उद्योगवार्ता

‘गेल पंख’ अंतर्गत मिळवू शकता आपल्या स्टार्टअपसाठी फंडिंग अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१८

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी तेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘गेल इंडिया’ने भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याचे घोषित केले आहे. ज्यांच्याकडे स्टार्टअप आयडिया आहे ते ‘गेल इंडिया’च्या ‘गेल पंख’ या योजनेत सहभागी होऊन गुंतवणुकीसाठी प्रस्ताव देऊ शकतात. मात्र या कल्पनेत पुढील घटकांचा प्रामुख्याने समावेश असावा :

Advertisement

नैसर्गिक वायू

  • नैसर्गिक वायूचे नवीन वापर
  • शहरांमधील गॅसचे वितरण
  • नैसर्गिक वायूची साठवण
  • गॅस सोर्सिंग आणि ऑप्टिमायझेशन
  • पाइपलाइन मधील विविध घटक आणि त्याची देखभाल

WhatsApp द्वारे ‘स्मार्ट उद्योजक’ वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : https://bit.ly/2IPPA5w

पेट्रोकेमिकल्स

  • पॉलिमर उत्पादनांचे ऑप्टिमायझेशन
  • नवीन पॉलिमर ग्रेड, उत्प्रेरक तयार करणे तसेच अस्तित्वात असलेल्या उत्प्रेरकांचे स्वदेशीकरण
  • पॉलिमरचे नवीन वापर

या अंतर्गत विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘गेल इंडिया’ने ५०कोटींचा कॉर्पस फंड उभा केला आहे. उत्तमोत्तम कल्पना जर मांडण्यात आल्या तर या निधीत आणखी वाढही करण्याचा त्यांचा विचार आहे.

या सर्वाचे मूळ उद्दिष्ट हे नवनवीन स्टार्टअप्स ज्यांत भविष्यात विशाल रूप धारण करण्याची क्षमता आहे, अशांना सहकार्य करणे हे आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या फेरीत ४७ प्रस्ताव त्यांसमोर आले व त्यांतील दहा स्टार्टअप्स मध्ये ‘गेल’ने गुंतवणूक केली आहे. स्टार्टअप्सना आपले प्रस्ताव मांडण्यासाठी ‘गेल’ने आता पुन्हा आपले दरवाजे उघडले आहेत.

या दुसऱ्या फेरी अंतर्गत १ जून २०१८ ते २० जून २०१८ दरम्यान स्टार्टअप्स आपले प्रस्ताव ‘गेल’कडे जमा करू शकतात. पात्रता, शॉर्टलिस्टिंग, मूल्यमापन व मान्यता अशा चार टप्यांतून हे प्रस्ताव जातील. या योजनेत प्रस्ताव सादर करण्यासाठी https://gailebank.gail.co.in/GUSI/index.aspx या संकेतस्थळाला भेट द्या.


‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) फक्त डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd

Help-Desk
%d bloggers like this: