मुलांमध्ये उद्योजकतेची बीजे पेरणे आवश्यक

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालानुसार आज शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 65 टक्के विद्यार्थी भविष्यात अशा नोकर्‍या करतील, ज्या सध्या अस्तित्वात नाहीत, असे नमूद आहे. यातून पारंपरिक शिक्षणापलीकडील कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

समस्यांचे निराकरण करणे, सर्जनशीलता, खंबीरपणा, तर्कशुद्ध विचारसरणी, अनुकूलता, आकलन, भावनिक विकास आणि नावीन्य यांसारख्या गुणांचा समावेश असलेली पिढी घडवणे ही एकविसाव्या शतकाची गरज आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना उद्योजकता शिकवणे म्हणजे फक्त भविष्यातील उद्योजक घडवणे नव्हे, तर त्यांच्या विचारसरणीत नावीन्य, आर्थिक प्रगती आणि सामाजिक विकासासाठी योगदान देण्याची मानसिकता रुजवणे आहे, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने वास्तविक जगातील आव्हानांचा सामना करू शकतील.

पीटर ड्रकर म्हणतो, “भविष्याचा अंदाज लावायचा असेल, तर ते घडवा.”


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

काहींना वाटते की लहान वयात उद्योजकता शिकवणे मुलांसाठी जड जाईल किंवा पारंपरिक शिक्षणावर परिणाम होईल, परंतु संशोधन दर्शवते की उद्योजकीय शिक्षण शैक्षणिक कामगिरी सुधारते आणि वाढीच्या मानसिकतेला चालना देते.

शाळांनी आणि समाजाने शिक्षणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. उद्योजकीय कार्यक्रम अभ्यासक्रमात सामील करून नव्या पिढीला स्वप्ने पाहण्याबरोबर ती साकारण्याचे धाडसही मिळावे. भविष्यातील प्रगती आणि नाविन्य याची चावी उद्योजकीय कौशल्ये असलेल्या तरुणांच्या हातात आहे.

रॉय टी. बेनेट म्हणतो, “फक्त शिकू नका, अनुभव घ्या. फक्त वाचू नका, समजा. फक्त विचार करू नका, चिंतन करा. फक्त स्वप्न पाहू नका, कृती करा.”

entrepreneurial kid

उद्योजकतेमुळे विकसित होणारी कौशल्ये

समस्या सोडवणे व तर्कशुद्ध विचार : गुजरातचा चौदा वर्षांचा हर्षवर्धन झाला याने लँडमाइन शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी ड्रोन विकसित केला.

नेतृत्व व संघकार्य : प्रकल्प हाताळताना विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व आणि सहकार्याच्या कौशल्यांचा विकास होतो.

आर्थिक साक्षरता व निर्णयक्षमता : लहान वयात बजेटिंग व आर्थिक नियोजन समजणे उपयुक्त ठरते.

संवाद व गोष्ट रंगवून सांगण्याची कला : आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता आत्मविश्वास वाढवते.

उद्योजकतेचे व्यापक फायदे

सामाजिक जबाबदारी : उद्योजकतेचे विद्यार्थी सामाजिक व पर्यावरणीय समस्यांचे समाधान शोधतात.

आर्थिक प्रगती : लहान वयात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे भविष्यातील नेते रोजगार निर्माण करतात.

सक्षमीकरण : मुलांना स्वतंत्र विचार, जबाबदारीने जोखीम घेणे व चुका करून शिकण्याची क्षमता प्राप्त होते.

entrepreneurship in kids

उद्योजकता शिकवण्याचे व्यावहारिक मार्ग

१. शालेय विषयांमध्ये उद्योजकीय विचार समाविष्ट करणे : गणितातून बजेटिंग शिकवा. कला वर्गात ब्रँडिंग शिकण्यासाठी लोगो किंवा पोस्टर तयार करा. वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करून उत्पादननिर्मिती प्रकल्प राबवा.

२. शाळेतील प्रकल्प : विद्यार्थ्यांना नकली व्यवसाय तयार करून ते चालवण्याचे प्रकल्प द्या. उदा. शाळा मेळाव्यात हस्तकलेच्या वस्तू विक्री करणे.

३. छोटी बाजारपेठ : विद्यार्थ्यांना उत्पादने तयार करून ती इतरांना विकायला प्रोत्साहित करा.

४. गेमिफाइड शिक्षण : BizWorld व Young Founders School सारख्या प्लॅटफॉर्मवर खेळांद्वारे उद्योजकीय संकल्पना शिकवा.

५. समाजात सहभाग : स्थानिक समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करा. उदा. पुनर्वापर मोहिमा, समुदाय सेवा अ‍ॅप्स.

६. पालकांचे योगदान : घरगुती खर्चाचे बजेटिंग शिकवून किंवा मुलांनी स्वतःच्या वस्तू विकून कमाई करायला प्रोत्साहित करा.

७. शिक्षकांनी नवीन अध्यापन पद्धती स्वीकाराव्या : तत्त्वज्ञान, तर्कशुद्ध विचारसरणी आणि नावीन्य यांना प्राधान्य द्या.

८. समस्या सोडवण्याच्या प्रक्रिया : विचारमंथन, नमुना तयार करणे, आणि सादरीकरण शिकवा.

९. प्रेरणादायी कथा आणि केस स्टडीज : यशस्वी उद्योजकांच्या कथा व त्यांचे प्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील.

१०. उद्योजकांसोबत सहकार्य : स्थानिक उद्योजक किंवा स्टार्टअप संस्थापकांसोबत गेस्ट सत्र आयोजित करा.

– दीपाली अकोलकर

(लेखिका उद्योजकता विकास क्षेत्रात कार्यरत असून याच क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या संचालक आहेत. याशिवाय त्या ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या समिती सदस्य आहेत.)

संपर्क : 9359133144

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top