक्ती, मग ती लहान असो वा मोठी, अनुभवी असो वा नव्या दमाची, प्रबळ इच्छा, हातात कौशल्य आणि त्याचे व्यवसायात रूपांतर होण्याचे स्वप्न मनाशी बाळगणार्‍या प्रत्येक माणसासाठी ही सुवर्णसंधी आहे.

‘ई-मंडई’वर विक्रेता नोंदणीची प्रक्रिया :

  • नोंदणी पत्रक भरा.
  • आपल्या उत्पादनांची माहिती आमच्याकडे द्या किंवा आपल्या खात्याद्वारे उत्पादने अपलोड करा.
  • वेबसाईटच्या आवश्यकतेनुसार आपल्या उत्पादनांचे फोटो आम्हला पाठवा किंवा आपल्या खात्याद्वारे उत्पादन फोटो अपलोड करा.

स्वदेशी ‘ई-मंडई’चे विक्रेता धोरण खालील लिंकवर वाचता येईल.

https://emandai.in/vendor-policy/

खालील लिंकवर जाऊन आपण स्वदेशी ‘ई-मंडई’वर विक्रेता म्हणून नोंदणी करू शकता.

https://emandai.in/vendor-membership/

संपर्क : 9594040068, 8433760752

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: