शेअर्स मार्केट आणि डे-टू-डे प्रॉफिट

गुंतवणूकदारांनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्या कंपनीच्या विकासात वाढ झाल्यावर ती कंपनी नफा शेअर करते त्याला शेअर्स बाजार असं म्हटलं जातं. शेअर्स बाजार तीन घटकांवर आधारित आहे.

इक्‍विटी मार्केट : या मार्केटमध्ये आपण विशिष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. इक्‍विटी मार्केटमध्ये काम करण्याची वेळ आहे सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत. वेगवेगळ्या सेक्टरवाइज कंपन्यांची लिस्ट आहे व त्याप्रमाणे गुंतवणूक केली जाते.

कमोडिटी मार्केट : या मार्केटमध्ये आपण नैसर्गिक खनिज संपत्ती असलेल्या वस्तूंवर बोली करतो व गुंतवणूक करतो. कमोडिटी मार्केटमध्ये काम करण्याची वेळ आहे सकाळी १० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत. तसेच या मार्केटमध्ये जागतिक गुंतवणूकदार सहभागी होतात.

करन्सी मार्केट : या मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या देशांतील चलन यावर खरेदी-विक्री करतो. या मार्केटमध्ये काम करण्याची वेळ आहे सकाळी ९.०५ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.

शेअर्स मार्केट हे तीन मार्केटवर एकमेकांशी संलग्‍नित कार्य करते, त्यामुळे आपण जर गुंतवणूकदार असू तर एक तर आपला ब्रोकर ज्ञानी असावा व ज्या क्षेत्रात आपण आपल्या पैशांची गुंतवणूक करणार आहोत त्या क्षेत्रातील घडामोडींविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे साध्य होते की, इक्‍विटीमध्ये गुंतवणूक इतर गुंतवणुकीपेक्षा दहापटीने नफा देऊन जाते.

उदा. आपल्या सगळ्यांना माहीत असलेला आणि भारताचा लाडका सचिन तेंडुलकर याला १९८६ साली क्रिकेट खेळताना पाहण्यात येते व त्यात आपण वेळसुद्धा दिला; पण त्याचबरोबर आपण पाहिलेलं असतं सेन्सेक्स ८०० होतं, पेट्रोलचा भाव १० रुपये होता. सोनं ३१०० रुपये होतं. आज सचिन निवृत्त झाला आहे, तर सेन्सेक्स ३१,००० आहे, पेट्रोल ७२ रुपये, डॉलर ६८, सोने २७,०००.

सेन्सेक्स ८०० रुपयांवरून ३१,००० पर्यंत आलं तरीदेखील शेअर्स बाजार हा जुगार आहे व सट्टा आहे असं अजून समजलं जातं; परंतु अभ्यासपूर्वक गुंतवणुकीच्या माध्यमातून शेअर बाजारात हजाराचे करोडोत रूपांतर करणारे अनेक यशस्वी गुंतवणूकदार आज भारतीय शेअर बाजारात आहेत. योग्य ज्ञान व सातत्य यामुळे यश हे मिळतंच. आज आपण सगळेच कळत नकळत शेअर्स मार्केटमधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. कसं ते पाहू या.

आज आपण घरातील सगळेच झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल पाहतो. गुड मॉर्निंगचे मेसेज चेक करतो वगैरे वगैरे; पण संवाद साधून देणार्‍या मोबाइल कंपन्यांमध्ये कधी गुंतवणूक करावी हा विचार केला? मग कोलगेट, सोप, गॅस, पॉवर रोजच्या रोज वापरतो; पण याच कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे आहेत का? प्रवासासाठी पेट्रोल-डिझेल वापरतो, स्वयंपाकघरासाठी गॅस वापरतो; पण ऑइल सेक्टरच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे का?

अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात आपण नेहमी रोजच्या रोज दैनंदिन जीवनात खर्च करीत असतो, त्याचा वापर करीत असतो; पण त्याच कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करतो का? आज आपल्याला शेअर्स बाजारात यशस्वी व अयशस्वी व्यक्ती भेटतील. चला पाहूयात यात फरक काय ते व त्याच्या विचाराची पडताळणी पाहूयात.

अयशस्वी व्यक्ती :

१) (त्यांचं म्हणणं असं असतं) त्याची गुंतवणूक करण्याची पद्धत मी अमुक XYZ STOCK जर का २०० रुपयांनी खरेदी केला आहे. त्याची किंमत ४०० रुपये होईल तेव्हा ते शेअर्स विकून टाकू. पण एखाद्या स्टॉकची किंमत दुप्पट होण्यासाठी बराच काळ लागतो; पण त्या मधल्या काळात ती कित्येक वेळा तरी वरती जाऊन पुन्हा खाली येते.

२) ज्या वेळेला त्या स्टॉकमध्ये किंमत वाढलेली असते अशा वेळेला म्हणजे high price ला स्टॉक खरेदी करणे म्हणजे चुकीची Entry घेणे.
३) गुंतवणूक रक्कमेपेक्षा जास्त अपेक्षा शेअर्स बाजारमधून करणे.
४) टिप्सवर काम करणे इत्यादी कारणांमुळे अपयशी गुंतवणूकदार नशिबाला दोष देतात.

यशस्वी गुंतवणूकदार :

१) यशस्वी गुंतवणूकदार नेहमी संधीची वाट पाहतो व ती म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केट कोसळते त्या त्या वेळेला योग्य गुंतवणूक करणे, न घाबरता.
२) ज्या ज्या वेळेला मार्केट वर जाईल त्या त्या वेळेला थोडे थोडे शेअर्स विकून टाकणे.
३) गुंतवणूक रक्कमेवर २ ते३ टक्क्यांच्या नफ्यात बाहेर पडणे व दुसर्‍या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे व झालेल्या नफ्यामध्ये म्युच्युअलफंड खरेदी करणे.

अयशस्वी गुंतवणूकदार व यशस्वी गुंतवणूकदार यातला फरक तर जाणून घेतला; पण हे यश मिळवण्यासाठी व अपयश टाळण्यासाठी प्रत्येक शेअर्स गुंतवणूकदाराने खालील काही मुद्द्यांचा अभ्यास एकदा तरी करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपली गुंतवणूक यशस्वी ठरेल व आपण वर्षाला २० टक्के परतावा मिळवू शकू :

 • शेअर्स मार्केट म्हणजे नक्की काय, कोणत्या आधारावर मार्केट चालते, कोणते प्लॅटफॉर्म आहेत.
 • इक्‍विटी, कमोडिटी व करन्सी मार्केट म्हणजे काय? डीमॅट अकाऊन्ट, ट्रेडिंग अकाऊन्ट म्हणजे काय?
 • ब्रोकरच्या माध्यमातून आपले अकाऊन्ट कसे हाताळायचे?
 • गुंतवणुकीचे प्रकार कोणते?
 • लाँग टर्म, शॉर्ट टर्म, मिड टर्म म्हणजे काय?
 • SIP, Mutual Fund, Intraday – future market, option-market म्हणजे काय?
 • Fundamental व technical म्हणजे काय?
 • IPO म्हणजे काय?
 • Bullish Market?
 • Berish Market?
 • Benefit Entry Exit Profit दिवसाला ५०० ते १००० रुपये कमावण्यासाठी काय करावे लागेल?

– पूर्णिमा शिरीषकर
९५९४८२५८०१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?