स्टार्टअप

स्त्रीशक्तीची नारायणी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही सर्वच क्षेत्रांत अग्रेसर होत आहेत. सर्वत्र स्त्रीशक्तीचा सन्मान होत आहे. कला, क्रीडा, शिक्षण सर्वच क्षेत्रांत महिलांनी कमालीचा प्रगतशील उच्चांक गाठला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात त्यांना समान हक्क, अधिकार पाहिजे तसे दिले जात नाहीत. त्यांच्या न्याय-हक्कांसाठी कोणी पुढे येत नाही.

काही महिलांना अजूनही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक समस्यांना त्या बळी पडत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. तर अशा महिलांसाठी कोणी तरी पुढाकार घेऊन पुढे येणे आणि नुसतेच पुढे नव्हे तर खरंच तळमळीने काही तरी करून दाखवण्याची धमक असणे आणि त्या पद्धतीने कार्य करणे आणि परिवर्तन आणणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

तशी महान व्यक्तिमत्त्वे आहेत म्हणूनच तर महिला अधिकाधिक सक्षम बनत चालल्या आहेत. अशाच एक महान व्यक्तींपैकी एक मोहना हांडे. मोहनाताई शाळेत शिक्षिका होत्या, तर निवृत्तीस त्या विभागप्रमुख होत्या. त्यांनी शाळेत तब्बल 28 वर्षे नोकरी केली.

इतकी वर्षे जाता-येता महिलांशी संवाद साधल्यावर त्यांना महिलांच्या समस्या कळल्या. त्या समस्या उमगल्यावर त्यांनी काही तरी त्यासाठी हालचाल करून त्या दूर कशा लोटता येतील आणि महिला त्यातून मुक्त कशा होतील, ह्यासाठीची चळवळ सुरू केली. तर काही वर्षांपूर्वी त्या साड्या विकण्यासाठी डोंबिवलीतील उगम क्रिएशन्स आणि अक्षरगंधचे सर्वेसर्वा नीलेश बागवे यांना भेटल्या होत्या. तेव्हा नीलेशजींनी त्यांना महिलांसाठीच्या सेवाभावी संस्था सुरू करण्याची कल्पना सुचवली. इथेच प्रकटली ‘स्वयंभू नारायणी’.

हो! हे नावदेखील नीलेशजींनीच त्यांना सुचविले. आज या संस्थेमार्फत पार्लर क्लासेस, शिवण वर्ग, गृहोद्योग यांना त्यांनी चालना दिली. तसेच मंगळागौरी, पाककला स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा हेदेखील त्या यामार्फत आयोजित करतात. प्रत्येक मुलीस किंवा महिलेस तिच्यातील सुप्त गुणांना वाव हेच त्यांचे यामागील उद्दिष्ट आहे. याचबरोबर स्त्रियांचे सक्षमीकरण ह्यावरही त्या विशेष भर देतात.

गरीब महिला किंवा गरजू मुलींसाठी त्यांनी रु. 251 इतके नाममात्र सभासदत्व ठेवले आहे. त्या संस्थेतील सर्व एकमेकींना नारायणी याच नावाने हाक मारतात. संस्थेच्या वतीने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या खूप मेहनत घेतात.

ही स्वयंसेवी संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच समानता या पंचसूत्रीवर मोहीम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून समुपदेशनाचे कार्य करते.

मोहनाताईंना हे सांगण्यास आज अभिमान वाटतो की, जवळपास 700 सभासद त्यांचे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, वाशी अशा ठिकाणांहून झाले आहेत. तसेच त्यांना भविष्यात एक वृद्धांच्या सेवेसाठी वृद्धाश्रम सुरू करायचा आहे. त्यांचे विशेष लक्ष्य आहे ते स्वकर्तृत्वावर जिद्दीने पुढे जात असणार्‍या कर्तबगार स्त्रीला आदर्श नारायणी सन्मान पुरस्कार सोहळा प्रदान करायचा आहे. त्याही पुढे काही तरी भव्यदिव्य असे योजिले आहे ते म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा सखी सन्मान सोहळा.

मोहनाजींचे उद्देश हाच आहे की, स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील अंगभूत ऊर्जेला प्रेरणा आणि दिशा दाखवण्यासाठी व अंगी नवचैतन्य जागवण्यासाठी, नवचेतना देण्यासाठी स्वयंभू नारायणी ही संस्था सदैव त्यांच्या पाठीशी आहे.

स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि सक्षम होऊ इच्छिणार्‍या सर्व वयोगटांतील स्त्रियांना योग्य ते पाठबळ पुरवून त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि 2020 सालापर्यंत 2000 सक्षम नारायणी त्यांना घडवायच्या आहेत. हेच त्यांचे भविष्यात मोठे लक्ष्य त्यांनी डोळ्यांसमोर पाहिले आहे.

त्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असून त्यांनी याबद्दल खात्रीसुद्धा बाळगली आहे. प्रचंड आत्मविश्वास, आत्मबल आणि आत्मनिर्धार या त्रिसूत्रीमुळेच त्या हे असामान्य कार्य घडवत आहेत. अशा अहोरात्र झटत असणार्‍या महान व्यक्तिमत्त्वाशी अनेक महिलांना दुःखमुक्त करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी खूप शुभेच्छा आणि पुनश्च त्यांच्या ह्या असामान्य कार्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा…


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!