Smart Udyojak Billboard Ad

देशसेवेसाठी सैन्यात जाता आले नाही म्हणून उद्योजक होऊन देशसेवा करत आहेत वैभव पाटील

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या स्वप्नांवर, निर्णयांवर पगडा असतो असे म्हणतात. ग्रामीण भागात वाढलेल्या वैभव यांच्या मनातही देशसेवेसाठी आपल्या भागातील अनेक तरुणांप्रमाणे सैन्यात भरती व्हायची ईच्छा होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते त्यामुळे वैभव यांचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण हार मानेल तो वैभव पाटील कसला! त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला अथक परिश्रमाने ‘यशराज बिझनेस ग्रुप’ उभा केला.

वैभव यांचा प्रवास प्रेरणादायक आहे. मूळचे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या सांगली जिल्ह्यातील शिरढोण गावचे वैभव हे एमबीए, एम.कॉम आहेत. आजोबा गावचे पोलीस पाटील होते तर वडील एसटी ड्रायव्हर. तसे त्यांच्यावर आजोबांचे समाजकारणाचे विचार चांगलेच रुजलेले आणि बाळकडूही तेथेच मिळाले.

आजी आणि आईकडून संस्काराची शिदोरी. तसे आईचे शिक्षण नसतानाही मुलांना शिकवण्याची तिची तळमळ होती. वडील कष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करायचे. तरीपण वडिीलांनी चार भावंडांना उच्च शिक्षित केले.

वैभव यांचे माध्यमिक शाळेत शिक्षणात लक्ष कमी आणि खेळाकडे जास्त असे. वैभवला सैन्यात भरती व्हायचे होते आणि सैन्याचा गणवेश चढवण्याचे खूप वेड होते, पण तेथे नशीब आड येत होते. तिथेही अपयश पाठी राहायचे. म्हणून त्यांनी आपला मार्गच बदलला आणि पुढे व्यावसायिक शिक्षण घेतले.

पुढे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी एमबीए आणि एम.कॉम अशा पदव्या संपादित केल्या, परंतु यावरच तो थांबला नाही. सध्या तो कायद्याचे शिक्षण घेत आहे. एमबीए झाल्यावर वैभव यांनी छत्तीसगढ, रायपूर येथे ज्युनिअर क्लार्क म्हणून एका इलेक्ट्रिक कंपनीत नोकरी सुरू केली.

नोकरी करताना केवळ आपल्याला नेमून दिलेले काम न करता ज्या ज्या विभागात काम करता येईल व ज्ञान मिळवता येईल ते सगळे काम ते करत गेले. अनुभवसमृद्ध होत गेले. याचवेळी आपण व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आहे, एमबीए झालोय, मग आता आपल्याला व्यवसाय सुरू करायला हवा या विचारातून व नोकरीतील अनुभवातून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

Vaibhav Patil founder of Yashraj Group
वैभव पाटील

नोकरी करत व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन २०१७ मध्ये संपूर्णपणे व्यवसायाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. वैभव पाटील यांचा ‘यशराज बिझनेस ग्रुप’ आज वाय.बी.जी. प्रायव्हेट लिमिटेड, यशराज सिक्युरिटी सर्व्हिसेस, यशराज टॅक्स-वे कन्सल्टन्सी, यशराज मल्टी सर्व्हिसेस या माध्यमातून सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस, फॅसिलिटी मॅनेजमेंट, सर्व प्रकारचे मॅनपावर सप्लाय, प्रोजेक्ट प्लनिंग, बिझनेस लायसेन्स आणि टॅक्सेशनमधील सर्व प्रकारच्या सेवा देतात.

विविध सरकारी आस्थापने, बँका, एटीएम, निवासी संकुल, कंपन्या, आयटी पार्क, शाळा, कॉलेज, मॉल, हॉटेल, एमएनसीज् असे सर्व स्तरांवर वैभव पाटील यांच्या कंपन्या सेवा देतात. आज महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यात सेवा देणार्‍या यशराज ग्रुपला लवकरच संपूर्ण भारतभर आपले काम वाढवायचे आहे.

खरे तर हा प्रवास खूपच चढउताराचा होता. जोपर्यंत तुम्ही स्वत: अनुभव घेत नाही, संघर्ष करत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला समजत नाही. कोणतेही शिक्षण व्यवसाय कसा करायचा हे सांगत नाही. त्यामुळे हा संघर्ष वैभवलाही चुकला नाही. उद्योजकाला सगळ्यातले सगळे कमीतकमी नक्कीच कळले पाहिजे.

सुरुवातीच्या काळात तर फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन, ह्युमन रिसोर्स, कम्युनिकेशन, हे सगळेच शिकावं लागतं. वैभवने हे सगळे शिकून घेतले. परिस्थितीचे भांडवल न करता, घरातून सपोर्ट नसताना स्वकर्तृत्वाने घरातून एक रुपयाही न घेता त्यांनी ‘यशराज’ या ब्रँडची अगदी राहत्या घरातून मुहूर्तमेढ केली. तीही शिरढोणसारख्या खेडेगावातून.

पाच वर्ष नोकरी करून जी काही पुंजी जमा केलेली होती ती सगळी व्यवसाय उभा करताना त्यांनी खर्च केली. कोरोनासारख्या महाभयंकर संकटातसुद्धा ते टिकून राहिले.

‘यशराज ग्रुप’सोबत आज प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करणारी प्रोफेशनल टीम त्यांच्यासोबत आहे. सोबत अनेक कामगारही या प्रवासात आहेत. मुख्य म्हणजे शासनाच्या अनेक प्रोजेक्ट्सवर सिक्युरिटी गार्ड, मॅनपावर सप्लाय सर्व्हिसेस यशराज ग्रुप देते.

वैभव यांना सैन्यात भरती होता आले नाही, पण आज जिथे जिथे भारतीय सैन्याची आस्थापने आहेत जसे की ए.आर.डी.ई असो किंवा नेव्ही, रेल्वे आर्मीशी संबंधित कोणतीही आस्थापने असो तिथे त्यांची कंपनी सेवा देते. वैभव यांच्या ‘वाय.बी.जी. प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता मिळाली आहे.

वैभव लोकांना सुरक्षा देण्याचं काम करतात. सुरक्षा ही प्रामाणिकपणातून येते. त्यामुळे प्रामाणिकपणा, विश्वास, गुणवत्ता, वेळेची मर्यादा आणि पारदर्शकता हे त्यांच्या कामाला इतरांपेक्षा वेगळेपण देते.

वैभव यांना पुढील पाच वर्षांत ‘यशराज ग्रुप’चा संपूर्ण भारतभर विस्तार करायचा आहे. हे करत असताना ते सजग आहेत. अवास्तव अशक्य कोटीतील विचार ते मांडत नाहीत. देशभर विस्ताराचा हा संपूर्ण प्रवास खडतर असणार हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत.

एखाद्या नव्या शहरात ऑफिस सुरू करायचे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम उभी करावी लागते यासाठी भांडवल, मॅनपॉवर, कम्युनिकेशन सारे गरजेचे असते त्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावाच लागतो म्हणूनच टप्प्याटप्प्याने हा प्रवास चालू आहे.

या क्षेत्रात असलेल्या लोकांना वैभव पाटील आवाहन करतात की, त्यांच्याशी जोडले जाऊन, तुमचं भविष्य त्यांच्यासारखेच प्रेरणादायी उंच शिखरासारखं करू शकता. यामध्ये भांडवलदार असतील, अनुभवी उद्योजक असतील ज्यांना या क्षेत्रात योग्य दिशेने पुढे जायचं असेल ते ‘यशराज बिझनेस ग्रुप’शी संपर्क साधू शकता.

आजच्या उद्योजकाला अपडेट राहणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला आपण थेट समोर बसून सांगू शकत नाही तर अशा वेळी सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचणे हा उत्तम मार्ग आहे, असे वैभव यांना वाटते म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा, डिजिटल प्लॅटफॉर्मचा ते वापर करतात.

व्यवसायातील नफ्याचा थोडा भाग समाजासाठी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात त्यांनी केली. वैभव पाटीलांनी आतापर्यंत तब्बल 14 वेळा रक्तदान केले आहे. समाजातील अपघाती घटनांची माहिती मिळताच त्यांनी वेळोवेळी त्यांना मदत केली आहे. यातून त्यांची सामाजिक जाण आणि मदतीची भावना दिसून येते.

वैभवनीही आपली पत्नी, कुटुंबीय, मित्र यांना व्यवसायात आपल्या सोबत घेतले आहे त्यामुळे सगळ्यांना वेळही देता येतो. वैभव यांचा विश्वास आहे की आईवडिलांचे संस्कार आणि आशीर्वाद जर तुमच्या सोबत असतील तर आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना भांडवल किंवा इतर कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. प्रामाणिकपणा, जिद्द आणि सातत्याने काम करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते.

संपर्क : 9922026107 / 8090785907

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top