Advertisement
मुंबईत नोकरी सोडून धुळ्यात ‘शूज लॉन्ड्री’सारख्या अभिनव व्यवसायाला केली सुरुवात
कथा उद्योजकांच्या

मुंबईत नोकरी सोडून धुळ्यात ‘शूज लॉन्ड्री’सारख्या अभिनव व्यवसायाला केली सुरुवात

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

धुळ्यातला एक तरुण Masters of Social Work (M.S.W.) म्हणजेच समाजकार्यात पदवी घेतल्यानंतर मुंबईला नायर रुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला लागला. इथे चार वर्ष नोकरी केल्यावर त्याचं मन काही नोकरीत रमेना. काही तरी स्वत:चं आणि तेही इतरांपेक्षा वेगळं करण्याची उर्मी त्याला शांत बसू देत नव्हती. पण करायचं काय हाही प्रश्न होताच!

त्याने इंटरनेटवर विविध व्यवसायाच्या संधींबाबत शोध घ्यायल सुरुवात केली. त्यात त्याला एक व्यवसाय मिळाला, जो आपल्या देशात बराच नवीन होता. तो व्यवसाय म्हणजे शूज लॉन्ड्री. हो, पायात घालायच्या बुटांची लॉन्ड्री! आतापर्यंत आपल्याला कपड्यांची लॉन्ड्री माहीत होती. धुळ्यातून मुंबईला जाऊन नोकरी करणार्‍या शशांक चिंतामन वाघ याने इंटरनेटवरून हा आगळावेगळा व्यवसाय शोधला आणि आपल्या शहरात म्हणजे धुळ्यात हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आतापर्यंत धुळे शहरात मोठमोठ्या ब्रॅण्डची बरीच शो-रूम्स आली होती. त्यात शूज विकणारी दुकानेही बरीच होती, पण विकल्यानंतर त्या शूजची देशभाल करणारी, काळजी घेणारी अशी शूज लॉन्ड्री एकही नव्हती.

शशांक नोकरी सोडून धुळ्यात येऊन व्यवसाय करणार, ही गोष्ट काही घरच्यांना रूचणारी नव्हती. वडील क्लास-१ अधिकारी, सगळी भावंडं उच्चशिक्षित आणि बड्या पगाराच्या नोकर्‍यांवर, त्यामुळे शशांकचा हा निर्णय हा सगळ्यांनाच धक्कादायक होता. पण शशांक आपल्या निर्णयावर ठाम राहून त्याने १५ सप्टेंबर २०१६ या दिवशी ‘श्रीराम शूज लॉन्ड्री’ या आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

इंटरनेटवरूनच शिकला व्यवसाय

शशांकने ज्याप्रमाणे इंटरनेटवरून हा व्यवसाय शोधलेला तसाच या व्यवसायातील सर्व प्रक्रियाही तो गुगल आणि यूट्युबवर पाहून शिकला. शूज धुवायचे कसे? त्यासाठी कोणती केमिकल्स वापरायची? शूजचे मटेरियल कसे ओळखायचे? शूजची शिलाई कशी करायची? कोणता गम वापरायचा? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास शशांकने इंटरनेटवरून केला. व्यवसाय सुरू करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकानेच्या शशांक वाघच्या स्टार्टअप स्टोरीतून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

पुढे शशांकने व्यवसाय वाढवण्यावर लक्ष्य केंद्रित केले. यात त्याची पत्नी आरती व मित्रमंडळींनी त्याला मोलाचे सहकार्य केले. WhatsApp आणि फेसबुकचा मार्केटिंगसाठी पुरेपूर वापर करून त्याने अख्ख्या धुळे शहराला आपल्या व्यवसायाशी जोडलं. शशांकचं आज महिना २०,००० ते ३०,००० उत्पन्न आहे.

शशांकला आपल्या स्टार्टअपला फक्त धुळ्यापुरतं मर्यादित ठेवायचं नसून महाराष्ट्रभरात याच्या फ्रॅन्चायजी देऊन तो आपला व्यवसाय महाराष्ट्रव्यापी करण्याच्या तयारीत आहे. शिवाय डिजिटल माध्यमांचा वापर करूनही तो व्यवसायाचा विस्तार वाढवण्याच्या योजनेवर काम करतो आहे.

तरुणांना उद्देशून शशांक म्हणतो, स्वत:च्या क्षमता ओळखा, स्वत:च्या एक वेगळा मार्ग तयार करा. मार्केटमध्ये भरपूर संधी उपल्ब्ध आहेत, बर्‍याच सेवांची गरज आहे; त्या सेवा आणि संधींचा शोध घ्या, इंटरनेटचा पुरेपुर वापर करा, जास्तीत जास्त लोकांसमोर आपल्या सेवा-सुविधा पोहचवण्याचा प्रयत्न करा. शिवाय आपल्या सेवा-सुविधांची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. ती दिवसेंदिवस सुधारत गेली पाहिजे. आपले ग्राहक वाढत जातील यावर लक्ष्य केंद्रित करा.

शशांक तरुणांना जो सल्ला देतोय, ते तो स्वत: जगला आहे. नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करणं. धुळ्यासारख्या छोट्या शहरात शूज लॉन्ड्रीसारखा अभिनव व्यवसाय सुरू करून तो मोठा करणं, हे एक शिवधनुष्य आहे. शशांक वाघने हे शिवधनुष्य पेललं आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनीच तो भविष्यात एक यशस्वी उद्योजक होणार आहे.

संपर्क : शशांक वाघ
shashankwagh3007@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!