Advertisement
बिझनेस लिजेंड्स

सेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


अनेक वर्षांच्या अनुभवानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की ज्यांना नवीन कार घ्यायची असते, त्यांची थोडी द्विधा मनःस्थिति असते. लोकांना वाटतं की नवीन कार घेण्यापूर्वी एखादी जुनी कार घेऊन ती काही काळ चालवून बघावी.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

तरुणांना कारची खूपच क्रेझ असते पण अडचण असते पैशाची. मग त्यांचा कल जुनी कार घेण्याकडे असतो, कारण ती त्यांच्या बजेटमध्ये बसते. वापरलेल्या कार विकत घेण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत, पण त्यावर विश्वास ठेवणं सर्वसाधारण लोकांना कठीण वाटतं.

सेकंड-हँड कार खरेदी करणार्‍या लोकांसाठी प्रीमियम अनुभव निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जुन्या पण चांगल्या कंडिशनमध्ये असलेल्या गाड्या खरेदी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेतला.

आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी, स्वतः एक उद्योजक आणि गुंतवणूकदार नीरज सिंग यांनी २०१५ मध्ये ‘स्पिनी’ लाँच केले. तरुण भारतीयांसाठी कार ओनरशिप अडचणींवर मात करण्याच्या त्यांच्या इच्छेतून कंपनीचा जन्म झाला.

नीरजनी स्वतःच्या निधीतून ५ लाखांच्या भांडवलावर हा व्यवसाय सुरू केला. आज ‘स्पिनी’ला अनेक फंडिंग कंपन्यांकडून निधी दिला जातो आणि त्याने सुमारे ४१८ कोटी रुपये उभे केले आहेत.

‘स्पिनी’ हे कार इन्व्हेंटरीपासून रिटेल अनुभवापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा प्लॅटफॉर्म असल्याने लोकांना त्यांच्यावर फायनान्स मिळवणे, कार ऑर्डर करणे इत्यादी कामे सुलभतेने करता येतात. ‘स्पिनी’ने १० हजारहून अधिक ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या सहा शहरांमध्ये ‘स्पिनी’ कार्यरत आहे, ज्यामुळे पाचशेहून अधिक लोकांना रोजगार मिळतो.

केवळ चार टक्के लोक वापरलेली कार खरेदी करण्याच्या त्यांच्या अनुभवावर समाधानी आहेत. नीरज सिंग सांगतात. आम्ही विश्वास आणि पारदर्शकता प्रदान करत आहोत. आमचा उद्देश हा आहे की खरेदीदार जुनी कार त्याच आत्मविश्वासाने खरेदी करू शकला पाहिजे, जितक्या सहजतेने नवीन कार खरेदी करतो.

‘स्पिनी’वर कार खरेदी करणं खूपच सोप्पं करण्यात आलं आहे. पहिली पायरी म्हणजे ऑनलाइन सूचीबद्ध केलेल्या बाराशेपेक्षा अधिक तपासलेल्या कारमधून हवी असलेली कार निवडणे. अधिक माहितीपूर्ण निवड करण्यासाठी एखादी व्यक्ती व्हर्च्युअल टूरची निवड करू शकते. यानंतर ग्राहक पूर्णतः सॅनिटाइज्ड कारची होम टेस्ट ड्राइव्ह बुक करतात. ज्यात सुरक्षा किटदेखील असते.

अंतिम टप्प्यात आवश्यक कागदपत्रे आणि तपशील अपलोड करण्यात येतो. एकदा का ‘स्पिनी’ अ‍ॅश्युअर्ड कारसाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्या, की कोणतेही प्रश्न न विचारता, पाच दिवसांच्या मनी बॅक गॅरंटीसह कार घरापर्यंत पोहोचवली जाते. कारचे तपशील पारदर्शक असल्याची खात्री करण्यासाठी कंपनीकडे दोनशे पॉइंट तपासणी सिस्टिम आहे.

आमचे लक्ष सर्व व्यवहार अखंड आणि पारदर्शक करण्यावर आहे. ग्राहकांसाठी कार खरेदीचा अनुभव सोपा आणि आनंददायी बनवण्याचा आमचा उद्देश आहे, असे नीरज सिंग सांगतात.

‘स्पिनी’च्या वेबसाइटवर कारची प्रत्येक बाजू दाखवण्यासाठी एचडी प्रतिमा उपलब्ध असतात. इतकंच नव्हे तर ग्राहकांना हव्या असलेल्या गाडीचा संपूर्ण इतिहासदेखील उपलब्ध असतो. आता तर ग्राहक आणि ‘स्पिनी’चे अधिकारी यांच्यात रिअल-टाइम व्हिडिओ संवादसुद्धा शक्य झाला आहे.

‘स्पिनी’ने मार्च २०२० मध्ये नंदन नीलेकणीच्या फंडामेंटम भागीदारीतून रु. ३५० कोटींचे नवीन भांडवल उभे केले. त्या आधी ब्लूम व्हेंचर्स, स्माईल व्हेंचर्स, क्सेल, सैफ पार्टनर्स आणि ल्टेरिया कॅपिटलकडून १०३ कोटी रुपये इतका निधी मिळवला होता.

आता कार घेणं हे फक्त एक स्वप्न राहिलेलं नाही. लोकांच्या लक्षात आलं आहे की बदलत्या काळानुसार स्वतःची कार असणं आवश्यक आहे. ७० टक्क्यांहून अधिक ४० वर्षांखालील भारतीय वापरलेल्या कार खरेदी करत आहेत, निरज सिंग सांगतात.

ग्राहकांची तसेच आमच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही होम टेस्ट ड्राइव्ह आणि होम डिलिव्हरी यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे ग्राहकांच्या वर्तनात आणि विचारात चांगले बदल घडत आहेत. मार्केटमधील कोणत्याही नवीन घडामोडींची पूर्तता करण्यासाठी ‘स्पिनी’ सज्ज आहे, अशी ग्वाही निरज सिंग देतात.

– चंद्रशेखर मराठे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!