स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
माझे बालपण नंदुरबार शहरातील. शिक्षण बी. काॅम्. आहे. लहानपणापासूनच एकत्र कुटुंबपद्धतीत वाढल्याने घरातील प्रत्येकाची खाण्याची आवड-निवड माहिती असल्याने बरेच पदार्थ बनवता येत होते. लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाले.
माझे पती एका मोठ्या प्रतिष्ठीत FMCG कंपनीत नोकरी करत होते, परंतु कोरोना काळात त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्यावर “पुढे काय?” असा प्रश्न भेडसावत होता.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
मी माझी ‘सुगरण फुड्स’ची संकल्पना त्यांना सांगितली. त्यांनी त्यावर तात्काळ होकार देऊन पाठिंबा दर्शवला. मला उद्योगाच्या बाबतीत तसा शुन्य अनुभव होता, परंतु माझ्या यजमानांच्या मदतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ‘सुगरण फुड्स’मधील विविध प्रकारच्या चकल्या बाजारात आणल्या आणि त्यास उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
आम्ही आमचे सर्व पदार्थ पुण्यात आणि पुण्याबाहेर सतत पाठवत असतो. अल्पावधीतच ‘सुगरण फुड्स’ ग्राहकांच्या पसंतीस उतरले. सुरुवातीला चकली बनवताना आणि पॅकिंग करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, परंतु अनुभवातुन आम्ही शिकत गेलो.
माझ्या मते व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि परिश्रम तर हवेच सोबत चिकाटीदेखील हवी. संयमाने, धाडसाने सर्व संकटांना सामोरे जाऊनच तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनू शकाल. एक कुशल गृहिणीसोबत एक सुगरण आणि यशस्वी उद्योजक म्हणून माझ्या घरच्यांना माझा नेहमीच अभिमान वाटतो.
प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :
‘सुगरण फुड्स’ची खासियत म्हणजे ‘चकली’. ज्याचे आम्ही सुमारे ७ ते ८ प्रकार बनवतो. त्यात मुख्यतः स्पेशल भाजणी चकली, ज्वारी चकली, गहु चकली, बीट चकली, टोमॅटो चकली, इतरही बरेच प्रकार आहेत. शिवाय आम्ही गव्हाचे (केमिकलविरहित गुळयुक्त) आणि मैद्याचे (साखरयुक्त) शंकरपाळेदेखील बनवतो.
त्यासोबत ‘मठरी’ हा एक अत्यंत रुचकर आणि चविष्ट असा पदार्थदेखील बनवतो. तसेच विविध प्रकारचे प्रि-मिक्सदेखील पुरवतो. सर्व खाद्यपदार्थ आम्ही ऑर्डरनुसार आणि फ्रेश बनवतो. सध्या लॉकडाउनच्या काळात आम्ही बरेच पदार्थ घरपोच दिले असून पुण्याबाहेरूनदेखील त्यांना मागणी आहे.
‘सुगरण फुड्स’ म्हणजे घरच्या चवीला नवीन ओळख देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.
आमची उत्पादने व सेवा :
१. चकली :
गव्हाची चकली, पालक चकली, बीट चकली, कांदा-लसूण मसाला चकली, टोमॅटो चकली, ज्वारीची चकली
२. शंकरपाळे :
गव्हाचे (केमिकल विरहित गुळयुक्त) शंकरपाळे, मैद्याचे (साखरयुक्त) शंकरपाळे, मेथीचे शंकरपाळे, खारे शंकरपाळे
३. खाकरा :
तुपयुक्त (साधे) खाकरे, ओव्याचे खाकरे, जीरा मसाला खाकरे, पावभाजी खाकरे, टोमॅटो खाकरे, पाणीपुरी खाकरे, कोथिंबीर खाकरे, मुगाचे खाकरे, मॅगी खाकरे
४. साधी / मसाला मठरी
५. विविध प्रकारचे प्रीमिकस्न
६. मकीन मुगडाळ
७. नमकीन चनाडाळ
शितल पंडित
कंपनीचे नाव : सुगरण फुड्स
आपला हुद्दा : मॅनेजिंग डायरेक्टर
व्यवसायातील अनुभव : १ वर्ष
विद्यमान जिल्हा : पुणे
व्यवसायाचा पत्ता : पिरॅमिड काउंटी, गट क्र. ९९, बिल्डिंग ए – १, फ्लॅट १३०१, पौड रोड, भुकुम, पुणे – ४१२११५
ई-मेल : sugranfoods7@gmail.com
मोबाइल : 7350360390
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.