पर्सनल ब्रँडिंग सल्लागार – शिवानी गोहिल

आजच्या युगात ब्रँड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मॅकडोनाल्ड, टाटा, रिलायन्स, ऍपल अशी नावं येतात, पण या कंपन्यांच्या ब्रँड बनण्यामागे असतात वेगवेगळ्या व्यक्ती. रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स किंवा एलॉन मस्क हे स्वत:मध्ये एक ब्रँड. खरं तर प्रत्येक व्यक्ती ही स्वत:मध्ये एक ब्रँड असतो!

हाच संदेश भारतातील तरुण, ऊर्जावान आणि प्रेरणादायी पर्सनल ब्रॅण्डिंग कोच शिवानी गोहिल आपल्या कामातून देते. मूळची जळगावची असलेली शिवानी आज टेडएक्स स्पिकर, ब्रँड अँम्बेसेडर, लेखक आणि व्यावसायिक मॉडेल म्हणून ओळखली जाते.

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी तिने पर्सनल ब्रँडिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि केवळ वर्षभरातच तिच्या पहिल्या पुस्तकाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि पीएमओकडून मान्यता मिळाली. शिवानी आज वयाच्या २९व्या वर्षी ३० ते ३५ हजार लोकांवर प्रभाव टाकणार्‍या भारतातील तरुण इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते.

मास्टर्स इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने सीए करायला सुरुवात केली. फायनलला असताना शिवानीने ती वाट सोडली आणि स्वत:च्या विचारांचा शोध घेऊ लागली. नोकरीत वडिलांची बदली झाल्यानंतर ती मुंबईत आली. नवीन शहरात ओळखी निर्माण करणं, नेटवर्किंग शिकणं हे सगळं थोडं आव्हानात्मक होतं.

एका कार्यक्रमात पर्सनल ब्रँडिंग ही संकल्पना तिला कळली. ही संकल्पना आवडली आणि मग पुढील एक वर्ष तिने या विषयावर सखोल अभ्यास केला. आता पुढे काय असा प्रश्न समोर होता. कोणत्या मार्गाने पुढे जावं हे कळत नव्हतं तेव्हा हे ज्ञान फक्त स्वत:पुरतं न ठेवता लोकांपर्यंत पोहोचावं असं तिला वडिलांनी सुचवलं.

वडिलांच्या या मार्गदर्शनातूनच शिवानीने पहिलं पुस्तक ‘Roots : Brand and Image’ प्रकाशित झालं आणि त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि पीएमओकडून मान्यता मिळाली. त्या वेळी शिवानी फक्त २३ वर्षांची होती. पुढे दुसरं पुस्तक ‘Transform with Personal Brand’ लिहिलं. या पुस्तकात आपल्या व्यक्तिमत्त्वातून व्यावसायिक आणि आर्थिक यश कसं साधता येतं; हे सोप्या भाषेत मांडलं आहे.

पर्सनल ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय?

यावर शिवानी म्हणते, पर्सनल ब्रँडिंग म्हणजे स्वत:ची ओळख निर्माण करणं. स्वत:ला समजून घेणं आणि जगासमोर आपलं खर्‍या अर्थाने सादरीकरण करणं. आपल्याकडे अजूनही पर्सनल ब्रँडिंगबद्दल जागरूकता कमी आहे. तरुणाई यापासून दूर आहे, पण परदेशात ही संकल्पना खूप लोकप्रिय आहे.

भारतात आपण स्वत:ला फक्त पैसा कमावण्यासाठी तयार करतो. आपल्या शिक्षणपद्धतीतसुद्धा स्वत:वर काम करून स्वत:ला ब्रँड म्हणून घडवणं याबाबतीत उणीवा आहेत.

personal branding consultant shivani gohilशिवानीच्या मतानुसार पर्सनल ब्रँडिंगचे चार स्तंभ म्हणजे : A – Appearance, B – Behaviour, C – Communication, D – Digital Footprint. या चार गोष्टींवर काम केल्यास कोणतीही व्यक्ती स्वत:मध्ये बदल घडवून यश मिळवू शकते. मग ती गृहिणी असो, विद्यार्थी असो किंवा उद्योजक! एक गृहिणीसुद्धा एक ब्रँड असते. फक्त तिच्यातलं सामर्थ्य तिने स्वत: ओळखून आपल्यातलं वेगळेपण लोकांपुढे सादर करणं तिला जमलं पाहिजे.

शिवानीने ‘माणदेशी फाउंडेशन’ या संस्थेसोबत काम करून महिला उद्योजकांना ब्रँडिंग, प्रेझेंटेशन आणि व्यावसायिक आत्मविश्वास यावर प्रशिक्षण दिलं आहे. तिच्या कार्यशाळांमधून अनेक महिला उद्योजकांनी स्वत:चा व्यवसाय उभा केला, विद्यार्थ्यी आत्मविश्वासाने स्वत:ला सादर करायला शिकले.

शिवानीच्या पर्सनल ब्रँडिंग कोर्समध्ये स्वत:चा ब्रँड तयार करणं, प्रभावी संवाद, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, प्रोफेशनल इमेज आणि लीडरशिप स्किल्स शिकवले जातात. वर्कशॉप्स, वेबिनार्स आणि ब्रँडिंग इव्हेंट्सद्वारे विद्यार्थी, महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना स्वत:ची ओळख घडवायला मदत केली जाते.


📘 ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा
उद्योजकता, व्यवसाय मार्गदर्शन आणि लोकोपयोगी माहिती — थेट घरपोच मिळवा.

६ महिने : ₹४०० । १ वर्ष : ₹८०० । ३ वर्षे : ₹२,०००
👉 आजच वर्गणीदार व्हा!


शिवानी आज विविध शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट आणि एनजीओ यांच्याशी जोडलेली आहे. तिचे सेशन्स टाटा, मर्सिडीज बेंझ, एलटीआय, फ्लिपकार्ट, पुणे एज्युकेशन इन्स्टिट्यूट, औरंगाबाद विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी झाले आहेत. यातून तिचा पर्सनल ब्रँड तयार झाला आणि मग लोकांनीच तो इतरांपर्यंत पोहचवला.

लोकांमध्ये डिजिटल मार्केटिंग आणि पर्सनल ब्रँडिंग याविषयी खूप गैरसमज आहेत. यात लोक खूप गल्लत करतात, पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. डिजिटल मार्केटिंगमध्ये फॉलोअर्स महत्त्वाचे असतात, तर पर्सनल ब्रँडिंगमध्ये एक व्यक्ती जरी तुम्हाला ओळखत असेल आणि तुमच्यामुळे प्रभावित होत असेल, तर ती महत्त्वाची असते.

शिवानीच्या म्हणण्यानुसार, आपण सोशल मीडियावर जे काही पोस्ट करतो, बोलतो, ते आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे डिजिटल उपस्थिती म्हणजे फक्त फोटो किंवा कंटेंट नव्हे, तर आपल्या विचारांची आणि वागण्याची छाप.

शिवानीने स्वत:चा मार्ग स्वत: शोधला. कुटुंबात कोणतीही उद्योजकीय पार्श्वभूमी नसतानाही तिने स्वत:चा मार्ग निर्माण केला. विविध सेमिनार, कार्यक्रम यातून सतत शिकत आणि स्वत:ला घडवत तिने आपलं वेगळेपण जपलं. आपण इतरांना बदलायचं ठरवलं तर आधी स्वत:वर काम करायला हवं. जेव्हा तुम्ही स्वत:मध्ये बदल घडवता, तेव्हा जग तुमचं अनुकरण करतं.

‘शिवानी पर्सनल ब्रॅडिंग अकॅडमी’द्वारे शिवानीला भविष्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्सनल ब्रँडिंग ही संकल्पना पोचवायची आहे. ‘Know, Show, Grow Brand with Shivani’ हा तिचा मंत्र आहे. ती प्रत्येक भारतीयाला स्वत:चा ब्रँड घडवण्याची प्रेरणा देत आहे. शिवानी म्हणते,

“तुमचं नावच तुमचा ब्रँड बनवा आणि तुमचा ब्रँडच तुमचं भविष्य घडवेल.”

संपर्क : 8888395663 / 9673991444

Are you Business Achiever Prime Membership

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Prime Membership Benefits