‘Success Abacus’च्या माध्यमातून मुलांची एकाग्रता आत्मविश्वास व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मुले कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने गणित सोडवू शकतात. २ ते ९९ पर्यंतचे पाढे पाठ न करता म्हणू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम फक्त चार लेव्हलमध्ये पूर्ण होतो. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचते.
‘Success Abacus’ची दशकपूर्तीची यशस्वी वाटचाल आज चालू आहे. छोट्या शहरातील, ग्रामीण भागातील मुलांना या पद्धतीचा उपयोग व्हावा यासाठी ‘सक्सेस अबॅकस’ काम करतेय. याची सुरुवात केलीय सातार्याच्या किरण पाटील यांनी.
मूळचे चिंचणी, सांगलीचे असलेले किरण यांच्या मागील तीन पिढ्या नोकरीनिमित्ताने सातार्यात स्थायिक झाल्यात. किरण यांना शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी नोकरी केली. याच काळात त्यांना अबॅकसची माहिती मिळाली.
सातार्यासारख्या शहरात अबॅकसचे दर्जेदार शिक्षण मिळावे, या विचारातून किरण यांनी या क्षेत्रात व्यवसायाची सुरुवात केली. सातार्यातील विलासपूर येथून पहिला ‘Success Abacus’ या नावाने सरांनी अबॅकस वर्ग सुरू केली. पुढे २०१३ साली ‘सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली.

अबॅकस ही गणिती पद्धत आहे. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना ही उपयुक्त आहे. या वयात मुलांची फोटोग्राफिक मेमरी चांगली असते त्यामुळे ते या वयात चांगले शिकतात. हे एक खेळण्यासारखे साधन असते याच्यासोबत मुले शिकतात. त्यामुळे गणित या विषयाची मुलांमध्ये आवड आणि गोडी निर्माण होते.
काही क्षणात गणित सोडवणे, पाढे तयार करणे यात मुले माहीर होतात. शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांसाठी ते तयार होतात. ब्रेन डेव्हल्पमेंट, स्मरणशक्ती तसेच आत्मविश्वास वाढायला मदत होते. ही पद्धती आपल्याकडे मोठ्या शहरांमध्ये प्रचलित होती. छोट्या शहरांतील मुलांनासुद्धा याचा फायदा व्हावा या उद्देशाने किरण यांनी याची सुरुवात केली.
या पद्धतीत ३४ फॉर्म्युले व त्याची अॅप्लिकेशन्स आहेत. याचा सर्वत्र ढाचा हाच आहे. अनेक इन्स्टिट्युटमध्ये हा कोर्स आठ ते नऊ लेव्हलमध्ये विभागलेला असतो.
किरण सांगतात, दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी हा कोर्स केला तेव्हा लक्षात आलं की या लेव्हलचा एका वेळचा खर्च हा तीन ते चार हजार रुपये आहे. याची आठ लेव्हल झाली तर कमीतकमी २४ हजार फी होते. छोट्या शहरात एवढी फी भरणे पालकांना शक्य नसते. त्यामुळे याचा लाभ इथल्या मुलांना घेता येत नाही.
हा कोर्स सर्वसामान्यांनासाठी कसा उपलब्ध करता येईल यावर काम सुरू केले. मग या अभ्यासक्रमात काही सायंटिफिक बदल करून आम्ही तो चार लेव्हलमध्ये आणला. हेच आमचे वेगळेपण आहे. भारतातली ही पहिली आमची इन्स्टिट्युट आहे जिने चार लेव्हलमध्ये अभ्यासक्रम आणला. यामुळे आपसूकच फी कमी झाली. याला आम्ही वैदिक गणिताची जोड दिली.
चार लेव्हलची चार पुस्तकं, बॅग, सर्टिफिकेट आणि गणिती साधने आम्ही देतो. आम्ही पालकांचा आणि मुलांचा विचार करून हे तयार केले आहे. अशा प्रकारे ‘सक्सेस अबॅकस’ची सुरुवात झाली आणि पहिल्या वर्षातच सातारा जिल्ह्यातून सहा ते सात फ्रँचायजी दिल्या गेल्या.
याचा विस्तार होत होत सातारा जिल्ह्यातच आज ऑफलाईन पंचवीस फ्रँचायजी आहेत. याशिवाय पुणे, कोल्हापूर, सांगली, नवी मुंबई, खारघर, जालना, हिंगोली, गोवा अशा ठिकाणी ‘सक्सेस अबॅकस एज्युकेशन’चे वर्ग होतात.
कोरोना काळात ऑनलाईन क्लासेसची सिस्टीम तयार केली. यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज ऑनलाईन फ्रँचायजीच्या माध्यमातून तीन ते चार हजारच्या जवळपास विद्यार्थी या कोर्सचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक फ्रँचायजी दिल्या आहेत.
‘सक्सेस अबॅकस’च्या फ्रँचायजी मुख्यत्वे महिला घेतात. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांना मार्केटिंगसाठी मदत केली जाते. वेळोवेळी येणार्या समस्या त्या विषयातल्या तज्ज्ञांशी बोलून सोडवल्या जातात.

तुमच्यातले वेगळेपण हे तुम्हाला स्पर्धेत टिकवते. त्यामुळे सतत नवीन प्रयोग आपल्या कामात यायला हवे. सुरुवात करतानाच ‘सक्सेस अबॅकस एज्युकेशन’ने वेगळेपण जपत चार लेव्हलमध्ये अभ्यासक्रम आणून केली होती. त्यात मोफत वैदिक गणित टिप्स द्यायला सुरुवात केली.
मुलांना विविध स्पर्धा, बक्षीस, प्रमाणपत्र, मेडल द्यायला सुरू केली, पण याशिवाय पहिल्या चार मुलांना सायकल बक्षीस म्हणून द्यायला सुरुवात केली. स्कॉलरशिपसुद्धा सुरू केली. अशा नवनव्या संकल्पना ‘सक्सेस अबॅकस’ राबवते.
किरण म्हणतात, “विन विन विन” हेच आमचे प्रिन्सिपल आहे. आम्ही आमच्यासोबत जोडलेले विद्यार्थी, पालक, याशिवाय आमच्यासोबत जोडले गेलेले फ्रँचायजी मालक या प्रत्येकाचा विकास हेच आमचे लक्ष्य आहे.
आज आमच्यासोबत कार्यालयीन दहा जणांची टीम काम करतेय. पंधरा ट्रेनर आहेत. ‘सक्सेस अबॅकस एज्युकेशन’ला पुढील दोन वर्षात २५० चा फ्रँचायजीचा टप्पा पार करायचा आहे आणि भविष्यात २ हजार फ्रँचायजी द्यायच्या आहेत. दशकपूर्ती वर्षात नॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी आम्ही एक लाखाची स्कॉलरशिप घोषित केलीय.
आमचं यश म्हणजे अनेक मुलं स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालीत. काही मुले सैनिक शाळा, नवोदयसारख्या परीक्षेत यशस्वी झालेत. ‘सक्सेस अबॅकस एज्युकेशन’ची फ्रँचायजी घेणारे याच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ‘सक्सेस अबॅकस एज्युकेशन’ला अनेक पुरस्कारही मिळालेत.
अनेक महिला या माध्यमातून आर्थिक सक्षम झाल्यात. ही खरी उपलब्धी आहे. अपार मेहनत आणि योग्य नियोजन या माध्यमातून भविष्याचा लक्ष्यवेध करायला Success Abacus तयार आहे.
किरण पाटील – 8888561635