उद्योगसंधी

तुम्हीही सुरू करू शकता ई-कॉमर्स व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ई-कॉमर्स हा माहिती तंत्रज्ञानाशी निगडित आधुनिक व्यवसाय आहे. यामध्ये ऑनलाइन विक्री करता येऊ शकेल असे वेब पोर्टल तयार करून घेणे गरजेचे आहे. फ्लिपकार्ट वा स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स वेब पोर्टल ही सर्व प्रकारच्या वस्तू विकतात, तर येप-मी सारख्या वेब पोर्टल्स कपड्यांसारखे एखादेच उत्पादन विकते.

ई-बे हे वेब पोर्टल प्रत्येक उत्पादकाला आपले उत्पादन ई-बेच्या माध्यमातून ऑनलाइन विकण्याची संधी देते. आपणही वरीलप्रमाणे कोणते उत्पादन कशा प्रकारे विकायचे आहे त्यानुसार वेब पोर्टल तयार करून घेऊ शकता. वेब पोर्टल तयार करण्याचा खर्च आपल्या गरजेनुसार सुमारे 20 हजार रुपयांपासून काही लाखांपर्यंत असू शकतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

वेब पोर्टलवर आलेली मागणी त्या वस्तूच्या उत्पादकाकडे पाठवणे. उत्पादकाने ग्राहकाला माल पुरवला का आणि ग्राहकाला वस्तू मिळाली का याचा पाठपुरावा करणे. यामध्ये ग्राहकाकडून बिलाचे पैसे घेण्याचे दोन प्रकार असू शकतात.

एक म्हणजे जेव्हा तो ऑनलाइन खरेदी करतो तेव्हाच तेथे ऑनलाइन पेमेंट करू शकतो किंवा ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ म्हणजे वस्तू ग्राहकाला मिळाल्यावर पैसे घेऊ शकतो. ग्राहकाकडून आलेल्या पैशातून उत्पादकाला त्याचे पैसे दिले जातात.

या व्यवसायामध्ये एक वेब पोर्टल आणि सक्षम संपर्क यंत्रणा असणे गरजेचे आहे. तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ठरावीक काही उत्पादने विकत असाल तर तुम्हाला तशी ब्रॅण्डिंग करणे सोपे जाईल. त्याचबरोबर पोर्टलवर अधिकाधिक ग्राहकांनी यावे यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग होणे गरजेचे आहे.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!