Advertisement
उद्योगोपयोगी

Statutory Compliance आणि Compliance Calendar

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपल्या देशात असे बरेच नियम व कायदे आहेत ज्यांचे पालन कुठल्याही संस्थेला करावे लागते. उदा. Taxation laws, Personnel Laws, Companies Act, LLP Act, सेबी, फेमा इत्यादी. एवढे कायदे आणि त्यात होणारे सतत बदल, यामुळे कोणत्याही संस्थेने त्यांचे पालन करण्यात सावधगिरी बाळगली पाहिजे.

जर उद्योजक हा फक्त विक्री आणि ऑपरेशन्समध्ये व्यस्त असेल आणि कायद्याचे योग्य पालन करत नसेल, तर हे गंभीर आहे, कारण केवळ व्याज आणि दंडाची समस्याच उद्भवणार नाही; तर काही प्रकरणांमध्ये खटलाही चालवला जाईल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

यामुळे प्रतिष्ठेचे नुकसान होईल आणि अनुपालनात परत येण्यासाठी वेळ, पैसे आणि प्रयत्न, हे सगळेच खर्च होतील. याच हेतूसाठी, कोणत्याही संघटनेने प्रत्येक वेळी सर्व अनुपालन आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत. असे करण्यात अनुपालन दिनदर्शिका किंवा कॅलेंडर एक मौल्यवान साधन आहे.

कंप्लायन्स कॅलेंडर म्हणजे काय?

अनुपालन दिनदर्शिका एक अशी प्रक्रिया आहे जी योग्य वेळा, आर्थिक आणि इतर नियामक आवश्यकता आणि त्यांच्याशी संबंधित अनुपालनांचा रेकॉर्ड ठेवते. अनुपालन दिनदर्शिका नुसती योग्य प्रकारे बनवून उपयोग नाही तर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली पाहिजे.

अनुपालन कॅलेंडरमध्ये काय समाविष्ट करावे?

१. टाइमलाइनसह करावयाची कामे उदा. दैनंदिन, मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक.
२. ठरावीक व्यक्तींना त्यांच्या अनुपालनासाठी दिलेली जबाबदारी – डेटाचे आकलन, आवश्यक रक्कम भरणे आणि विवरणपत्र भरणे.
३ . अनुपालन केयल्यानंतर त्याचा तपशील लिहिणे उदाहरणार्थ तारीख, भरलेली किंवा उर्वरीत रक्कम इत्यादी.४. व्यवस्थापनातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचे पुनरावलोकन आणि सही व शेरे.

अनुपालन कॅलेंडरचे काही फायदे :

१. योग्यप्रकारे पालन केल्यास व्याज आणि दंड लागणार नाहीत आणि संस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण होईल. तसेच मालकास खटल्यासारख्या गंभीर कारवाईचा सामना करावा लागत नाही.
२. अनुपालन दिनदर्शिका आपल्या संस्थेच्या अनुपालन गरजा पूर्ण करण्यासाठी योजना आखण्याचा मार्ग देतात, ज्यामुळे आपल्याला डेटा एकत्रित करण्याची किंवा जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधनांचे वाटप करण्याची संधी मिळते.

३. अनुपालन कॅलेंडर्स पारदर्शकता वाढवतात आणि अनुपालन प्रगतीवर सहजपणे नजर ठेवण्यासाठी आणि संस्थेमध्ये दृश्यमानता वाढवण्याचा एक मार्ग देतात.
४. अनुपालन दिनदर्शिका संस्थांना अनुपालन ऑडिट आणि अहवाल तयार करण्यास मदत करतात.
५. फॅक्टरीमध्ये कायद्यांचे अनुपालन केले तर कर्मचाऱयांना जखमी होण्याचा धोका कमी होतो.

अनुपालन कॅलेंडर कसे तयार कराल?

१. वैधानिक अनुपालनांची काळजी घेण्यासाठी विशिष्ट व्यक्ती किंवा एखादे विभाग नियुक्त करा. जर हे शक्य नसेल तर एखादा तज्ज्ञ किंवा सल्लागाराची नेमणूक करण्याचा विचार होऊ शकतो.
२. संस्थेच्या व्यवसाय नियंत्रण वातावरणाचा आढावा जबाबदार व्यक्तीने घ्यावा.
३. लागू असलेल्या कायद्यांचा विचार करून अनुपालन कॅलेंडर तयार करायला हवे.

४. अनुपालन कॅलेंडर याची अंमलबजावणी, पुनरावलोकन आणि सुधारणा करण्याचे धोरण आणि त्याची प्रक्रिया लिहून ठेवायला पाहिजे.
५. नवीन कायदे किंवा अस्तित्वात असलेले कायदे यामध्ये असलेले बदल, यांचा समावेश करायला हवा.
६. ऑटोमेशन एक्सप्लोर करा, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला अनुपालनाची आठवण केली जाईल.

आधी नमूद केल्याप्रमाणे, प्रत्येक संस्थेने वैधानिक अनुपालनास महत्त्व दिले पाहिजे आणि असे करताना त्यांनी एक प्रभावी अनुपालन कॅलेंडर डिझाइन करून अंमलात आणले पाहिजे.

– सीए जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!