Advertisement
उद्योगोपयोगी

स्वयं मालकी व्यवसाय | सुरुवात करायला सर्वात सोपा पर्याय

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

भारतात एकट्याने व्यवसाय सुरू करायची असल्यास Sole Proprietorship हा सर्वात सहज व सोपा पर्याय आहे. उद्योग सुरू करण्याची ही सर्वात प्रचलित व सोपी पद्धत आहे. कागदपत्रांचे जंजाळ, नोंदणीची किचकट प्रक्रिया, विविध करांची नोंदणी व त्यामधील गुंतागुत याने नव्याने उद्योग सुरू करण्याचा विचार करत असलेल्याची उमेद कमी होऊ शकते. कंपनी स्थापन करून उद्योग वाढवण्यासाठी लागणारा उद्योजकीय अनुभव हा सोल प्रोप्रायटरशीपमधून घेता येऊ शकतो. तसेच भागीदारी स्वरूपाचा उद्योग सुरू करण्यासाठीही हीच बाब लागू पडते. भागीदारीमध्ये मुख्यत्वे: करून माणसांची पारख करण्याची क्षमता अंगात रूजवावी लागते. या सर्व दृष्टीने स्वत:चा उद्योग सुरू करायचा असल्यास सुरुवातील हा सर्वात योग्य पर्याय ठरू शकतो.

मालकी तत्त्वावरील उद्योगात गुंतवणूक स्वत: मालकालाच करावी लागते. त्यामुळे भविष्यात ज्यांना उद्योजकीय जीवनाची सुरुवात करायची आहे, त्यांनी आधीपासूनच तसे आर्थिक नियोजन करणे सोयीचे होऊ शकते. सोल प्रोप्रायटरशीपमध्ये मालक हा स्वत:च सर्व व्यवस्थापकीय गोष्टींना जबाबदार असतो. कायद्याच्या दृष्टीने मालक व त्याचा व्यवसाय या दोन्हींचे अस्तित्व एकच असते. त्यामुळे त्यातून होणारा नफा अथवा तोटा याला तो एकटाच जबाबदार असतो.

मालक स्वत:च सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकारी असल्यामुळे या प्रकारातील व्यवसायात निर्णयप्रक्रिया ही जलद असते. मात्र मालकाच्या निर्णयक्षमतेच्या मर्यादा कंपनीच्या मर्यादा ठरतात. त्याचे बरे-वाईट परिणाम कंपनीवर प्रत्यक्षरीत्या होतात. यातून सुलभ मार्ग म्हणजे उद्योजक हा अभ्यासू असावा तसेच त्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

स्वयं मालकी तत्त्वावरील उद्योगाचे फायदे

    • उद्योगाची सुरुवात करण्यास सोपा
    • व्यावसायिक गोपनीयता जपण्याच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षीत.
    • कामाच्या वेळा, कामाची पद्धत ठरवणे तसेच त्यात आवश्यकतेनुसार बदल करणे सोपे.
    • ग्राहक, वितरक, पुरवठादार यांच्याशी प्रत्यक्ष संबंध ठेवणे शक्य.
  • या प्रकारामध्ये कायद्याच्या दृष्टीने मालक आणि त्याचा व्यवसाय हे एकच असल्यामुळे केवळ आयकर भरणेच अनिवार्य असून उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेला कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचे बंधन नसते.

नोंदणी व अन्य बाबी

मालकी तत्त्वावरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोंदणी आवश्यक नसते. ’उद्योग आधार’ म्हणजेच MSME नोंदणी करून तुम्ही प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करू शकता. ’उद्योग आधार’ हे फक्त दहा मिनिटांत एक ऑनलाइन फॉर्म भरून काढता येते. यासाठी गुगलवर ’उद्योग आधार’ शोधले असता त्याचे संकेतस्थळ येईल. ही नोंदणी करताना तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड व बॅंक खात्याचे तपशील सोबत घेऊन बसा.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


बॅंकेत व्यवसायाच्या नावे चालू खाते (Current Account) असणे गरजेचे आहे. उद्योग आधारच्या आधारे तुम्ही बॅंकेत खाते काढू शकता. व्यवसायाचे सर्व व्यवहार हे प्रामुख्याने बॅंकेद्वारे करणे अनेक दृष्टीन उपयोगाचे होऊ शकते. व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्या दिवसापासून स्वत:चा वैयक्तिक खर्च व व्यवसायाचा खर्च वेगळा ठेवा. तरच तुम्हाला नफा-तोटा किती होतो आहे, हे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

जी.एस.टी. नोंदणी

रुपये २० लाखांपर्यंत उलाढाल होईपर्यंत जी.एस.टी. नोंदणी ही बंधनकारक नाही आहे. मात्र व्यवसायवाढीची तयारी करून लवकरात लवकर जी.एस.टी. नोंदणी केलीत तर तुमच्या व्यवसायाला एक ब्रॅण्ड म्हणून उभे राहण्यास मदत होईल. जी.एस.टी. नोंदणी झाली असेल तरच तुम्ही Tax Invoice म्हणजे व्यावहारिक भाषेत ज्याला पक्के बिल म्हणतात, ते देता येईल. शिवाय तुम्ही जी.एस.टी.धारक असाल; तर तुम्हाला जिथे जिथे पुरवठादारांना जी.एस.टी. भरावा लागला आहे, त्याचा परतावा मिळू शकतो. त्यामुळे कररचनेपासून पळून काळा धंदा करण्यापेक्षा नव्या युगाचा, उघड माथ्याने करधारक म्हणून व्यवसाय करण्याला प्राधान्य द्या. पुरवठादारांकडून आगाऊ आयकर (T.D.S.) घ्यायचा असल्यास Tax Collection and Deduction Account Number (TAN) असणे गरजेचे ठरते.

पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुकाने आस्थापने विभागाचा परवाना म्हणजेच गुमास्ता हा प्रत्येक व्यवसायाला बंधनकारक होता; मात्र आता नऊपेक्षा अधिक कामगार असल्यावरच गुमास्ता काढावा लागतो.

नवउद्योजकांसाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुमचे व्यावसायिक ध्येय निश्चित असणे गरजेचे आहे व हे ध्येय तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये रीतसर मांडलेले असायला हवे. अनेक गोष्टी तुम्हाला स्मार्ट उद्योजकमध्ये मिळू शकतील, ज्या नाही मिळणार त्यासाठी गुगल देवता आहेच. अगदीच अडले तरच एखाद्या एजंटकडे जा. उगाच जास्तीचा खर्च करू नका.

व्यवसाय सुरू करण्यसाठी लागणार्‍या माहितीसाठी मला WhatsApp द्वारे केव्हाही संपर्क करू शकता.

– शैलेश राजपूत
९७७३३०१२९२
(लेखक ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे संपादक आहेत.)


इतर संबंधित लेख :

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: