
इंडस्ट्रियल कॅलिब्रेशन म्हणजे काय?
इंडस्ट्रियल कॅलिब्रेशन ही उद्योगातील मापन साधनांना अचूकता, विश्वासार्हता आणि प्रमाणिकता देणारी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. उत्पादनाची गुणवत्ता, मशीनची सुरक्षितता आणि ISO ऑडिट यशस्वी होण्यासाठी कॅलिब्रेशन अत्यावश्यक असते. चुकीचे मोजमाप उत्पादनातील दोष, अपघात किंवा आर्थिक नुकसान घडवू शकते. म्हणूनच उद्योगांसाठी प्रमाणित कॅलिब्रेशन सेवा ही गरज बनली आहे.
नवी मुंबईतील विश्वासार्ह कॅलिब्रेशन लॅब
गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ Sky Instruments and Controls (OPC) Pvt. Ltd. ही कंपनी नवी मुंबईतील घनसोली येथे कार्यरत असून इंडस्ट्रियल कॅलिब्रेशन क्षेत्रात दर्जेदार सेवा देत आहे. “Customer Satisfaction is Our Goal” या घोषवाक्याला जागत कंपनीने आज ८००+ उद्योगसंस्थांचा विश्वास संपादन केला आहे.
संस्थापक सुनील देशमुख यांचा प्रवास
कंपनीचे संस्थापक सुनील पोपटराव देशमुख हे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीतील बी.टेक. पदवीधर आहेत. त्यांनी टाटा पॉवरमध्ये प्रशिक्षण घेतले. याच काळात त्यांना इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन व टेस्टिंग क्षेत्राची सखोल ओळख झाली.
विविध कॅलिब्रेशन लॅब्स आणि उद्योगांमध्ये काम करताना ISO ऑडिटमध्ये कॅलिब्रेशनचे महत्त्व त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आणि स्वतःची दर्जेदार कॅलिब्रेशन लॅब उभारण्याचा निर्धार केला.
२०११ मधील धाडसी निर्णय
आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा सामना करत सुनील देशमुख यांनी २०११ मध्ये कॅलिब्रेशन लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन वर्षांत त्यांनी ४००+ ग्राहक जोडले आणि त्यानंतर व्यवसायाने वेग घेतला.
ISO/IEC 17025 – दर्जा आणि विश्वासाची मोहर
२०१५ मध्ये कंपनीला ISO/IEC 17025 प्रमाणपत्र National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) कडून प्राप्त झाले. या मान्यतेमुळे :
- कॅलिब्रेशन रिपोर्टची विश्वासार्हता वाढली.
- मापन उपकरणांची अचूकता प्रमाणित झाली.
- उद्योगांमधील ऑडिट प्रक्रियेत कंपनीला अग्रक्रम मिळाला.
ही मान्यता म्हणजे Sky Instruments and Controls साठी गुणवत्ता व विश्वासाचं ठोस शिक्कामोर्तब ठरलं.
कॅलिब्रेशन सेवा : क्षेत्र आणि प्रकार
आज कंपनी इलेक्ट्रो-टेक्निकल, मेकॅनिकल, थर्मल, प्रेशर अशा विविध मापन साधनांसाठी कॅलिब्रेशन सेवा देते.
कॅलिब्रेशन, रिपेअर व सप्लाय होणारी प्रमुख इन्स्ट्रुमेंट्स
- Multimeter, Clamp Meter, Electric Panel Meter
- HV Tester, Welding Machine
- Oven, Temperature Sensor
- Pressure Gauge, Transmitter
- Vernier Caliper, Micrometer, Height Gauge
- Measuring Tape, Scale, Thread Gauge
ऑन-साईट कॅलिब्रेशन सेवा – भारतभर
कंपनी मुंबई, ठाणे, रायगड, वसई, गुजरात, सातारा, बेळगाव, धारवाड, गोवा आदी ठिकाणी सेवा पुरवते. On-site calibration service across India ही कंपनीची मोठी ताकद आहे.
नामांकित ग्राहक
Indian Navy, BARC, ISRO, ONGC, Asian Paints, Tata Cummins, Voltas, Larsen & Toubro यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांनी कंपनीवर विश्वास टाकला आहे.
📘 ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा
उद्योजकता, व्यवसाय मार्गदर्शन आणि लोकोपयोगी माहिती — थेट घरपोच मिळवा.
६ महिने : ₹४०० । १ वर्ष : ₹८०० । ३ वर्षे : ₹२,०००
👉 आजच वर्गणीदार व्हा!
भविष्यातील उद्दिष्ट
सुनील देशमुख सांगतात,
“अधिकाधिक ठिकाणी आमच्या साइट्स सुरू करून comprehensive calibration, repair आणि instrument manufacturing support देणं हे आमचं ध्येय आहे.”
कुटुंब आणि मार्गदर्शकांचा आधार
या प्रवासात आई व पत्नी यांचा खंबीर पाठिंबा लाभला. टाटा पॉवरमध्ये काम करताना अहिरे सर आणि मिस्त्री सर यांच्या मार्गदर्शनामुळे क्षेत्रातील बारकावे शिकता आले. तसेच मित्र मंगेश, योगेश आणि अजय यांची साथही मोलाची ठरली.
सामान्य मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेला एक अभियंता, चिकाटी, कौशल्य आणि कौटुंबिक आधाराच्या जोरावर आज देशभरातील उद्योगविश्वात विश्वासार्ह नाव निर्माण करतो—हीच Sky Instruments and Controls ची खरी प्रेरक उद्योजक कथा आहे.



