‘शूज लॉन्ड्री’ : एक अफलातून उद्योग

तुम्ही कपड्याची लॉन्ड्री, कार वॉश ऐकले आहे, पण शूज लॉन्ड्री ऐकले आहे का?

महागड्या ब्रँडचे शूज ज्यांची किंमत १० ते १५ हजार किमतीची असते, अशा श्रीमंत सेलेब्रिटी लोकांकडे असे महागडे शूज असतात. अशा शूजचा वापर फार खूप कमी असतो. काही इव्हेंट, कार्यक्रम इत्यादी वेळीच वापर होतो. त्यामुळे असे शूज लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे त्यांचा मेंटेनन्स करावा लागतो.

बरेच वेळा त्यांची शायनिंग जाते किंवा त्याचा एखादा पार्ट किंवा थोडासा खराब झाला तर फेकून न देता त्याला शूज लॉन्ड्रीमध्ये पाठविले जाते. शिवाय असे शूज वर्षातून एकदा तरी स्टरलाइज करून घेतले जातात.

अशा शूज लॉन्ड्रीमध्ये शोरूमप्रमाणे नवीनच केले जातात. यामध्ये जगातल्या टॉप शूज ब्रँड येतात. उदा. नायके, वुडलँड, मुली, लुईस, व्हीटोन, मनोलो, जिम्मीचु, वॉल्टर, स्टेजर, अलेक्झांडर, मॅक्वीन, ब्रीयन अटवुड, स्टुअर्ट बीरझमन, मीऊ मीऊ ह्या ब्रँडच्या शूज, सॅन्डल इत्यादीची किंमत १५ हजारांपासून सुरू होते.

या प्रकारचे ग्राहक मुंबईत तुम्हाला कुलाबा, बांद्रा, अंधेरी, पवई, वरळी, जुहू अशा एरियांत भेटतील. या उद्योगासाठी या ब्रँडच्या शूजची संपूर्ण माहिती लागते, त्याच मॉडेलच्या शूजचे सर्व पार्ट्स, लेस, सोल इत्यादी सर्व तुमच्याकडे असावे लागते.

तुम्हाला ३०० फुटांची जागा लागते, त्यात शूज वॉश करण्यासाठी व ड्राय करण्यासाठी व्यवस्था लागते त्यानंतर डेटिंग, पेंटिंग, पॉलिशिंग तसेच ते स्टरलाइज केले जातात व परत नवीनप्रमाणे रीपॅक केले जातात.

या उद्योगाची तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जाहिरात करता व ग्राहकांचे फोन येतात. तुमचा पिकअप बॉय शूज घेऊन येतो, ते शूज तुमच्या लॉन्ड्रीत पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते ग्राहकाकडे पोहोचविले जातात. असे शूज लॉन्ड्री करण्याचा कमीत कमी खर्च रु. ३०० पासून सुरू होते.

शूज अधिक महागडा असल्यास व त्याच्या स्पेअर्सची जास्त किंमत असल्यास ती फी २ हजारपर्यंत जाऊ शकते. शूज लॉन्ड्री हा उद्योग भारतासह जगातील सर्व मोठ्या व श्रीमंत शहरांत चालतो. रोज सरासरी १५ ते २० शूजची ऑर्डर मिळते. रोज ७ ते १० हजारांचा गल्ला जमतो.

कर्मचारी, स्पेअर्स व इतर खर्च वजा जाता सुमारे ५०% फायदा म्हणजे रोज ३ ते ४ हजारांचा निव्वळ नफा होतो म्हणजेच महिना १ लाख रुपये. ह्या उद्योगासाठी सुमारे पाच लाखांचे भांडवल लागते. एकदा मार्केटमध्ये नाव झाल्यावर उद्योग अधिक वाढत जातो.

– प्रा. प्रकाश भोसले

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?