स्टीव्ह जॉब्स ह्यांची वेगळी ओळख करून देण्याची काय आवश्यकता? जगातील टेक्नॉलॉजीमधील त्यांचे योगदान हे अमाप आहे आणि ते कार्यरत असताना त्यांनी जगातील जवळजवळ सर्वच लोकांना आपले ग्राहक केले होते.
स्टीव्ह जॉब्स हे फक्त त्यांच्या तंत्रज्ञानातील शोधांसाठीच नाही, तर गोष्टी कशा असाव्यात, याबद्दलच्या प्रथमदर्शनी अव्यवहार्य वाटणार्या कल्पना पूर्ण करणारी उत्पादने निर्माण करायला भाग पाडणार्या त्यांच्या कार्यशैलीच्या बाबतीतसुद्धा अद्वितीय होते.
झेन, सुलेखन आणि किमानता यावरील त्यांच्या प्रेमाने इतरांना अशक्यप्राय वाटणारी उत्पादने निर्माण करायला भाग पाडले. काही लोक याला क्रूरता म्हणतील, पण कर्मचार्यांबद्दलच्या उच्च कोटीच्या गुणवत्तेच्या अपेक्षेतूनच परिणामी कोणीही; अगदी त्यांचा राग सहन केलेलेसुद्धा नाकारू शकले नाहीत, अशी उत्तमोत्तम उत्पादने निर्माण झाली.
इतर शैलींचा विचार करता आपले जीवनध्येय आणि करियरबद्दल दिशादर्शन याबद्दलचे त्यांचे विचार धरून त्यांच्या विचारसरणीमध्ये उपयुक्तता आणि सौंदर्य यांना एकत्रित आणणारी उत्पादने बनवण्याचे त्यांचे आयुष्याचे तत्वज्ञान खोलवर उतरल्याचे दिसते.
स्टीव्ह जॉब्स हे असं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते, जे अमेरिकन शोधक आणि उद्योजक होते, जे ‘अॅपल’ इनकॉर्पोरेशनचे सहसंस्थापक होते, ज्यांना तंत्रज्ञान उद्योगातील आदर्श मानले जाते आणि ज्यांची कंपनी मॅकिंटोश कॉम्प्युटर, आयफोन, आयपॅड, आयपॉड यासाठी जबाबदार आहे. अॅपल तंत्रज्ञान आणि स्टीव्ह जॉब्स यांच्या योगदानामुळे कल्पना, संगीत, कला आणि सर्जनशीलता यांची देवाणघेवाण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.
अमेरिकन कर्मचार्यांच्या जागी स्वस्त चिनी कर्मचारी निवडण्यासाठी आणि शक्यतो पेटंट करू नये अशा, अगदी साध्या, पण कंपनीची सर्जनशीलता आणि नावीन्य यावर नकारात्मकपणे परिणाम करू शकतील अशा गोष्टी जोर देऊन पेटंट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अॅपलवर टीका झाल्यामुळेसुद्धा स्टीव्ह जॉब्स हे वादग्रस्त ठरले होते, पण या वादांच्याही पलीकडे स्टीव्ह जॉब्स हे एक यशस्वी व्यावसायिक, दूरदर्शी उद्योजक होते.
स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह व्होझनिक या दोघांनी मिळून वयाच्या विसाव्या वर्षी ‘अॅपल’ची स्थापना केली आणि एका गॅरेजमधून दोन माणसांनी सुरू झालेली अॅपलने अवघ्या दहा वर्षात 4 हजार कर्मचार्यांसहित २ अब्ज अमेरिकन डॉलरची कंपनी बनली.
२००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभाच्या भाषणात स्टीव्ह जॉब्स म्हणाले तुमचं आयुष्य मर्यादित आहे, ते इतरांचं जीवन जगण्यात आणि इतरांची स्वप्नं साकारण्यात वाया घालवू नका. लोकांच्या विचारांच्या कोलहलामध्ये तुमच्या अंतर्मनाचा आवाज दबू देऊ नका.
सर्वात महत्त्वाचे आपले मन आणि अंतर्ज्ञान यांच्या मागे जाण्याची हिम्मत ठेवा. ‘स्टे हंग्री, स्टे फुलिश’, या नंतर बहुचर्चित ठरलेल्या विधानाने त्यांनी भाषणाची सांगता केली. या विधानाचा अर्थ व्यक्तिश: वेगवेगळा असला, तरी आज आपण त्यातील उद्योजकीय दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
असमाधानी रहा!
उद्योजक स्वभावानेच चौकटीच्या बाहेरील गोष्टींचा विचार करतात आणि अशाच गोष्टी पाहतात. एखादा प्रश्न, उत्पादन, किंवा कल्पना दिसली की आपोआपच आपल्या डोक्यात नावीन्य आणि कल्पकतेची चक्रे वेगाने फिरायला सुरुवात होते. कधीकधी आपल्याला या वैचारिक दृष्टीकोनाची इतकी सवय लागते की, तो वास्तवात किती अद्वितीय आणि मूल्यवान आहे, हेच आपण विसरतो.
एखादी मोठी गोष्ट करताना बरेचदा लोक भौतिकदृष्ट्या आत्मसंतुष्ट होण्याच्या उत्कट इच्छेला बळी पडतात. यामुळे आपल्या प्रगती, यश आणि जीवनालासुद्धा उतरती कळा लागते. हे रोखायचे असेल, तर आपल्याला असमाधानी राहणं आवश्यक आहे.
असमाधान हे दीर्घकाळासाठी आपल्याकडे जे आहे, ते पुरेसे आहे, असा विचार करू न देता आपल्याला आणखी मिळवण्यासाठी प्रोत्साहन देते. विवाहसंबंध असो, व्यवसाय असो किंवा तंत्रज्ञान उत्पादन असो, ही गोष्ट सर्वत्र सारखीच लागू होते.
त्यामुळे जर किंवा जेव्हा हे असमाधान संपते, त्याचा पाठपुरावासुद्धा थांबतो आणि अखेरीस त्या विशिष्ट क्षेत्रात कमजोरी येऊन ती गोष्ट संपते. सामान्य भाषेत सांगायचे, तर कळत किंवा नकळत जर तुमची भूक संपली, तर तुमची आवड/रुची तुम्ही हरवून बसता आणि खेळ संपतो.
मूर्ख रहा!
वर्षावर्षाने मी जसा वाढत आहे, मला गोष्ट जाणवते की माझ्याकडून समाजाच्या असलेल्या अपेक्षासुद्धा जास्त उंचावत आहेत आणि जास्त अचूक होत चालल्या आहेत. ते दिवस गेले, जेव्हा अनुभव नसल्याने किंवा तारुण्याच्या जोशात अपयश स्वीकारले जात होते. आता जसा काळ पुढे जाईल, तसे सुरक्षित पावले उचलण्यावर आणि योग्य निवड करण्यावर खूप जोर द्यावा लागतो.
इथे मूर्ख राहणं म्हणजे मूर्खासारखे वागणं नक्कीच नाही, तर इतरांना मूर्खपणाचा वाटणार्या किंवा दिसणार्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची हिम्मत व धैर्य बाळगणे. आपले अंतर्मन, अंतर्ज्ञान व आपली स्वप्ने यांचा पाठलाग करा, मग ते इतरांना कितीका मूर्खपणाचे वाटेना.
त्या पदवीदान समारंभात जॉब्स यांनी दिलेल्या भाषणातील त्यांचे शब्द आणि आवाजातील ध्यास हा सदैव प्रेरणादायी असेल. अॅपल कॉर्पोरेशनच्या स्वरूपात त्यांनी मागे ठेवलेल्या वारसामध्ये ही जरी एक आठवण असली, तरी बर्याच मनांवर ‘स्टे हंग्री, स्टे फुलिश’ हे चार शद्ब स्टीव्ह जॉब्स यांचं प्रतीक म्हणून कोरले गेले आहेत.
(पदवीदान समारंभात स्टीव्ह जॉब्स यांनी दिलेले भाषणात वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
उद्योजकांसाठी संदेश : नवीन गोष्टी शिकत राहा. जास्तीत जास्त ध्येयांचा प्रचंड उत्साहाने पाठलाग करा. अल्पसंतुष्ट राहू नका. नेहमी कार्यक्षम राहा. इतरांची नाही तर स्वत:ची स्वप्नं, विचार जगा. आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकायला शिका. त्याचा पाठलाग करायची हिम्मत बाळगा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.