गॅरेजमध्ये नोकरी ते १८० करोडची कंपनी उभारणारे शिवकुमार बोराडे

आपण कधी विचार केलाय का की, एक गॅरेजवर काम करणारा साधारण तरुण १८० करोडचा मालक होऊ शकतो?

होय! ते शक्य करून दाखवले एका गरीब कुटुंबातल्या एका तरुणाने म्हणजेच सर्वांचे परिचित WHR कंपनीचे संस्थापक शिवकुमार बोराडे यांनी. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात खूप हलाखीच्या परिस्तिथीत गॅरेजवर अहोरात्र मेहनत घेऊन सुरू केली.

आज १८० करोड संपत्तीचे ते धनी आहेत. “गॅरेजमध्ये काम ते WHR या कंपनीची स्थापना” हा त्यांचा लक्षणीय अद्भूत प्रवास खरंच वाखाणण्यासारखा आणि प्रेरणादायी आहे.

फक्त ५० रु. महिना पगारापासून ते लाखो करोडोंच्या संपत्तीची उलाढालीपर्यंत आज त्यांनी मजल मारली आहे. शिवकुमार बोराडे यांनी एका सामान्य व्यक्तीपासून ते एक आदर्श व्यक्तीपर्यंतचा प्रवास अथक परिश्रम व आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करत पार केला आणि समजातील तरुणांसमोर एका आदर्श व्यावसायिकाचे उत्तम उदाहरण मांडले.

शिवकुमार बोराडे यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात

वैद्यकीय मार्केटिंग क्षेत्रात राहून समाजसेवा हेच कार्यक्षेत्र मानणारे आणि समाजातील तळागाळातीळ सर्व लोकांच्या आरोग्यविषयीच्या समस्यांची नीट कल्पना असलेले शिवकुमार बोराडे आज यशाचे धनी आहेत. त्या यशामागे संघर्ष आहे, परंतु या संघर्षांच्या कथा सांगण्याऐवजी, त्यातून काय शिकलो हे त्यांना महत्त्वाचे वाटते.

एखाद्याने नोकरी धरली किंवा एखादा धंद्यात पडला, यातील शाब्दिक भेद सहज लक्षात येणारा नसला तरी महत्त्वाचा आहे. जोखमीच्या क्षेत्रांपेक्षा नोकरीतील सुरक्षिततेला प्राधान्य देणारी सावध मराठी मानसिकता त्यातून नकळत अधोरेखित होते.

वीस वर्षांपूर्वी घरची हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत एका गॅरेजमध्ये काम करणारा पंढरपूर तालुक्यातील भोसे(क) या गावातील ध्येयवेडा एक युवक म्हणजेच शिवकुमार बोराडे. परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण अर्धवट झाले.

मुलाने शासकीय सेवेत रूजू व्हावे अशी वडिलांची इच्छा. यावर मात करत शिवकुमार यांनी वडिलांची इच्छा सार्थ ठरवत आपले शिक्षण मुक्त विद्यापिठातुन बी.ए. ही पदवी संपादित करत पूर्ण केले.

सन २००७ साली “सीआयपीसफ” या शासकीय सेवेतमध्ये रुजू झाले. पण यामध्ये त्यांचे दिर्घकाळ मन लागले नाही कारण प्रतिष्ठा आणि पैसा याचबरोबर समाजासाठी झटण्याची त्यांची तळमळ होती.समाजाची सेवा करण्याचे ध्येय पूर्ण करावे, या हेतूने त्यांनी शासकीय नोकरीस रामराम ठोकला. यानंतर होणारी आपली हालअपेष्ठा याची जाणीव असूनही त्यांनी असे मोठे धाडस केले.

काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून असल्याने ते व्यवसायाकडे वळले आणि स्वतःची मारुती व्हॅन घेऊन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला, पण त्यावरच स्वस्थ न बसता त्यांनी “आयसीआयसीआय” लाईफ इंशुरन्स कंपनीत बिझनेस पार्टनर म्हणून काम सुरू केले.

नेहमीच समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती आणि अशातच वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी उचलले एक यशस्वी पाऊल म्हणजेच LiveWorld HealthTech Pvt. Ltd या कंपनीची केलेली स्थापना!!

या कंपनीअंतर्गत त्यांनी क्लीनिकची सेवा याची आणि माहिती गरजू रुग्णापर्यंत पाहचविण्याचे कार्य सुरू केले. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच रुग्णांना १००% खात्रीशील उपचार पुरविण्याचे यशस्वी कार्य केले.

प्रयत्न केले तर कोणत्याही क्षेत्रात चांगला जम बसतो, असा विश्वास त्यांना होता. असंख्य गरजू आणि बेरोजगार हातांना लाभ मिळावा या हेतूने WHR या कंपनीची स्थापना पुण्यामध्ये सुरुवातील दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरातील एका खोलीत थाटून त्यांनी आपले कार्यक्षेत्र अमर्यादित केले. हळुहळू शिवकुमार आणि त्यांच्या WHR या हेल्थ केयर कंपनीची ख्याती पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर पसरली.

आज लाखो रुग्णांना आणि शिवकुमार बोराडे यांच्या WHR या कंपनीच्या माध्यमातून खात्रीशील उपचार मिळत आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान बघायला मिळत आहे. WHR च्या माध्यमातून रुग्णांना घरबसल्या मोबाइल वरून एका क्लिकवर अचूक डॉक्टर आणि हॉस्पिटल मिळत आहे आणि ते पण वाजवी दरात.

आज महागड्या वारजेसारख्या भागात WHR चे कार्यालय शिवकुमार बोराडे यांनी उभारले आहे आज पुणेच नव्हे तर महाराष्ट्रासह नावाजलेल्या शिवकुमार बोराडे यांची रुग्णांच्या सेवेचे काम पाहणारी WHR कंपनी ही महाराष्ट्रातील अव्वल मराठी फर्म ठरत आहे.

याचा फायदा फक्त शहरी भागापुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचे कार्य शिवकुमार बोराडे करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात “सवलतीच्या दरामध्ये गरजू रुग्नांना आरोग्य सेवा मिळून देणे हे WHR चे मुख्य उद्धिष्ट आहे.

एका गरीब कुटुंबातील कोणतेही मार्केटिंगची पदवी नसलेले शिवकुमार बोराडे हे 2020 पर्यत WHR ची सेवा संपुर्ण जगामध्ये चालू करण्याचे आणि गरजू रुग्णांपर्यंत अखंड सेवा वाजवी दरात पुरविण्याचे स्वप्न उराशी बाळगूण ते पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे.

यामागे यांची जिद्द,धाडस व प्रचंड आत्मविश्वास कारणीभूत आहे. शिवकुमार बोराडे यांच्या प्रत्येक शब्दांतून समाज, ग्रामीण नागरिक आणि रुग्णांचे होणारे हाल याविषयीची मानसिक तळमळ दिसून येते. रुग्णाच्या चेहऱ्यावरचे समाधानी स्मित हास्य हीच त्याच्या कामाची खरी पावती असे ते सांगतात.

भारताच्या हेल्थ इंडस्ट्रीजला डिजिटलाईज करण्याच्या उद्देशाने खेडेगावातील तरुण उद्योजक शिवकुमार बोराडे हे सातत्याने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडविण्याचे प्रयत्न करत आहेत.

स्वतःबरोबरच समाजाचा विकास त्यांनी केला, अथक परिश्रम करत त्यांची संकटांवर मात करत आपली आणि WHR ची मशाल तेवत ठेवली आहे. त्यांच्याकडे असणारी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास पाहिला असता ते आणि त्यांची कंपनी WHR यशाचा नवीन उच्चांक नक्कीच गाठणार हे निश्चित वाटतय!

शिवकुमार बोराडे

जन्म दिनांक : २१ जानेवारी १९८५
जन्म ठिकाण : पंढरपूर
ई-मेल : shivkumarboarde@gmail.com
भ्रमणध्वनी : ९९२३२३४३१०

विद्यमान जिल्हा : सोलापूर
शिक्षण : B.A.
फेसबुक अकाऊंटची लिंक : www.facebook.com/shivkumarborade
कंपनीचे नाव : Liveworld HealthTech Pvt.Ltd.
उत्पादने/सेवा: Affordable healthcare services

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?