Advertisement
उद्योजकता

नफा हेच उद्योगाच्या यशाचे पहिले परिमाण

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


अनेकजण असं म्हणतात की त्यांना खूप यशस्वी व्हायचं आहे, पण यशस्वी म्हणजे नेमकं काय हे विचारलं की त्यांना नेमकं काही सांगता येत नाही. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट करा की उद्योगात यश मोजण्याची जी परिमाणं आहेत, त्यात ‘नफा’ हे सर्वात पहिलं परिमाण आहे. किंबहुना उद्योग आणि नफा यांचं नातं अतूट आहे.

आपण जो व्यवसाय करतो याचं सर्वात प्रथम ध्येय हे अधिकाधिक नफा कमावणं हे असलं पाहिजे. असेही बरेच महाभाग भेटतात की ज्यांना नफा किंवा व्यवसायवाढीबद्दल काही घेणं-देणं नसतं, तर आपला रोजचा गुजरबसर व्यवस्थित चालला आहे ना म्हणजे झालं तर.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

तुम्ही जर असे अल्पसंतुष्ट असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही उद्योग करत नसून निव्वळ स्वयंरोजगार करत आहात. अशाने तुमची जी यशस्वी होण्याची स्वप्नं आहेत, ती पूर्ण व्हायला किमान दोन तप लागतील.

नफा मोजण्याचं सर्वात सोपं गणित म्हणजे तुमच्या मिळकतीतून सर्व खर्च वजा करा; या खर्चात तुमचा पगार किंवा मोबदला, ज्याने तुमचे स्वतःचे घर-संसार चालणार आहे तेही वजा करा. उरलेल्या राशीवर किती कर लागतो तोही वजा करा म्हणजे आता जो शिल्लक उरेल तो तुमचा नफा.

हे गणित करून तुमच्या हातात काही शिल्लक न राहता उलट खिशातून काही घालावे लागणार असेल तर तुम्ही तोट्यात आहात. व्यवसाय सुरू केल्यावर सुरुवातीचा काही काळ तुम्ही तोट्यात असणं स्वाभाविक आहे, मात्र स्थिरस्थावर धंदाही जर का तोट्यात चालला असेल तर तुम्हाला विचार करून योग्य पाऊलं उचलावी लागणार आहेत.

वरील गणित हे तुमचे स्वतःसाठी आहे त्यामुळे ते प्रामाणिकपणे करा. जी काही स्थिती तुमच्या समोर येईल त्या स्थितीत महिनागणिक प्रगती व्हायला हवी. म्हणजे या महिन्यात जर का तोटा झाला तर पुढच्या महिन्यात ती तोट्याची रक्कम कमी तरी व्हायला हवी. हळूहळू तुम्ही तोट्यातून नफ्यात याल व नफाही वाढू लागेल.

बरेच मराठी उद्योजक व्यवसाय करायचा म्हणून करत असतात. त्यांचं त्यांच्या नफ्या-तोट्याकडे लक्ष नसतं. नफ्यावर लक्ष्य केंद्रित करा आणि दिवसेंदिवस हा नफा वाढत कसा जाईल यासाठी प्रयत्न करा तरच तुम्ही एक दिवस यशस्वी उद्योजक होऊ शकाल.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!