Advertisement
उद्योजकता विकास

दलित, आदिवासी व महिला उद्योजकांसाठी ’स्टॅंडअप इंडिया’

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

narendra-modi-standup-india

देशातल्या तळागाळातल्या समाजात उद्योजकता वाढण्यासाठी केंद्र सरकारने स्टँड अप इंडिया अभियानाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान अनुसूचित जाती आणि जमाती, आदिवासी आणि या समाजातल्या महिलांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं म्हटलं जातंय.

स्टँड अप इंडिया अभियानाअंतर्गंत अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांना विशेष योजनेअंतर्गत व्यवसायासाठी अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलीय, जेणेकरून त्याच्यामध्ये उद्योजकता वाढीला लागेल. हे अर्थसाहाय्य कर्जरुपात मिळेल. त्यांना दहा लाख ते एक कोटी रुपयांचं कर्ज मिळू शकेल. या अभियानाअंतर्गत एक खिडकी योजनाही राबवण्यात येणार आहे, जेणेकरून कमीत कमी कागदपत्रांच्या बदल्यात सरकारी बँकांद्वारे या समाजातल्या नव्या उद्योजकांना तातडीनं कर्ज मिळू शकेल. शिवाय लोन देण्यापूर्वी  या उद्योजकांचं त्या त्या क्षेत्रातलं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यामुळे सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतो आहे.

पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश

आपले आदिवासी आणि दलित बांधव कधीपर्यंत नोकरी मिळण्याची वाट पाहत राहणार? शिवाय सरकार तरी किती लोकांना नोकरी देऊ शकणार आहे? जर हीच स्थिती राहिली, तर समाजातील दलित, पीडित, शोषित, वंचित बांधवांचं काय होणार? या समाजातील तरुणांचं काय होणार?


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


माझी ही धारणा आहे की, परमेश्वराने जी शक्ती, सामर्थ्य, समज, आकलन व कौशल्य अन्य समाजाला दिले आहे, तेवढेच दलित व आदिवासी बांधवांनासुद्धा दिले आहे; परंतु आपल्याला संधी मिळाली, मात्र या समाजाला संधी मिळाली नाही. संधी मिळताच आपण काही करू शकत असू, तर संधी मिळताच हे दलित व आदिवासी बांधवसुद्धा तितकेच उत्तम काम करू शकतात आणि देशासाठी बरंच काही योगदान देऊ शकतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समाजाच्या शेवटच्या टोकावर बसलेली जी व्यक्ती आहे तिलाही पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे.

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा!

त्याला कोणाच्या कृपेवर जगण्यासाठी असाहाय्य करता कामा नये. त्याला पुढे येण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. जर तो पुरुर्षार्थाने, परिश्रमाने साहस करण्यासाठी तयार असेल, त्याच्याकडे बुद्धी आहे, क्षमता आहे, त्याला थोडी सुविधा मिळाली, तर तो एक नवं, भव्य, स्वप्न साकार करू शकेल असं आपलं आयुष्य उभं करू शकतो. याच विचारांतून ‘स्टँड अप इंडिया’ ही कल्पना आहे.

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ही योजना घोषित केली होती. त्या वेळी म्हटल्याप्रमाणे भारतातील प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेने एक दलित किंवा आदिवासी युवक व एका महिला उद्यमीला नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा केला पाहिजे. देशात एक लाखहून अधिक ठिकाणी सुमारे सवा लाख बँकेच्या शाखा विस्तारल्या आहेत. या योजनेनुसार सवा लाख बँक शाखा जेव्हा कर्ज देतील तेव्हा सवा लाख ठिकाणी कोणता ना कोणता व्यावसायिक उपक्रम सुरू होईल. आज जे हात नोकरी मागण्यासाठी पुढे होतात, ते नोकरी देण्यासाठी पुढे सरसावतील.

‘स्टँडअप इंडिया’ योजना ही ‘मुद्रा’ योजनेच्याही पुढे जात या योजनेनुसार १० लाख ते १ कोटींपर्यंत कर्ज दिले जाईल. प्रत्येक बँक शाखेच्या अखत्यारीत हे कर्जवितरण असल्यामुळे त्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच नवे उद्योग सुरू होतील आणि अशा प्रकारे संपूर्ण देशभरात नवे उद्योग सुरू होतील.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: