स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
काही वेळा काही उद्योजकांकडून असं ऐकायला मिळतं की “प्रॉफिट कमावणं हा आपला उद्देश नाही, तर समाजसेवा म्हणून व्यवसाय करतो.”
कोणताही व्यवसाय हा यशस्वी व्हायचा असेल तर त्याचा उद्देश हा नफा कमावणं हाच असायला हवा. नफा कसा आणि किती कमावायचा यावर नक्की चर्चा होऊ शकते. नैतिक मार्गाने, कोणाचीही पिळवणूक न करता चांगला नफा कमावता येऊ शकतो. आपल्या ग्राहकाची, कामगारवर्गाची, पुरवठादारांची, पर्यावरणाची, समाजाची कोणत्याही प्रकारे पिळवणूक न करता योग्य मार्गाने योग्य प्रमाणात नफा कमावणे हे सर्वस्वी नैतिक आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
आपण जो उद्योगधंदा करतो, व्यापार-व्यवसाय करतो त्याने देशाच्या अर्थकारणाला चालना मिळते. आपल्यामुळे आपल्या कामगारवर्गाच्या घरात चुल पेटते. त्यांची कुटुंब अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजा भागवू शकतात. एका उद्योग-व्यवसाय आपल्यासोबत अगणित हातांना मिळकत देतो. अर्थकारणारचं चक्र फिरू लागतं. प्रत्येकाच्या हातात काम आणि प्रत्येक घरात चुल पेटू लागली तर गरिबी ही उरणारच नाही.
सेवा करणे या गोष्टीला विरोध नाही वा त्याबाबतीत ही चर्चा नाही, पण उद्योग आणि सेवा यांची सरमिसळ करणे या बाबतीत हे विवेचन आहे. सेवा आणि उद्योग यांची सांगड घालणारं नारायण मूर्ती हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी ‘इन्फोसिस’ ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी सुरू केली.
‘इंन्फोसिस’चा कंपनी म्हणून असलेला उद्देश हा दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती करणं, सॉफ्टवेअरची विक्री वाढवणं आणि त्यातून नफा वाढवणं हा आहे. पण एका सामान्य माणसाने उभ्या केलेल्या ‘इन्फोसिस’च्या माध्यमातून आज हजारो लोकांची पोटं भरत आहेत.
‘इन्फोसिस’ ही पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे तिच्या प्रगतीतच तिच्या भागधारकांचीही प्रगती आहे. शिवाय ‘इन्फोसिस’ कंपनी ही ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या माध्यमातून लाखो लोकांची प्रत्यक्ष सेवाही करत आहे. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या उद्योगातून सेवाधर्म करायचा असेल तर नक्कीच नारायण मूर्तींना आदर्श म्हणून डोळ्यांसमोर ठेवा.
तुमचाच उद्योगधंदा जर का तेजीत चालला तर तुमच्याच हाताने खर्या अर्थाने देशाची, समाजाची सेवा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती आपल्या उद्योगाची, कंपनीची करा म्हणजे ‘सेवेसाठी उद्योग’ हे तुमचे व्रत सार्थ ठरणार आहे.
– शैलेश राजपूत
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.