इंजीनीरिंग करूनही नोकरीसाठी धक्के खावे लागले, तरी जिद्दीने झाला उद्योजक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


नमस्कार मी शुभम निकम, मी सब-ब्रोकर आहे. माझ्या ग्राहकांना इन्वेस्टमेंट, ट्रेडिंग आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करतो. आम्ही इन्शुरेंस आणि लोनसंदर्भात सेवादेखील पुरवतो.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक छोटसं गाव आहे राजमाने तेथील एक तरुण. मी माझे माध्यमिक शिक्षण माझ्या गावाजवळील शाळेत पूर्ण केले आणि नंतर मेकॅनिकल इंजीनीरिंग धुळे येथे पूर्ण केले. मी एका अत्यंत गरीब घरातून आहे, मी लहान असतानाच माझे वडील देवाघरी गेले व आमच्यावर जसे आकाश कोसळले. आईने खूप कष्ट घेऊन माझे इंजीनीरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

माझे इंजीनीरिंग पूर्ण झाल्यानंतर मी जॉबसाठी खूप धक्के खाल्ले. पाहिजे तशी नोकरी भेटत नव्हती. अतिशय कमी पगारावर काम करावे लागत होते. पण माझे स्वप्न खूप मोठे होते, मला नोकरी करून आयुष्य काढायचे नव्हते. मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता.

सुरुवात छोटी असली तरी चालेल ध्येय मोठं असलं पाहिजे असं माझं ठाम मत होतं. मी दोन वर्ष इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गणिताचे क्लासेसदेखील घेतले. त्यानंतर सेल्स आणि मार्केटिंगमध्ये दोन वर्ष काम केले आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध पुस्तके वाचली, YouTube व इंटरनेटवरून माहिती गोळा करू लागलो.

शुभम निकम

कंपनीचे नाव : FavFund
आपला हुद्दा : मालक व संस्थापक
व्यवसायातील अनुभव : २ वर्षे
तुमची उत्पादने व सेवा : मी सब-ब्रोकर आहे. माझ्या ग्राहकांना इन्वेस्टमेंट, ट्रेडिंग आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करतो. आम्ही इन्शुरेंस आणि लोनसंदर्भात सेवादेखील पुरवतो.
व्यवसायाचा पत्ता : चाळीसगाव, जळगाव, महाराष्ट्र, भारत ४२४१०१
विद्यमान जिल्हा : जळगाव

ई-मेल : shubhamnikam579@gmail.com
मोबाइल : 9637062516
Facebook Account URL : facebook.com/shubhampnikam/
LinkedIn Account URL : linkedin.com/in/nikamshubham

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.