स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
एकदा एक मुलगी आपण किती आणि कसे दु:खी आहोत हे आपल्या वडिलांना सांगत होती. आपल्या आयुष्यात सतत कसं झगडत राहावं लागतय, एक समस्या संपली की दुसरी समस्या कशी आवासून उभी असते याच वर्णन ती वडिलांसमोर करत होती.
तिचे वडील व्यवसायाने आचारी (शेफ) होते. तिचे बोलणे ऐकून तिला सोबत घेऊन ते स्वयंपाकघरात गेले काहीही न बोलता त्यांनी तीन भांड्यांमध्ये समप्रमाणात पाणी घेतले व गॅसवर पाणी उकळायला ठेवले. भांड्यांतील पाणी उकळल्यावर एका भांड्यात बटाटे, दुसर्यामध्ये अंडी व तिसर्या भांड्यात कॉफीच्या बिया टाकल्या.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
मुलगी मात्र बाबा काय करत आहेत हे आतूरतेने पाहत होती. कारण ते काय करत आहेत याची तिला उत्सूकता होती. वीस-पंचवीस मिनिटांनंतर तिच्या बाबांनी गॅस बंद केला व त्यांनी उकळत्या पाण्यातून बटाटे व अंडी वेगवेगळ्या भांड्यात काढून घेतली आणि कॉफीसुद्धा कपात काढली. मुलीकडे वळून त्यांनी तिला विचारले, “आता सांग तुला काय दिसतंय?”
मुलीने त्वरीत उत्तर दिले बटाटे, अंडी आणि कॉफी. यावर तिचे बाबा तिला म्हणाले नीट जवळून पाहा त्या बटाट्यांना हात लावून सांग. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे तिने बटाट्यांना हात लावून पाहिला, तिला जाणवले ते मऊ झाले. त्यानंतर त्यांनी तिला अंडे फोडायला सांगितले अंडे फोडल्यावर अंड्यातील बलक शिजून घट्ट झाला होता. शेवटी कॉफी प्यायला सांगितली. त्या कॉफीचा घोट घेताच तिच्या चेहर्यावर एक प्रकारचा उत्साह झळकला.
शेवटी न राहून तिने बाबांना विचारले, “बाबा, तुम्हांला यातून काय सांगायच आहे?”
यावर हसून बाबा तिला म्हणाले, “बाळा, या तिन्ही गोष्टींच्या भाळी उकळतं पाणी आलं हे त्यांचे दुर्दैव. पण प्रत्येकावर त्याचा झालेला परिणाम मात्र वेगळा होता. बटाटे हे वस्तूत: कडक असतात. परंतु उकळत्या पाण्यात टाकल्यावर मात्र ते मऊ झाले. याउलट अंड्याला वरून कवच असले तरी ते नाजूक असतं, कारण त्याच्या आत द्रव असतं. हेच अंडे उकळत्या पाण्यात टाकलं की, ते मात्र घट्ट होतं.
या दोन्हींपेक्षा कॉफीच्या बियांचे वेगळेपण आहे. उकळत्या पाण्यात बिया टाकल्यावर त्यांनी मात्र त्या पाण्याचा रंग बदलला व त्यातून नवं काहीतरी निर्माण झालं. ते म्हणजे कॉफी. ज्या कॉफीच्या सुगधांने तुझ्या चेहर्यावर क्षणात उत्साह आला.”
हे सांगून झाल्यावर वडील तिला म्हणाले, “आता मला सांग, तुला यापैकी काय व्हायला आवडेल? दु:ख, दुर्दैव तुझ्या वाट्याला आल्यावर तू त्यावर कोणत्या प्रकारे मात करशील? तुला काय व्हायला आवडेल? अंडे, बटाटा की कॉफी? हे मात्र तू ठरवं.”
तात्पर्य : आपल्या आजूबाजूला सतत काहीतरी घडतं असतं. आपल्याबाबतही बरंच काही घडत असतं, पण महत्त्वाचा भाग आहे की आपण त्याकडे कसे पाहतो. आपण ते कसं घेतो आणि स्वत:ला कसं घडवतो हे आपल्याच हाती असतं. संकटातून तावूनसलाखून निघताना आपल्यातल वेगळेपण इतरांना सुखावणारं असावं.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.