'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe

‘विश्वविहार हॉलिडेज’ हे नाव ऐकताच मनात एकच विचार येतो तो म्हणजे संपूर्ण जग पाहण्याची आणि अनुभवण्याची ओढ. २००९ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने गेल्या सोळा वर्षांत पर्यटन क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दर्जेदार सहली, वैयक्तिक सेवा आणि ग्राहकांच्या अपेक्षांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनामुळे ‘विश्वविहार हॉलिडेज’ आज ७००+ गुगल रिव्ह्यूज आणि ५,०००+ समाधानी ग्राहकांसह पर्यटन क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. चला, या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया!
स्वप्नातून साकारलेली वाटचाल
‘विश्वविहार हॉलिडेज’चे संस्थापक संजय वझे व राजेंद्र जोशी. दोघांचेही शिक्षण ट्रॅव्हल अँड टुरिझममध्येच झाले आहे. सुरुवातीला त्यांनी एका प्रतिष्ठित ट्रॅव्हल कंपनीमध्ये चार वर्षे नोकरी केली, पण मनात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द कायम होती.

योग्य वेळी मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे २००९ मध्ये ‘विश्वविहार हॉलिडेज’ची स्थापना झाली. कंपनीच्या नावातच तिचे ध्येय प्रतित होते की संपूर्ण विश्वभर विहार करवणारी कंपनी. कंपनीचे ध्येय आहे पर्यटकांना संपूर्ण जग दाखवणे! त्यांची मराठी ब्रिदवाक्य आहे, ‘दर्जेदार सहलीसाठी फक्त विश्वविहार’ आणि इंग्रजी ब्रिदवाक्य आहे, ‘अ ग्लोब टू फ्लाय अक्रॉस’. ब्रिदवाक्यतूनच कंपनीचा आत्मविश्वास आणि आपल्या कामाविषयीची बांधिलकी दिसून येते.
सेवा आणि वैशिष्ट्ये
‘विश्वविहार हॉलिडेज’ भारतातील सर्व डोमेस्टिक सहलींसह आंतरराष्ट्रीय टूर्स आयोजित करते. याशिवाय परदेशातून भारतात येणार्या पर्यटकांना, विशेषत: अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅरिबियन देश आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना दर्जेदार सेवा पुरवते.
कस्टमाइज्ड टुर्स हे ‘विश्वविहार’चे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला समुद्रकिनारी विहंग करायचा असोत, विशिष्ट प्रकारचे वाहन हवे असोत किंवा शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय हवी असोत, ‘विश्वविहार’ तुमच्या प्रत्येक आवश्यकतेची काळजी घेते. 24 तास सपोर्ट, व्हेरिफाइड हॉटेल्स आणि वाहने यामुळे त्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव इतरांपेक्षा नक्कीच वेगळा ठरेल, अशी खात्री संजय वझे यांनी ‘स्मार्ट उद्योजक’शी बोलताना दिली.
आव्हानांवर मात आणि यशस्वी वाटचाल
गेल्या सोळा वर्षांत ‘विश्वविहार’ने अनेक चढउतार पाहिले आहेत. केरळमधील पूर, काश्मीरमधील अस्थिरता, मार्केटमधील मंदी आणि विशेषत: कोरोना काळात तब्बल दोन वर्ष ठप्प झालेला व्यवसाय यांसारख्या अनेक समस्यांनी त्यांच्यासमोर आव्हाने उभी केली, पण त्यांनी हार मानली नाही.
कोरोना काळात जेव्हा पर्यटन क्षेत्र ठप्प झाले, तेव्हा त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत युट्यूब आणि फेसबुक लाइव्हद्वारे नैनिताल, उत्तराखंड, अंदमान यांसारख्या ठिकाणांच्या ऑनलाइन टुर्स आयोजित केल्या. विशेष म्हणजे त्यांची अंदमान टूर २५ हजार लोकांनी घरबसल्या अनुभवली! याशिवाय फोटो, व्हिडीओ स्पर्धा आणि सोशल मीडिया उपक्रमांद्वारे त्यांनी ग्राहकांना जोडून ठेवले. या काळात त्यांनी कमी दरात फ्रेंचायसी पार्टनर्स जोडले, ज्यामुळे त्यांचे नेटवर्क वाढले आणि व्यवसाय टिकून राहिला.
प्रत्येक उद्योजक असायलाच हवा 'स्मार्ट उद्योजक - प्राईम मेंबर'!
ग्राहकांचा विश्वास
‘विश्वविहार’चा मुख्य फोकस आहे कस्टमाइज्ड सेवा आणि ग्राहकांचा विश्वास. आम्ही फक्त बुकिंग करत नाही, तर प्रत्येक गोष्ट व्हेरिफाइड असते, असे संस्थापक सांगतात. आपत्तीजनक परिस्थितीतही त्यांची टीम पर्यटकांना रेस्क्यू करण्यासाठी तत्पर असते.
सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना तिथून तातडीने रेस्क्यू करण्यात ‘विश्वविहार’ अग्रणी होते. अशा परिस्थितीत पर्यटक कोणाचाही असो त्याला सुरक्षित त्या ठिकाणाहून बाहेर काढणे हे ‘विश्वविहार’चे लक्ष्य असते.
अनेक वेळा ग्राहक कमी किमतीच्या टुर्सकडे आकर्षित होऊन इतरांकडे गेले, पण पुन्हा ‘विश्वविहार’कडेच परतले, कारण त्यांना इथे मिळणारा अनुभव कुठेही मिळाला नाही. प्रत्येक टूरनंतर ग्राहकांचा विस्तृत फीडबॅक घेऊन आपल्या सेवेत सुधारणा करण्याचा ‘विश्वविहार’चा प्रयत्न असतो.
नवीन ट्रेंड्स आणि नावीन्य
पर्यटन क्षेत्रात सतत बदलणार्या ट्रेंड्सना सामोरे जाण्यासाठी ‘विश्वविहार’कडे स्वत:चा रिसर्च अँड डेव्हल्प्मेंट विभाग आहे. सध्या सोलो टूर, विशेषत: महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. धार्मिक पर्यटन, रिलॅक्सेशन टुर्स, फोटोग्राफी टुर्स, फूड टुस आणि वुमन स्पेशल टुर्स यांना मागणी आहे.
चारधाम यात्रा, मध्य प्रदेशातील बुंदेलखंड, पूर्वोत्तर भारत, श्रीलंका, इजिप्त यांसारख्या ठिकाणांसह ऑफबीट डेस्टिनेशन्स जसे चित्तोडगढ, केरळमधील बेक्कल आणि शिमलाजवळील म्हशोबा या टुर्सना विशेष पसंती मिळते. अशा टुर्सचे आयोजन करणेे ही ‘विश्वविहार’ची खासियत आहे.

एक अविस्मरणीय प्रवास
‘विश्वविहार हॉलिडेज’ केवळ टूर्स आयोजित करत नाही, तर प्रत्येक प्रवासात आनंद आणि समाधानाची अनुभूती देते. संजय वझे आणि राजेंद्र जोशी यांच्या नेतृत्वाखाली सेल्स, ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स यांचा सुंदर समन्वय या कंपनीला इतरांपासून वेगळे बनवतो. तुम्ही जर अविस्मरणीय प्रवासाच्या शोधात असाल, तर ‘विश्वविहार हॉलिडेज’ आहे तुमचा खरा साथी!
फ्रेंचायसी पार्टनरशिप
‘विश्वविहार’ने फ्रेंचायसी पार्टनरशिप प्रोग्राम सुरू केला आहे, जो दर्जेदार सहली विकण्याची आवड असणार्यांसाठी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतून कोणीही यात सहभागी होऊ शकते.
विशेषत: अर्ध वेळ व्यवसाय किंवा करिअर ब्रेकनंतर नव्याने सुरुवात करू इच्छिणार्या महिलांसाठी ही संधी आहे. ज्यांच्याकडे वेळ देणं शक्य आहे असे कोणीही यात जोडले जावू शकते. फ्रेंचायसी पार्टनर्सना आकर्षक कमिशन, बोनस आणि टूर लीडर म्हणून काम करण्याची संधी इथे मिळते. याशिवाय कंपनीकडून नियमित ऑनलाइन आणि ऑफलाइन ट्रेनिंगद्वारे सेल्स, मार्केटिंग आणि प्रॉडक्ट नॉलेज दिले जाते.
भविष्याची वाटचाल
‘विश्वविहार हॉलिडेज’चे भविष्यातील ध्येय स्पष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून आनंदी करणे! मागील वर्षी १,५०० – १,८०० पर्यटकांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. या वर्षी हा आकडा २,५०० पुढच्या वर्षी ७,००० आणि त्यानंतर १०,००० पर्यटकांपर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. यासाठी ते चार राज्यांमध्ये फ्रेंचायसी नेटवर्क वाढवत आहेत.
येत्या काळात २५० पेक्षा जास्त पार्टनर्सना ‘विश्वविहार’सोबतच स्वत:ची प्रगती करू इच्छिणार्यांना ते आपल्या कुटुंबात जोडू इच्छितात. ‘विश्वविहार’ने आज पंधरा जणांची इनहाऊस टीम आणि फ्रेंचायसी पार्टनर्ससह चाळीस जणांचे भक्कम नेटवर्क उभारले आहे.
अतिशय कमी गुंतवणुकीत ‘विश्वविहार’च्या फ्रेंचायसी पार्टनरशिप प्रोग्राममध्ये जोडले जाण्यासाठी 9323666206 किंवा 9920120183 वर जरूर संपर्क करा.


मी स्वतः बऱ्याच टूर्स अरेंज करतो.
मला तुमच्या कंपनीचे फ्रॅंचाईजी मध्ये रस आहे. मी पंढरपुरात राहत असून माझं स्वतःचं ऑफिस आहे.
मला नेटवर्क मार्केटिंग चा पंधरा वर्षाचा अनुभव आहे.
मी उत्तम प्रकारे काम करू शकेल असं मला विश्वास आहे