उद्योगवार्ता उद्योजकता विकास

२८ जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारचा ‘स्टार्टअप सप्ताह’

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’द्वारे येत्या २८ जानेवारीपासून १ फेब्रुवारीपर्यंत ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मुंबईत आयोजित केला जात आहे. यामध्ये राज्यातील विविध स्टार्टअप्सना आपल्या अभिनव संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.

राज्य सरकारच्या या उपक्रमात आपली संकल्पना सादर करण्यासाठी प्रत्येक स्टार्टअप अर्ज करू शकतो. त्यापैकी निवड झालेल्या शंभर अभिनव संकल्पना स्टार्टअप्सना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडता येतील. शिवाय यांच्यातील पहिल्या २४ स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांची कामेही सरकारकडून देण्यात येणार आहेत. शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, कृषी, प्रदूषणविरहित ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास आदी क्षेत्रातील स्टार्टअप्सना विशेष प्राधान्य देण्यात येईल.

Advertisement

या सप्ताहात विविध प्रदर्शने, कार्यशाळा, व्हेंचर कॅपिटालिस्टना भेटण्याची संधी, चर्चा, नेटवर्किंग इव्हेंट्स, व्याख्यानामाला आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारीपर्यंत इच्छुक स्टार्टअप्स www.mahastartupweek.msins.in या वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

– टीम स्मार्ट उद्योजक

Help-Desk
%d bloggers like this: