उद्योजकता

स्वयंमालकी तत्त्वावरील उद्योग – Sole Proprietorship

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


याला इंग्रजीमध्ये Sole Proprietorship असे म्हणतात. उद्योग सुरू करण्याची ही सर्वात प्रचलित व सोपी पद्धत आहे. कागदपत्रांचे जंजाळ, नोंदणीची किचकट प्रक्रिया, विविध करांची नोंदणी व त्यामधील गुंतागुत याने नव्याने उद्योग सुरू करण्याचा विचार करत असलेल्याची उमेद कमी होऊ शकते.

कंपनी स्थापन करून उद्योग वाढवण्यासाठी लागणारा उद्योजकीय अनुभव हा सोल प्रोप्रायटरशीपमधून घेता येऊ शकतो. तसेच भागीदारी स्वरूपाचा उद्योग सुरू करण्यासाठीही हीच बाब लागू पडते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

भागीदारीमध्ये मुख्यत्वे: करून माणसांची पारख करण्याची क्षमता अंगात रूजवावी लागते. या सर्व दृष्टीने स्वत:चा उद्योग सुरू करायचा असल्यास सुरुवातील हा सर्वात योग्य पर्याय ठरू शकतो. मालकी तत्त्वावरील उद्योगात गुंतवणूक स्वत: मालकालाच करावी लागते. त्यामुळे भविष्यात ज्यांना उद्योजकीय जीवनाची सुरुवात करायची आहे, त्यांनी आधीपासूनच तसे आर्थिक नियोजन करणे सोयीचे होऊ शकते.

सोल प्रोप्रायटरशीपमध्ये मालक हा स्वत:च सर्व व्यवस्थापकीय गोष्टींना जबाबदार असतो. कायद्याच्या दृष्टीने मालक व त्याचा उद्योग म्हणजेच कंपनी या दोन्हींचे अस्तित्व एकच असते. त्यामुळे त्यातून होणारा नफा अथवा तोटा याला तो एकटाच जबाबदार असतो.

मालक स्वत:च सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकारी असल्यामुळे अशा प्रकारच्या उद्योगात निर्णयप्रक्रिया ही जलद असते. मात्र मालकाच्या निर्णयक्षमतेच्या मर्यादा कंपनीच्या मर्यादा ठरतात. त्याचे बरे-वाईट परिणाम कंपनीवर प्रत्यक्षरीत्या होतात. यातून सुलभ मार्ग म्हणजे उद्योजक हा अभ्यासू असावा तसेच त्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

स्वयं मालकी तत्त्वावरील उद्योगाचे फायदे

  • उद्योगाची सुरुवात करण्यास सोपा
  • व्यावसायिक गोपनीयता जपण्याच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षीत.
  • कामाच्या वेळा, कामाची पद्धत ठरवणे तसेच त्यात आवश्यकतेनुसार बदल करणे सोपे.
  • ग्राहक, वितरक, पुरवठादार यांच्याशी प्रत्यक्ष संबंध ठेवणे शक्य.
  • या प्रकारामध्ये कायद्याच्या दृष्टीने मालक आणि त्याचा व्यवसाय हे एकच असल्यामुळे केवळ आयकर भरणेच अनिवार्य असून उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेला कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचे बंधन नसते.

नोंदणी व अन्य बाबी

स्वयं मालकी तत्त्वावरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोंदणी आवश्यक नसते. मात्र तरीही काही परवाने घेणे व व्यवसायानुरूप करनोंदणी करणे उपयुक्त ठरते. बॅंकेत कंपनीच्या नावे चालू खाते (Current Account) सुरू करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

मालकाच्या नावाचे आयकर विभागाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. शिवाय पुरवठादारांकडून आगाऊ आयकर (T.D.S.) घ्यायचा असल्यास Tax Collection and Deduction Account Number (TAN) असणे गरजेचे ठरते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुकाने आस्थापने विभागाचा परवाना म्हणजेच गुमास्ता अत्यंत उपयोगी पडतो. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार याचे शूल्क ठरते.

व्यवसायाच्या स्वरूपानुसार GST वा अन्य करनोंदणी करून कर भरावे लागतात. यासाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कर सल्लागाराची मदत घेणे योग्य ठरेल.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!