उद्योजक Profiles

तळकोकणातली सोलकडी पुण्यात उपलब्ध करून देणारी सिद्धी पडेलकर

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘सिद्धी फुड्स’ हे युनिट म्हणा किंवा घरगुती होम मेड व्यवसाय सोलकडी किंवा कोकण प्रोडक्स विक्री व्यवसाय ही संकल्पना १ मे २०१५ पासून सुरू केली. ‘सिद्धी फुड्स’चे प्रमुख पेय जे आहे ते आहे सोलकडी. आज मी बऱ्याच ठिकाणी सोलकडी प्यायले, पण सोलकढीची चव ही ज्याप्रमाणे कोकणात आहे अशी कुठेच मिळाली नाही.

मी स्वत: तळकोकणातली असल्यामुळे मला सोलकढीची चव व ती कशाप्रकारे बनवली जाते हे माहीत आहे. माझ्या आईकडूनच हा वारसा मला अप्रत्यक्षपणे मिळाला असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. १ मे २०१५ नंतर आम्ही घरगुती सोलकडी बनवण्यास सुरुवात केली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

सुरुवातीला मित्र-मैत्रिणींना सोलकढी टेस्टसाठी देऊन त्यांच्याकडून सोलकडी कशी आहे याची प्रतिक्रिया घेण्यात आली. त्यानंतर काही मित्र परिवारांनी असा सल्ला दिला की, तू जी सोलकडी बनवते अशी पुण्यामध्ये कुठेच मिळत नाही. मग का नाही याला व्यवसाय संदर्भात बघितले जावे असे मित्रांकडून सुचविण्यात आले.

आमच्या या घरगुती सोलकढीला व्यवसायाचं स्वरूप देण्यासाठी मी सज्ज झाले. प्रथम एक दुकान, दोन दुकानात जाऊन सोलकडी टेस्टिंगला देऊन पाच-पाच पॅकेट दुकानांमध्ये विक्रीला ठेवून ग्राहकांकडून रिप्लाय घेण्यास सुरुवात झाली आणि खरंच आमची सोलकडी ग्राहकाच्या पसंतीला पुरेपूर उतरली आणि आमच्या व्यवसाय सुरू झाला.

आज आम्ही पुणे शहरात कोथरूडमध्ये ८० टक्के सोलकढी ही ‘सिद्धी फुड्स’कडून जाते. पोळी भाजी सेंटर, फूड मॉल्स, फुड स्टोअर्स, वैयक्तिक कस्टमर इत्यादी व आता यासोबत कोकणातली इतर उत्पादनेसुद्धा ‘सिद्धी फुड्स’ या नावाने विक्रीला सुरुवात केली यात कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा मावा, कोकणातले मसाले वगैरे.

आमच्याकडील सोलकढी ही नारळाच्या दुधात बनवली जाते. आमच्या सोलकढीचा नारळ हासुद्धा कोकणातून येतो. थंडगार सोलकडी ही पित्तशामक व स्फूर्तिदायक आहे. आमची सोलकडी पिऊन पित्ताचा त्रास कमी होतो असा अनुभव अनेक ग्राहकांना येतो.

सिद्धी संतोष पडेलकर

कंपनीचे नाव : सिद्धी फुड्स
आपला हुद्दा : मॅनेजिंग डायरेक्टर
व्यवसायातील अनुभव : 6 वर्षे
तुमची उत्पादने व सेवा : सोलकढी, कोकम सरबत, ( मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर) कोकणातले मसाले, आगुळ, कोकम सरबत, मसाला मिरची, कोकम, आवळा सरबत, जांभूळ सरबत, काजू, काजूची बोंडे व इतर कोकणातली सर्व प्रोडक्स.

ई-मेल : siddhifoods2015@gmail.com
मोबाइल : 9970064907
संकेतस्थळ : www.siddhi-foods.com
Facebook Account URL : https://www.facebook.com/siddhi.foods.5
व्यवसायाचा पत्ता : रजिस्टर ऑफिस – आनंद कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर १२ / ३, ए विंग, कोथरूड, पुणे ३८ – महाराष्ट्र
विद्यमान जिल्हा : पुणे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!