राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीची घोषणा ४ जुलै रोजी

स्टार्टअप व्यवस्थेला पाठबळ देण्यासंदर्भातल्या क्रमवारीच्या तिसऱ्या भागाचे निकाल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्रोद्योगमंत्री पियुष गोयल ४ जुलै रोजी नवी दिल्लीत एका पुरस्कार कार्यक्रमात जाहीर करणार आहेत.

भारताच्या स्पर्धात्मकता आणि सहकारी संघवादाच्या दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप क्रमवारीच्या तिसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलं होतं. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्टार्टअप्स उद्योगांचा विकास करण्यासाठी नियम शिथिल करावेत आणि स्टार्टअप व्यवस्थेला बळकटी द्यावी, या उद्देशाने २०१८ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

या वर्षी या उपक्रमामध्ये एकूण २४ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या २५ च्या तुलनेत या संख्येत या वर्षी वाढ झाली आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असून त्यापैकी २९ राज्यांची स्वतःचे स्टार्टअप पोर्टलही आहेत. २०१६ मध्ये स्टार्टअप धोरण असलेली केवळ ४ राज्ये/ केंद्रशासित प्रदेश होते.

यावेळी आयोजित केलेल्या फेरीमध्ये स्टार्टअप्स २६ कृती मुद्यांसह स्टार्टअप्सना आणि या पूरक प्रणालीतील हितधारकांना नियामक, धोरणविषयक आणि आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी अत्यावश्यक असलेली ७ प्रमुख सुधारणा क्षेत्रे होती.

तिसऱ्या भागामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान पुरवलेल्या पाठबळाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यांनी या संदर्भात सादर केलेल्या सामग्रीचे सुमारे ६ महिने मूल्यमापन करण्यात आले आणि ७,२०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांकडून १३ भाषांमध्ये अभिप्राय संकलित करण्यात आले.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?