Advertisement
उद्योग कथा प्रायोजित

नोकरी ते ‘बिझनेस डॉक्टर’ शिवांगीचा झंझावाती प्रवास

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

जेव्हा मुलांना झोपायचे मन करते, थकवा येतो वा कंटाळा येतो किंवा जास्त आईवडिलांनी प्रश्न विचारले की राग येतो, तिथे सर्व गोष्टीत संवाद साधायला, हसतमुखाने उत्तर द्यायला आणि उलट ‘का?’ असा प्रश्न विचारायला, तिला नेहमीच आवडायचे व उत्तराच्या अपेक्षेने ती घरच्यांकडे मोठ्या आशेने बघायची, तेव्हा तेव्हा आई-वडिलांना तिचे कौतुक व काळजी वाटायची की, ही मोठेपणी कोण होणार? काय करीअर करणार? कारण प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारणे, त्यावर सखोल चर्चा करणे आणि स्वत:च्या प्रश्नांची स्वत: उत्तरे शोधून त्यातून प्रत्येक छोटी छोटी गोष्ट शिकणे ही तिची ख्याती होती.

त्याच प्रकारे प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करणे, न पळता सामोरे जाणे, तसेच जबाबदारी घेणे या सर्वांमुळे ती सामान्य दिसूनही नेहमीच असामान्य राहिली. शाळेत असतानासुद्धा ती न विचार करता, कसलाही लोभ न बाळगता सढळ मनाने मदत करायची आणि सर्व मित्रमैत्रिणींना सोल्यूशन द्यायची आणि वेळ आली तर संकटात मदतही करायची. सर्व लोकांना तिचे नेहमीच कौतुक वाटायचे आणि सर्व नातेवाईकांना ती नेहमीच हवीहवीशी. तिच्या ह्याच लाघवी स्वभावामुळे, काळजी घेण्याच्या वृतीमुळे तसेच प्रेमळ स्वभावामुळे तिच्याबद्दलच्या आशा-अपेक्षा अधिक गडद होत गेल्या.

पुढे प्रश्न होता करीअरचा आणि त्यात यशस्वी होण्याचा; पण ही पुढे कोणते करीअर निवडेल ह्याचा नेम मात्र कोणालाच नव्हता; कारण तिला कॉलेजपासून सर्व माइंड रीडर बोलायचे, कारण कोणाच्याही मनात काय सुरू आहे ह्याचा आढावा तिला फार लवकर यायचा. अशा व्यक्तीचे मन कोण वाचणार? अशाच या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेऊन लहान वयात असामान्य असे नाव कमावलेले आणि उद्योगजगात बिझनेस डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवांगी कमलाकर झरकर.

कै. कमलाकर तु. झरकर आणि श्रीमती पूजा कमलाकर झरकर, ह्यांच्या घरी, तसेच संपूर्ण कुटुंबात, २० ऑक्टोबर १९८१ साली जन्माला आलेले, हे पहिले अपत्य, त्यामुळे अतिशय लाडात आणि प्रेमात बालपण गेले; परंतु ही मुलगी कुशाग्र बुद्धीची, मेहनतीची, नम्र आणि अतिशय भावुक, संवेदनशील होती. गणित आणि विज्ञान ह्या दोन्ही विषयांत, हिला जास्त रुची होती. म्हणून ही एक तर डॉक्टर किंवा इंजिनीयर होणार याबद्दल काही वादच नव्हता.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


हिचे शालेय जीवन वाशी येथील आय.ई.एस.च्या नवी मुंबई स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना इतर मुली फक्त मार्क्सच्या मागे लागायच्या ही मात्र त्यात निपुणता कशी येईल ह्याचा विचार करायची. तिचा एकच सिद्धांत- अभ्यास असा करा जो लाइफ टाइम लक्षात राहील. म्हणून आजही गणित असो वा विज्ञान, इतिहास असो वा भूगोल, कोणतीही भाषा असो, त्यातील महत्त्म भाग ती सांगू शकते, किंबहुना तिच्या अजून लक्षात आहे. नंतर मुलुंड येथील केळकर कॉलेजमधून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले व शाह अँड एकर इंजिनीयरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनियरिंग केले.

इतर मुलींप्रमाणे तिनेही इन्फोसिससारख्या नामांकित कंपनीमध्ये काम केले आणि पुढे एम.बी.ए-आय टी पूर्ण केले; पण असलेल्या नोकरीमध्ये तिला हवे असलेले समाधान मिळत नव्हते. काही तरी जगावेगळे करावे, स्वत:ची ओळख निर्माण व्हावी, ही मनीषा सतत मनात स्फुरत होती, कारण सर्व करतात त्यात काय मजा. आयुष्यात काही तरी करून गेलो आणि नावरूपे उरलो तर जीवन सार्थकी झाले असे तिला नेहमीच वाटायचे. त्याच दरम्यान तिने सुधा मूर्ती ह्यांचे पर्सनल ब्रँडिंगबद्दलचे व्याख्यान ऐकले आणि त्या दिवसापासून, त्यांना ती स्वत:च्या गुरू मानू लागली.

नंतर तो दिवस उजाडला, जेव्हा नोकरी सोडून स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. हा निर्णय घेतला गेला अणि यामध्ये संपूर्ण कुटुंबासोबत सर्वात मोठा मोलाचा वाटा ठरला मेघा पानसरेचा. नंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास सुरू झाला आणि २००६ साली जन्म झाला ‘अझ्युर टेक्नॉलजीस’ ह्या सॉफ्टवेअर कंपनीचा. ह्याच कंपनीचे नामकरण पुढे जाऊन ‘आहाना इन्फोटेक’मध्ये झाले आणि आय टी संदर्भातील सर्व सेवा ही कंपनी देऊ लागली, पण ह्या कंपनीची सेल्फ एज्युकेशनच्या 2-डी एनिमेटेड सीडी खूप चालल्या आणि ह्या कंपनीने स्वतःची Easy Computech नावाची मराठी आणि हिंदीमध्ये पहिली सेल्फ कॉम्प्युटर प्रशिक्षणाची सीडी काढली आणि त्या वेळी ठाण्यात आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, मा.आमदार निरंजन डावखरे ह्यांच्याकडून महिला विशेष नावाने महिला दिनानिमित्त प्रोत्साहन आणि शुभेच्छा मिळवल्या.

डॉ. शिवांगीचा औद्योगिक प्रवास उत्तम जम धरत होता; पण त्याचसोबत तिची शैक्षणिक घोडदौडसुद्धा वेग धरत होती. व्यवसायातसोबत लोकांना त्यांच्या मनाने, बुद्धीने आणि स्वभावाने समजून प्रशिक्षण दिले तर उद्योगात येणार्‍या अडचणी कमी होतील ह्याच विचारांचा आधार घेऊन तिने एम.ए. सायकॉलॉजी केले व त्यानंतर पी. एच. पी इन एजुकेशनल मॅनेजमेंट पूर्ण केले आणि ती आता एम.सी.टी. कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेते आहे.

कमावलेल्या शिक्षणावर तिने बिझनेस कोचिंग व बिझनेस कन्सल्टन्सी सुरू केली आणि जन्म झाला एका कंपनीचा. बॉन 2 बिझ ह्या ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी देणार्‍या कंपनीचा. ह्या दरम्यान, शिवांगीने एन. एल.पी. शिकून घेतले आणि त्याच्या पद्धती ती उद्योजकांना शिकवते. आज डॉ. शिवांगीने माधवबाग, वास्तुरविराज, लोकमत न्यूजपेपर, कोकण भवन माहिती विशेष अधिकार कार्यालय, सन फार्म, सिडको मनस्वी केंद्र, आम्ही उद्योगिनी, झेप उद्योगिनी प्रहार न्यूजपेपर कार्यालय, इको ग्रृप्स, यंगस्टार ट्रस्ट, स्वयंसिद्ध फाऊंडेशन, डॉक्टर असोसिएशन, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे जिल्हा उद्योग केंद्र, सावंतवाडी नगर परिषद आयोजित कार्यक्रम, वर्ल्ड ट्रेड सेंटर ह्यांसारख्या नामांकित कंपनी आणि संस्थांसोबत ट्रेनिंग घेतले आहे. तसेच त्यांच्यासोबत विविध कामे केली आहेत. तसेच स्वतःच्या लिखाण, ह्या कलेला स्वतःच्या विचारांशी संलघ्न करून, तिने लोकमत, स्मार्ट उद्योजक, अर्थसंकेत, नव अर्थक्रांती ह्यांच्यासारख्या वर्तमानपत्र व मासिकासाठी उद्योजकता ह्या विषयांवर लेख लिहिले आहेत.

तसेच तिने shivangizarkar.blogspot.in ह्या नावाने स्वत:चा ब्लॉग सुरू केला. आज मोठ्या उद्योगांसोबत लहान उद्योगांचा विकास व्हावा म्हणून ती लहान उद्योजकांनासुद्धा ट्रेनिंग आणि मार्गदर्शन देते. आजवर १०,००० उद्योजकांना तिने ट्रेनिंग आणि व्यावसायिक मार्गदर्शन दिले आहे. आय. बी. एम. लोकमत टीव्हीवर एलीवेटर स्पीच व साम टीव्हीवर ब्रांडिंग विशेषमध्ये तिची मुलाखतही झाली आहे. ती ट्रॅवेलोग्राफी ह्या ट्रॅवेल कंपनीची उएज असून, तिने सौ. अमृता गवाणकर-जोशीसोबत ट्रॅवेल क्षेत्रात वर्क फ्रॉम होम आणि फ्रँचाईझी ही मोड्यूल आणली आहे आणि त्याच्या दोन शाखा- एक गोरेगाव व दुसरी पुणे इथे सुरू करण्यात आली आहे.

तसेच उद्योगमेघ ह्या कंपनीत त्या पार्टनर असून मेघा पानसरे ह्यांच्यासोबत त्यांनी उद्योगमेघ हे app लाँच केले आहे व त्यात उद्योगविषयी मार्गदर्शनाचे लेख लिहिले जातात. त्याचसोबत ह्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग केले जाते. तसेच त्यांनी, डॉ. शिवांगी बिझ मैस्ट्रो नावाने एक इंस्टिट्यूट सुरू केली आहे. त्यात उद्योगविषयी आणि करीअरविषयी विविध विषयांवर ट्रेनिंग दिले जाते.

डॉ. शिवांगी स्वत: ऑल इंडिया एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ इम्प्लॉयमेंट ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या व्हाइस-प्रेसिडंट आहेत ज्या स्टार्ट अप, स्टँड अप, प्रमोटिंग इंडियासारख्या सरकारी स्कीमचे मार्गदर्शन आणि ट्रेनिंग दिले जाते. आज डॉ. शिवांगी या उद्योग फ्रँचाईझी आणि एजन्सी मोड्यूल बनवून देतात आणि त्याच्या विस्तारासाठी संपूर्ण इंडियामध्ये मदतही करतात.

उद्योजकांना त्यांच्या मानसिकतेप्रमाणे तसेच व्यक्तिमत्त्वाला साजेसे व्यवसाय करता आले पाहिजेत म्हणून त्यांनी विशेष टेस्ट निर्माण केल्या आहेत ज्यामुळे व्यवसाय करणे अतिशय सोपे आणि सुलभ होते व निवडलेल्या क्षेत्रात असफल होण्याच्या शक्यता कमी होतात.

डॉ. शिवांगी ह्यांच्या क्लायंट लिस्टमध्ये मोठ्या कंपनीसोबत गप्पागोष्टी आणि डिल्स कॅफे, मायाज सलोन, अजंठा सलोन, कॅप्टन क्लिन, विवेना इव्हेंट, हेड बबल स्कूबा डायव्हिंग, महालक्ष्मी कॉम्प्युटर, कूल क्राफ्ट ह्यांसारख्या छोट्या उद्योजकांचाही समावेश आहे. त्यांच्या विशेष कार्यांमुळे त्यांना खालील अ‍ॅवॉर्ड्स प्राप्त झाले आहेत.

सध्या त्यांच्या खालील कंपन्या कार्यरत आहेत :

बॉन 2 बिझ (Born 2 Biz) – ट्रेनिंग आणि कंन्सलटन्सी फर्म. ज्याच्या अंतर्गत सर्व कंपन्यांचे ट्रेनिंग आणि कंस्लटन्सीची सर्व कामे चालतात. ज्यामध्ये त्यांचे ‘व्हर्च्युअल सीईओ’ हे बिझनेस कंन्सलटन्सी मोड्यूल, एन. एल. पी. फॉर सेल्स, एन. एल. पी. फॉर बिझनेस, एन. एल. पी. फॉर डॉक्टर व वकील अशी मोड्यूल्य प्रसिद्ध आहेत. तसेच त्या बिझनेस कॅन्व्हास, बिझनेस मोड्यूल, फ्रँचाईझी विकास, एजन्सी विकास, शॉपी मोड्यूल असे उद्योगसंदर्भातील मोड्यूल उद्योगाप्रमाणे आणि क्लायंटच्या आवश्यकतेप्रमाणे विकसित करुन देतात. तसेच क्लायंटच्या आवश्यकतेप्रमाणे ट्रेनिंग व मेंटोरिंग प्रोग्रामसुद्धा घेतात. ह्यामध्ये ब्रँडिंग व मार्केटिंगचे विशेष कस्ट्माइझ मोड्यूल बनवले जाते ज्यामुळे क्लायंटला सेल्समध्ये विशेष फायदा होतो.

उद्योगमेघ इंफोटेक

ह्यामध्ये एक अ‍ॅप मासिक आहे ज्यात विविध व्यक्तींचे इंटरव्ह्यू आणि आर्टिकल्स लिहिले जातात व उद्योजकांना विशेष रूपात मार्गदर्शन केले जाते. तसेच वेबसाइट, वेब डेव्हलपमेंट, अ‍ॅप डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग व सोशल मीडिया मार्केटिंग ज्यामध्ये फेसबुक मार्केटिंग, व्हॉट्स अप मार्केटिंग, जी+, इंस्टाग्राम मार्केटिंग, यूट्यूब मार्केटिंग, ट्विटर मार्केटिंग, एस.ई.ओ. एस.ई.एम. मार्केटिंग, ब्लॉग रायटिंग, कंटेन्ट रायटिंगसारखी कामे विशेष रूपात केली जातात. ह्या व्यवसायात नवीन उद्योजकांना विशेष सवलत दिली जाते आणि त्यांचे डिजिटल मार्केटिंग केले जाते.

डॉ. शिवांगी बिझ मैस्ट्रो :

ज्यामध्ये करीअर व व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त असे कोर्सेस घेतले जातात, ज्यात विशेष करून ट्रॅव्हल आणि ट्युरिझम, इव्हेंट, फूड, एसी / कॉम्प्युटर रिपेरिंग, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट ह्यांचे कोर्सेस घेतले जातात. तसेच त्याचसोबत विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयं- रोजगारासाठी प्रवृत्त केले जाते आणि मार्गदर्शनसुद्धा केले जाते. ह्या इंन्स्टिट्युटच्या शाखा डॉ. शिवांगीला संपूर्ण देशात विकसित करायच्या आहेत.

वर्क फ्रॉम होम :

ह्या उपक्रमात डॉ. शिवांगी आणि त्यांच्या सहकारी मेघा पानसरे ह्या घरेलू महिला किंवा बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून देतात आणि त्यांना किमान स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील एवढा रोजगार मिळेल ह्याची तरतूद करून देतात. ह्या उपक्रमात ५० हून अधिक कंपनी रोजगार देत आहेत. ज्या महिला किंवा तरुण ज्यांना घरबसल्या व्यवसायाची किंवा स्वयंरोजगाराची संधी प्राप्त करून हवी असेल त्या महिलांसाठी असे उपक्रम सुवर्ण संधी आहे.

ट्रॅव्हेलोग्राफी :

ही एक ट्रॅव्हेल कंपनी आहे जी देशाविदेशात लोकांना विविध शहरांची, देशांची व जागेची ओळख करून देते. ज्यात ट्रॅव्हेल संदर्भाशी निगडित सर्व कामे केली जातात. स्वत:च्याच कुटुंबासाठी स्पेशल हॉलिडेज हे ह्या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे टुर पॅकेज, व्हिसा, एअर तिकिट, पासपोर्ट, फोरेक्स, ट्रॅव्हेल इंशुरन्स ह्या प्रकारच्या सेवा ह्या कंपनीकडून दिल्या जातात.

बिझनेस कनेक्ट :

जर तुम्हाला देशात आणि विदेशात स्वत:चा उद्योग, ब्रँड आणि शाखा वाढवायच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक टुर, मीटिंग्स, कॉन्फरन्स, एक्स्पो, प्रॉड्क्ट लाँचिंग तसेच नेटवर्किंग करायचे असेल तर ह्या उपक्रमामार्फत ते केले जातील. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट सर्व्हे, क्लायंट्स मिळणे सोपे होईल.

फ्रँचाईझी डेव्हलपर्स :

ह्या उपक्रमामार्फत तुमची कोणतीही कंपनी असो, तुम्हाला हव्या त्या एरीयामध्ये, हव्या त्या किमतीमध्ये अगदी वाजवी दरात फ्रँचाईझी विकता किंवा खरेदी करता येऊ शकते.

स्वदेशी शॉपिंग :

ह्या उपक्रमामार्फत स्वदेशीय कंपन्यांना प्रमोटिंग इंडिया आणि रोजगार इंडिया ह्या प्रोग्रामशी जोडून आंतर्देशीय मार्केट व एक्स्पोर्ट ऑर्डर मिळवून देणे आहे. त्यामुळे आपल्या देशातील कंपन्यांना, बचत गटांना परकीय चलन मिळू शकेल आणि एक्स्पोर्ट संधी प्राप्त होऊ शकेल.

आयुश फेस्टिव्हल आणि कॉर्पोरेट योगा :

ह्या उपक्रमामार्फत ‘इंटरनॅशनल योगा डे’ला असंख्य योगा टीचरांना रोजगार संधी प्राप्त करून द्यायची आहे. तसेच दरमहा किमान रोजगार मिळू शकेल ह्याची तरतूद करण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचे एजन्सी मोड्यूल लवकरच आपण मार्केटमध्ये घेऊन येत आहोत.

बिझ ई-मॅगझिन :

आज ८०% लोक कोणतेही बिझनेस मॅगझिन किंवा माहिती ऑनलाईन वाचतात. हे एक बिझिनेस ई-मॅगझिन आहे त्यात उद्योजकांना विविध उद्योगांविषयी मार्गदर्शन आणि जाहिरातीची संधी प्राप्त होऊ शकते. ई-मॅगझिन असल्यामुळे डिजिटल माध्यमातून हे मॅगझिन लाखो लोकांना लगेच प्राप्त होऊ शकते. ज्यामुळे अतिशय अल्प दरात नवीन उद्योजकसुद्धा आपली जाहिरात देऊ शकतो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. Save Paper, Save Tree ह्या सामाजिक तत्त्वांवर हा ई-मॅगझिनचा संपूर्ण प्रोजेक्ट उभा आहे.

स्टार्ट-अप शोध :

स्टार्ट-अप शोध हा उपक्रम त्या येणार्‍या काही दिवसांत सुरू करणार आहेत, जेणेकरून स्टार्ट-अपसाठी विशेष संधी प्राप्त होऊ शकते.

उपलब्ध संधी :

डॉ. शिवांगी ह्यांनी होतकरू तरुणांसाठी विविध संधींचे दालन उघडे करून दिले आहे. त्यात त्या स्वत: त्यांच्या डॉ. शिवांगी इंस्टिट्यूटच्या व उद्योगमेघच्या शाखा संपूर्ण देशात खोलू इच्छितात. ह्यात उत्तम रोजगाराची संधी त्या प्राप्त करून देतात. त्याचसोबत कोणताही उद्योग असो किंवा प्रॉडक्ट त्याचे मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, फ्रँचाईझी बनवणे व विकणे तसेच उद्योगाला ग्रोथ प्राप्त करून देणे अशा विविध माध्यमांतून त्या कंपनीला किंवा उद्योजकांना उद्योगविकासाची संधी प्राप्त करू देतात. ज्यांना फ्रँचाईझी विकत घ्यायची असेल ते सर्व उद्योजक त्यांना संपर्क करू शकतात. तसेच त्या उद्योजकांना इतर देशांत उद्योगाची संधी हवी आहे किंवा उद्योगविकास करायचा असेल असे सर्व उद्योजक विविध औद्योगिक ट्यूरमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच त्यांच्या वर्क फ्रॉम होम ह्या मोड्यूलमधून लाखो घरेलू महिलांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते.

त्यामुळे ज्या महिला किंवा बेरोजगार तरुण ज्यांना घरबसल्या रोजगार प्राप्त करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करावा. आजकाल प्रत्येक डोक्यात एक आयडिया क्षणाक्षणाला जन्म घेत असते. ह्या आयडियाला एक स्टार्ट-अप म्हणून सुरू करायचे असेल व स्वत:चा उद्योग सुरू करायचा असेल तर नक्कीच संपर्क करू शकता ज्यामुळे देशात नव-उद्योजक निर्माण होऊ शकतो. डॉ. शिवांगी ह्या एक मेन्टोर, ट्रेनर, कंस्लटंट आणि राइटर आहेत. जर तुम्हाला कोणतीही संधी हवी तर ती नक्कीच तुम्हाला प्राप्त होऊ शकते. लवकरच त्या महाराष्ट्रात बेस्ट स्टार्ट-अप ह्या प्रकारे उपक्रम सुरू करून शासनाच्या यादीत जास्तीत जास्त स्टार्ट-अप रजिस्टर व्हावे म्हणून कार्यरत आहेत.

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन हवे असेल तर खालील क्रमांकांवर डॉ. शिवांगी यांना संपर्क करू शकता.

– डॉ. शिवांगी झरकर
८८५०५६००५६, ८८५०३७३७१७

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: