स्त्रिला आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक सक्षमता हवीय. ती घराबाहेर पडून आज नोकरी-व्यवसायात स्वत:ला सिद्ध करतेय, पण कौटुंबिक जबाबदार्याही तिला सांभाळायच्या आहेत. अनेक स्त्रियांना कौटुंबिक जबाबदार्यांमुळे नोकरीपासून दूर राहावे लागते. काही जणी यावरही तोडगा काढतात. घर-कुटुंब सांभाळत आर्थिक हातभार लावण्यासाठी व्यवसायाची वाट निवडतात.
सीमा गुळवे यांनीसुद्धा कुटुंबाला प्राधान्य देत आपला व्यवसाय म्हणजेच ‘ओदनम मसाले’ची सुरुवात केली. घर आणि घराबाहेरच्या जबाबदार्या सांभाळणार्या महिलांना आपण काय मदत करू शकतो, या विचारांतून त्यांनी ‘ओदनम मसाले’ आणि प्री-मिक्सची सुरुवात केली.
आज चौदा प्रकारचे ओदनम मसाले सीमाताई तयार करतात. रोजच्या वापरातले व्हेज, नॉनव्हेज तसेच स्नॅक्ससाठी लागणारे असे तर्हेतर्हेचे मसाले आहेत. व्हेज कोल्हापुरी, छोले, पनीर टिक्का मसाला, मिसळ, सांबार, उपमा, शिरा, इडली याशिवाय उपवास असे अनेक प्री-मिक्सेस आहेत.
घाईच्या वेळी, एकटे राहणारे यांच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग आहे. त्यामुळे त्याला मागणीही आहे. काही मिनिटांत आपल्याला जे हवं ते झटपट तयार होतं. प्रवासात याचा जास्त फायदा होतो. हॉटेलनासुद्धा ‘ओदनम’चे प्रिमिक्स पुरवले जातात.
‘ओदनम मसाले’ घरगुती पद्धतीने ऑर्डरप्रमाणेही बनवून दिले जातात. हॉटेल्स आणि स्नॅक्स कॉर्नर्सनाही हे मसाले पुरवले जातात. मसाल्याना मागणी चांगली आहे. बी-टू-बीची मागणी जास्त आहे. डायरेक्ट, इनडायरेक्ट, रीसेलसाठी माल पुरवला जातो. एखाद्याला मोठ्या प्रमाणात माल हवा असेल तर गरजेप्रमाणे माल पुरवतात.
व्यवसायाची सुरुवात झाली आणि कोरोना आला. कोरोना काळात काम बंद झाले. हा काळ कठीण होता. हळुहळू निर्बंध उठले आणि पुन्हा एकदा थोडं थोडं करत कामाला सुरुवात झाली. या काळात ग्राहकाला सरकारी नियम पाळून जी घरपोच सेवा दिली त्यामुळे ग्राहक समाधानी झाला.
व्यवसाय म्हटलं की धोका पत्करावाच लागतो. आम्ही तो पत्करला आणि त्यामुळेच आम्ही यात टिकलो. मार्केटिंग हासुद्धा एक आव्हानात्मक भाग आहे, पण नवनव्या संकल्पना, सोशल मीडियाचा वापर करून व्यवसाय वाढवतो आहोत. अनेक अडचणी येतात, पण आता आम्ही त्यावर मात करतो.
सीमाताई सांगतात, महिला उद्योजक म्हणून काम करताना ग्राहकाला महिला म्हणून तिच्या क्षमतेवर अविश्वास नसतो. तर सर्व आघाड्यांवर काम करताना मोठ्या ऑर्डर वेळेत मिळतील का? या विषयी थोडी साशंकता असते; पण वेळेअगोदर ऑर्डर पूर्ण करून देण्यावर आमचा भर असतो. आम्ही ते तंतोतंत पाळतो. त्यामुळे हे आमचं वैशिष्ट्य झालं आहे.
ग्राहकाला ताजं आणि त्याला हवं तसा माल देतो. अनेक हॉटेल्स किंवा स्नॅक्स कॉर्नर्सचा स्वत:चा सिक्रेट फॉर्म्युला असतो. आम्ही तो कोणाशीही शेअर करत नाही किंवा त्यासारखा इतर कोणाला माल बनवून देत नाही. हा विश्वास आम्ही जपतो. त्यामुळे विश्वासार्हता वाढते.
आज युनिट छोटे आहे, पण लवकरच ते मोठ्या स्केलवर जाईल आणि पुढील पाच वर्षांत महिन्याला ३ हजार किलो प्रोडक्शनवर जाण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं सीमाताई सांगतात. पिंपरी चिंचवड भागात ‘ओदनम मसाले’चा चांगला जम बसला आहे.
इतर जिल्ह्यांत आता आम्ही हळूहळू पोहचतो आहोत. विविध प्रदर्शनं, व्यावसायिक ग्रुपभेटी यातून आम्ही काम वाढवतोय. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचतोय. भविष्यात भारतभर आणि भारताबाहेरही विस्तार करण्याचं लक्ष्य आहे.
सीमा गुळवे यांना त्यांच्या नावाच्या अगोदर मसालेवाल्या मॅडम म्हणून आज ओळखले जाते. कुटुंबाची भक्कम साथ आहे. त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांच्या कामाची दखल घेत अनेक ठिकाणी पुरस्कृत केले गेले आहे.
मसाला व्यवसायात खूप संधी आहेत. भारताचा दरवर्षीचा टर्न ओव्हर ७० हजार करोड टनपेक्षा जास्त आहे. देश विदेशात याला खूप मागणी आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेले औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांच्या शोधात वास्को द गामा भारतात आला हे आपल्याला ठाऊकच आहे. या मसाल्यांमध्ये मोठमोठे ब्रँड असले तरी संधीही खूप आहेत.
सीमा गुळवे : 7030895346
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.