Advertisement
उद्योजक Profiles

स्वत:च्या अनुभवातून सीताराम झाला आयुर्वेदिक औषधांचा विक्रेता

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मी सीताराम कमळू गावंडा. ९ एप्रिल २०१६ रोजी माझे पोट दुखण्याला सुरुवात झाली. सोनोग्राफी केल्यानंतर कळले की ५.५ mm किडनी स्टोन आहे. दोन दिवस दवाखान्यात भरती झालो होतो.  वीस-पंचवीस दिवसानंतर पुन्हा पोट दुखू लागले. परिस्थिती नाजूक होती. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

माझे एक जवळचे मित्र आयुर्वेदाचार्य विजय साळुंके सर IMC मध्ये काम करतात. त्यांची भेट घेतली. सरांनी सांगितले आयुर्वेदात सर्व प्रकारच्या रोगांवर् उपचार केले जातात. उपचार सुरू झाला सरांनी सांगितले तीन महिने कोर्स कारावा लागेल. ३ महिने कोर्स पूर्ण करण्यासाठी पैसे कसे उभे करणार. तेव्हा सरांनीच सांगितले, तुम्ही कंपनीचे प्रॉडक्ट विकून रुपये कमवू शकता. स्वत:चा व्यवसाय करू शकता. त्यासाठी आपल्याला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही.

सरांनी सांगितले कंपनी आपल्याला ३० ते ४० टक्के सूट देते. एक हजार रुपयांनी सुरुवात केली. ३ महिने झाले सोनोग्राफी केली किडनी स्टोन नाहीसा झाला. आता मी अनेक ठिकाणी जाऊन आयुर्वेदिक औषधे विकण्यास सुरुवात केली आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे मी स्वत: तर रोगमुक्त झालोच, पण यातून मला उत्पन्नाला व रोजगाराचे साधनही मिळाले.

सीताराम कमळू गावंडा

कंपनीचे नाव : इंटरनॅशनल मार्केटींग कॉर्पोशन प्रा. लि.
जन्म दिनांक : २८ फेब्रुवारी
जन्म ठिकाण : काळुस्ते, ईगतपुरी

ई-मेल : sitaramgavanda76@gmail.com
भ्रमणध्वनी : ९६३७४३३५०९
विद्यमान जिल्हा : नाशिक
शिक्षण : दहावी पास

स्मार्ट उद्योजक सूची | Entrepreneurs Directory


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!