स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करू इच्छिताय तर या गोष्टी लक्षात घ्या


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कोणताही व्यवसाय असो तो सुरू करण्यापुर्वी प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावीच लागते. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करताना आपल्याला आपले उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे. यशाचे गणित आपल्याला निश्चित असेल तर कोणताही व्यवसाय सगळ्याच आघाड्यांवर यशस्वी होऊ शकतो.

आज अनेक तरुण आपल्या नोकरीला रामराम ठोकून स्टार्टअपकडे वळत आहेत. योग्य पद्धती आणि योग्य धोरणांना अंगिकारले तर स्टार्टअप यशस्वी होतो. अश्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींचा अभ्यास आणि माहिती लक्षात घ्यायला हवी.

उद्योग समजून घ्या : आपण कोणत्याही उद्योगात गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर प्रथम तो व्यवसाय समजून घ्या. ज्या ज्या स्रोत च्या माध्यमातून आपल्याला याची माहिती मिळेल ती मिळवा. सध्याच्या काळात गूगल यासाठी आपल्याला खूप मदत करेल. आपण ज्या उद्योगात गुंतवणूक करतोय त्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसेल तर गुंतवणूक जोखमीची होईल.

टीम : एक व्यक्ती अनेक काम करत असते परंतु तेच काम संघ म्हणजेच टीम ने केले तर जास्त परिणामकारक ठरू शकते तसेच सुलभही होते. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यवसायाशी संबंधित टीम सदस्यांविषयी संपूर्ण माहिती मिळवा कारण स्टार्टअप यशस्वी करण्यात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. त्या प्रत्येकाची जबाबदारी काय ते ती कशी सांभाळतात हेही महत्त्वाचे असते ते जाणून घ्या मगच गुंतवणूक करा.

प्रतिस्पर्धी ओळखा: कोणत्याही संस्था किंवा कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यवसायात किती स्पर्धा आहे याची माहिती मिळवा. कोण किती जबरदस्त आव्हान देतो हे आपल्याला माहीत असावे. अश्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाताना आपण गुंतवणूक करू ती कंपनी कोणती धोरणं अवलंबते, कोणती रणनिती तयार करते हेही आपल्याला ठाऊक हवे.

कंपनीचे मूल्यांकन : आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूकीचा विचार करीत आहात त्याचे मूल्यांकन करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. आपल्याला भविष्यातील नफ्याबद्दल यातून कल्पना येते. कंपनीत किती स्टॉक उपलब्ध आहे, कंपनीत किती लोक गुंतवणूक करतात, कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी या सर्व बाबींचा कसून तपास केला पाहिजे. भविष्यात त्या कंपनीमार्फत अधिक चांगले आणि नफा मिळविण्यासाठी कंपनीचे मूल्यांकन करणे फार महत्वाचे आहे.

सल्लागारांची तपासणी करा : प्रत्येक व्यवसायाला म्हणजेच कंपनीला सल्लागाराची गरज असते त्यामुळे त्यांचे सल्लागार असतात. कंपनीचे वेळोवेळी योग्य मूल्यांकन करून जिथे त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता असते तिथे ती देण्यासाठी हे सल्लागार काम करतात. त्यांच्या सल्ल्यावरच कंपनीचे यश अपयश ठरते असे म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनीचा सल्लागार कोण आहे हे जाणून घ्या. तो सल्लागार किती सक्षम आहे हे तपास. गुंतवणूकीपूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की कंपनीचा सल्लागार लोकांना कशी मदत करतो आणि त्यांना कोणत्या प्रकारचे सल्ला देतो.

कंपनीची आर्थिक तपासणी : व्यवसायाचा कणा असतो तो म्हणजे आर्थिक परिस्थिती. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करताना तिच्या व्यवहारांची आपल्याला पूर्ण माहिती हवी. कंपनी पैसे कसे आणि कुठे वापरते. आर्थिक नियोजन कसे करते. त्याचा लेखाजोखा कसा ठेवते हे सगळे माहिती करून घ्यावे. भविष्यात नुकसान होणार नाही याची काळजी घेणे कधीही चांगले.

भविष्यातील निधीशी संबंधित योजनांची छाननी करा : कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्या भविष्यातील निधीशी संबंधित योजनांची आपल्याला संपूर्ण माहिती असणे खूप महत्वाचे आहे. भविष्यात त्या कंपनीकडून अधिक आणि योग्य निधी कोठे खर्च केला जाईल याबद्दल आपल्याकडे ठोस माहिती असावी.

तो त्याच्या स्टार्टअपच्या विकास, विपणन आणि वाढीसाठी निधी कसा खर्च करणार आहे. आपल्याला या गोष्टींचे पूर्ण ज्ञान देखील असले पाहिजे. भविष्यात कंपनीकडून किती आणि किती प्रमाणात आर्थिक खर्च केला जाईल याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

कंपनीची कायदेशीर कागदपत्रे तपासा : कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी कायदेशीर कागदपत्रे तपासणे हा आपला पहिला हक्क आहे. त्या कंपनीचा संस्थापक कोण आहे, गुंतवणूकदार कोण आहे, नियंत्रक आहे, या कंपनीच्या कायदेशीर दस्तऐवजाद्वारे आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती मिळवू शकता. कंपनीत सामील होण्यापूर्वी, त्याचे कायदेशीर दस्तऐवज तपासणे आपले कर्तव्य आहे जेणेकरुन आपल्याला भविष्यात त्याचे चटके बसू नयेत.

कंपनीशी कनेक्ट होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या क्षमतेचे उत्कृष्ट ज्ञान असले पाहिजे, जेणेकरुन ते कंपनीच्या यशासाठी त्यांचे संपूर्ण योगदान देऊ शकतील. म्हणूनच, कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावरच आपल्याला ही माहिती मिळू शकते.

कोणत्याही कंपनीत गुंतवणूकीच्या बदल्यात वाजवी नफा मिळवण्यासाठी, वरील बाबींची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण एखाद्या कंपनीत गुंतवणूक करणार असाल आणि या सर्व बाबींची योग्यता फिट असेल तर आपण त्या कंपनीमध्ये सहजगत्या गुंतवणूक करा, कारण भविष्यात अशा कंपनीत सामील झाल्यावर आपल्याला वाजवी नफा मिळू शकेल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?