उद्योगवार्ता

रोजगार, गुंतवणूक वाढीसह उद्योगस्नेही उद्योग धोरण तयार करण्याचे शासनाचे प्रयत्न

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

औद्योगिक विकासात महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य असून महाराष्ट्राचे हे स्थान कायम ठेवण्याच्या दृष्टीने राज्याच्या गतिमान औद्योगिक विकासासाठी नवीन उद्योग धोरण रोजगार, गुंतवणूक वाढीसह उद्योगस्नेही बनवण्यास विशेष प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथे केले.

नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येाग मंत्री सुभाष देसाई यांनी पुणे व औरंगाबाद येथे उद्योजकांशी संवाद साधला.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


देसाई म्हणाले, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीचे राज्य असून या आधीच्या उद्योग धोरणामध्ये अनेक बाबतीत आपण ठरवलेल्या उद्दिष्टांपैकी अधिकचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी ठरलो आहोत. यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे २०१३ ते २०१८ या कालावधीत २८ लक्ष रोजगारनिर्मिती झालेली आहे, धोरण उद्दिष्टाप्रमाणे ५ लक्ष कोटी गुंतवणूक करणे अपेक्षित होते तिथे राज्यात ८ लक्ष कोटी गुंतवणूक करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. त्यासोबतच महिला उद्योग धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देत उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने विविध १३ संकल्पना यामध्ये महिला उद्योग धोरण, अनुसूचित जाती-जमाती उद्योजकांसाठी, लघुउद्योजकांसाठी विशेष धोरणे राबवण्यात येत आहे.

या सर्व प्रयत्नांतून राज्याचे उद्योग क्षेत्र, येथील उद्योजक आणि पर्यायाने राज्याचे भविष्य हे मजबूत करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे, असे सांगून देसाई म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये सेवा क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून या उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. याची उद्योजकांनी दखल घेतली पाहिजे.

देसाई यांनी यावेळी राज्याच्या उद्योग धोरणाचा कालावधी २०१३ ते २०१८ हा मार्चमध्ये संपलेला असून सप्टेंबर २०१८ पर्यंत त्या धोरणास मुदतवाढ मिळाली. त्यानुसार आता राज्याचे नवीन उद्योग धोरण बनवण्याची प्रक्रिया सुरू असून हे उद्योग धोरण राज्याच्या उद्योग विकासाला अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि गतिमान बनवणारे असावे, हे मूळ ध्येय आहे. राज्यातील तरूण पिढीला रोजगाराच्या विविध व्यापक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आणि राज्यातील गुंतवणूकीमध्ये वाढ करणे हे उद्योग धोरण निर्मितीचे मूलभूत उद्दिष्ट आहे.

स्मार्ट उद्योजक । आजीव वर्गणी on 0% Interest EMI

उद्योग मंत्री म्हणाले की, राज्यात नवीन विदेशी, मोठे उद्योग सुरू होण्याच्या दृष्टीने विशिष्ट प्रयत्न करत असतानाच राज्यातील नव उद्योजक, लघु उद्योजकांना भरघोस पाठिंबा देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यादृष्टीने या नवीन उद्योग धोरणात लघुउद्योजकांना, नवीन उद्योगांना प्रोत्साहन, उद्योग उभारणीसाठी आवश्यक सोयी सुविधा, सर्व सहाय्य देण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येईल. तसेच कृषी, सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन क्षेत्र यासह इतर नवीन उद्योग उभारणीसाठी विशेषत्त्वाने प्रयत्न करण्यात येणार आहे.

सुभाष देसाई म्हणाले, उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा नवीन औद्योगिक धोरण निश्चित करताना प्राधान्याने विचार करण्यात येऊन नवीन औद्योगिक धोरण परिपूर्ण असेल, औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार वाढावा याला प्राधान्य देण्यात येईल, महिला उद्योजकांच्या समस्या सोडविण्यात येईल. उद्योगांमध्ये विविध क्षेत्रांचा सहभाग वाढत असल्याने, त्या-त्या क्षेत्रात होणाऱ्या उत्पादनांचा विचार करुन औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: