Advertisement
उद्योगवार्ता

‘स्टार्टअप इंडिया’चा शिक्षणविषयक युती कार्यक्रम

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

देशातल्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘स्टार्टअप इंडिया’ने स्टार्टअप शैक्षणिक युती कार्यक्रम सुरू केला आहे. एकाच क्षेत्रात काम करणारे विद्‌वतजन आणि स्टार्टअपसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही उत्तम संधी राहणार आहे.

वैज्ञानिक संशोधन आणि त्याचा औद्योगिक वापर यातली तफावत कमी करण्याचा त्याचबरोबर या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढवून त्याचा परिणाम विस्तृत करण्याचा यामागचा उद्देश आहे.

शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील पूल निर्मितीचे काम स्टार्टअप करीत असून ‘स्टार्टअप इंडिया’चा कृती कार्यक्रम ज्यावर आधारित आहे त्या उद्योग शिक्षण भागीदारी आणि निर्मिती यावरील तिसरा स्तंभ उभारण्याचे काम या क्षेत्रातील युती करीत आहे.

स्टार्टअप शैक्षणिक आघाडीचा पहिला टप्पा रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी ॲन्ड रिसोर्सेस इन्स्टीट्युट, कौन्सिल ऑन एनर्जी, एनव्हायरमेंट ॲन्ड वॉटर आणि टेरी स्कूल ऑफ ॲडव्हान्स स्टडीज यांच्यातल्या भागीदाराने सुरू झाला. नवीकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, आरोग्य यासारख्या क्षेत्रातले या संस्थेतले तज्ञ, संबंधित क्षेत्रातल्या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन पुरवणार आहेत.


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: