‘व्यवसाय’ हा धर्म आणि ‘ग्राहक’ हा देव

जेराल्ड रॅटनर १९८४ मध्ये त्याच्या कुटुंबाच्या अलंकारांच्या व्यवसायात आला. उत्तम विक्रेता असल्याने सहा वर्षांत त्याने आपल्या कंपनीची उलाढाल चांगलीच वाढवली. तो इतका यशस्वी झाला की प्रत्येक मॉलमध्ये त्याचे एकतरी दुकान असायचेच.

त्याची दुकाने सामान्य लोकांना परवडतील असे दागिने विकत. त्यामुळे मध्यमवर्गीय, कामगार, तरुण-तरुणी हे यांचे मोठे आणि नियमित ग्राहक होते. रत्नेर कोट्याधीश झाला होता. उत्तम राहणे, छानछऊकी, किमती गाड्या आणि सहली असे त्याचे जीवन उत्तम चालले होते. त्यात त्याला अवदसा आठवली.

२३ एप्रिल १९९१ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टरस या अतिशय प्रतिष्ठित संस्थेत त्याला वक्ता म्हणून बोलावले गेले. त्याच्या भाषणास ६ हजारपेक्षा जास्त व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. त्याच्या यशाची रहस्ये जाणून घेण्यास ते उत्सुक होते.

रॅटनर
जेराल्ड रॅटनर

रॅटनरने तडाखेबंद भाषण केले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बहुधा हाच कडकडाट त्याच्या कानात हवा भरून गेला. भाषणानंतर त्याला एक प्रश्न विचारला गेला.

तुम्ही आपली उत्पादने इतक्या कमी किमतीत कशी काय विकू शकता?

उत्तर आले अहो, हा सगळा कचरा माल आहे हो!

सगळे प्रेक्षागृह स्तब्ध झाले. एक मोठा व्यावसायिक आपल्या उत्पादनाबद्दल असे बोलतो? असे कसे शक्य आहे? परंतु थांबतो तर तो रॅटनर कसला.

आमची उत्पादने रस्त्यावरच्या सँडविच एवढ्याच किमतीत आम्ही विकतो. मात्र सँडविच जास्त वेळ टिकते. आपला मुद्दा त्याने प्रेक्षकांना पटवून दिला.

दुसर्‍या दिवशी प्रमुख वर्तमानपत्रांनी ही बातमी मुखपृष्ठवर छापली आणि रत्नेरची घसरण चालू झाली. स्टोअर्स मागून स्टोअर्स बंद होऊ लागली आणि वर्षभरात त्याला सगळं व्यवसाय गुंडाळावा लागला. त्याला जवळजवळ ५०० करोड रुपयांचा तोटा झाला. त्याचे घर, महागड्या गाड्या, उत्तम कपडे सगळे विकले गेले.

काही लोक म्हणतात, बदनाम झालो तर काय, नाव तर झाले, परंतु हा निकष येथे कसा लागू पडला बघा. आपल्या सगळ्या जीवनाची कमाई, फक्त एका मिनिटात, एका बेजबाबदार वक्तव्याने पूर्ण धुळीला मिळवली. यामुळे त्याने स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. यातून अशी मोठी गफलत करणे यास रॅटनर करणे असा वाक्प्रचार प्रचलित झाला.

हे एकमेव उदाहरण मात्र नाही. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे मिळतील. अस्वच्छता पाळणारा ठाण्याचा प्रसिद्ध पाणीपुरीवाला, अतिलोभ झाल्याने वेगळीच उत्पादने विकणारा पानवाला, जेवणात बुरशी आलेली जिलेबी वापरल्यामुळे बंद झालेले उपहारगृह किंवा हवा शुद्ध करण्याच्या फिल्टरमध्ये कंजुषी केल्याने बंद पडलेली मोबाईल फोनची कंपनी किंवा वारसाहक्काने आलेली अब्जोवधींची संपत्ती उधळून फक्त दहा वर्षात कर्जबाजारी झालेला उद्योगपती अशी किती उदाहरणे देऊ.

तेव्हा व्यवसाय हा धर्म आहे आणि ग्राहक हा देव आहे हे पक्के धरून चालायचे. आपल्याकडे प्रसिद्ध वचन आहे ‘धरमो रक्षति रक्षिता’ आपला धर्म म्हणजे आपले जीवनकर्तव्य. धर्माची रक्षा केल्यासच धर्म आपली रक्षा करतो.

आपण आपल्या व्यवसायाची निगा राखली, संगोपन केले, त्याबद्दल चांगले बोललो, त्याचा अभिमान जपला, ग्राहकास उत्तम मूल्य द्यायचा प्रयत्न केला तरच तो व्यवसाय आपल्याला तारणार आहे, आपली भरभराट करण्यास कारणीभूत ठरणार आहे. तेव्हाच आपण आपला व्यवसाय आपल्याला चांगले फळ देईल.

जे कराल ते नेक करा, चांगले करा, अभिमानाने करा. तुमचे काम; तुमचे काम म्हणून ओळखले गेले पाहिजे, नावाजले गेले पाहिजे. ब्रॅण्डिंग ब्रॅण्डिंग म्हणजे अजून काय असते बरे?

‘रॅटनर इफेक्ट’पासून दूर राहा.

– आनंद घुर्ये
9820489416

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?