शेअर्ड अकाऊंटिंग व्यवसाय

सध्या जीएसटी लागू झाल्यापासून हा व्यवसाय खूप तेजीत आला आहे. निव्वळ एक संगणक व टॅली किंवा तत्सम accounting सॉफ्टवेअर असले की झाले. हो, पण त्यासाठी तुम्हाला accounting व टॅली सॉफ्टवेअर अवगत असणे अनिवार्य आहे. जीएसटी लागू झाल्यापासून प्रत्येक व्यावसायिकाला महिन्याला किंवा तिमाही GST Return भरणे बंधनकारक आहे.

इतका मोठा कामाचा ओघ चार्टर्ड अकाउंटंट पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे free lance accounting सेवा देणार्‍यांना सध्या व्यवसाय भरपूर आहे. हिशेब-खाते लिहिणे, ताळेबंद जुळवणे आदी गोष्टी प्रत्येक उद्योजकाला अनिवार्य असतात. मात्र त्यांची रोजच्या रोज नोंद करणं काही त्याला जमत नाही.

प्रत्येकाला अकाऊंटंट ठेवणेही परवडणारे नसते, शिवाय त्या अकाऊंटंटला रोज काम द्यावे इतके कामही नसते. त्यामुळे सामान्यपणे प्रत्येक उद्योजक आपले अकाऊंटिंगचे काम हे सीएला देतो. सीए स्वत: हे अकाऊंटिंग करत नाही, तर तो त्याच्याकडच्या शिकाऊ मुलांकडून ते करून घेतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अकाऊंटिंग हे फारसे कठीण काम राहिलेले नाही, मात्र ते प्रत्येकाला जमतेच असे नाही.

त्यामुळे तुम्हाला अकाऊंटिंगचे प्रिन्सिपल्स माहीत असतील तर ‘टॅली’ वा तत्सम अकाऊंटिंग सॉफ्टवेअर विकत घेऊन तुम्ही अशा उद्योजकांना शेअर्ड अकाऊंटिंग सेवा देऊ शकता. सीएकडून अकाऊंटिंग करून घेण्यापेक्षा तुमच्याकडून अकाऊंटिंग करून घेणे व्यावसायिकांना स्वस्त पडू शकते, त्यामुळे तुम्हाला चांगली कामे मिळू शकतात.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?