व्यक्तिमत्त्व विकास

अनेक अपयशांच्या कुशीतच तुमचं यश तुमची वाट बघत असतं

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


अब्राहम लिंकन

कधी-कधी अनेक अपयशांच्या पलीकडे यश तुमची वाट बघत असतं. म्हणून असं म्हटलं जातं, “Successful people fails often an often”. प्रत्येक पावलावर यश, असं कधीच होत नाही. तेव्हा अनेकदा आपण अपयशाच्या हाताला लावतो, खास करून नवीन गोष्टी करत असताना; ज्या गोष्टी करण्याचा पायंडा नाही, अशा गोष्टी करताना. तर यासाठी तुमच्या मनाची जय्यत तयारी असावी लागते.

जगातील मोठं यश संपादन केलेल्या व्यक्तींमध्ये हा गुण प्रकर्षाने जाणवतो. अपयशामागून अपयश, त्यापुढे अपयश, त्यानंतर आणखी अपयश, अपयशाच्या अशा अनेक पायर्‍या चढत, आलेल्या अपयशाने खचून न जाता ते पुढचा प्रवास तेवढ्याच आश्वासकतेने करतात, जणू काही अगदी पुढचीच पायरी यशाची वरमाळा घालायला त्यांची वाट पाहत आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अपयशाच्या अनेक थपडा झेलूनही, यशाच्या शिखरावर पाय रोवणारी माणसंच आज आपल्याला मोठी झालेली, प्रचंड यशस्वी झालेली दिसतात.

इथे एका माणसाचं उदा. पाहू, की जो वयाच्या एकविसाव्या आणि चोवीसाव्या वर्षी व्यवसायात अपयशी झाला. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी पत्नीचं निधन, वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ‘नर्व्हस ब्रेकडाऊन’ पाहिला. वयाच्या ३४व्या वर्षी, ४५व्या वर्षी निवडणुकीत पराजय, ४७व्या वर्षी उपराष्ट्रपती पदासाठी अपयश आलं. असे अनेक अपयश/पराजय पचवून १९६० मध्ये वयाच्या ५२व्या वर्षी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो आणि ते म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले अब्राहम लिंकन.

हे होऊ शकतं!

  • आयुष्यात यशा-अपयशाचं गणित करताना आलेल्या अपयशाची बाजू बरीच मोठी असली तरी, त्याच्यापुढे मिळालेलं एक यश हे त्यांना पुसायला पुरेसं असू शकतं.
  • एकामागोमाग आलेल्या अपयशाने तुम्हाला नक्कीच हतबल किंवा आतून मोडलेलं/ढासळलेलं जाणवू शकतं.
  • एकामागोमाग अपयश येणं हा यशाच्या खेळातला एक अविभाज्य घटक आहे याची नोंद घ्या.
  • एकामागोमाग अपयशामुळे तुम्ही करत असलेलं काम तुमच्याकडून थांबवलं जाऊ शकतं.
  • कधी- कधी तुमच्यावरच तुम्हाला शंका येऊ शकते.
  • अपयशामुळे तुमचा फोकस बदली होऊ शकतो.
  • अपयशाने तुम्ही कदाचित चुकीच्या मार्गावर तर नाहीत ना, अशी शंकाही तुमच्या मनात डोकावू शकते.
  • अनेक अपयशांमुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार जास्त येऊ शकतात.
  • आधीच सांगितलं होतं करू नकोस, असं सांगणारी आणि आपण किती योग्य आहोत हे सिद्ध करणारे महाभाग भेटू शकतात.
  • अशी माणसं खरी आहेत, हे सिद्ध होऊ देऊ नका. किमान तसा प्रयत्न करा.

हे करून तर बघा!

१. प्रयत्न सोडू नका, कदाचित पुढील प्रयत्नात यश दडलेलं असू शकतं.
२. मनातून अपयशाला स्वीकारायची तयारी ठेवा. अशाने तुम्ही मनाने मोठे आणि मजबूत बनता.
३. एकामागोमाग येणार्‍या अपयशांमुळे केवळ अपयशाचेच आपण धनी आहोत आणि जर असं असेल तर एवढं करायचं कशाला? कृपया, अशा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करणार्‍या विचारांना मनात थारा देऊ नका.

४. तुमच्या अपयशाबद्दल लोकही भरभरून बोलताना दिसतील, त्याकडे दुर्लक्ष करा.
५. अपयशामुळे तुमच्या मनात, पुढेही अपयशच येईल, अशी चुकीची भीती येऊ शकते. तसं करू नका.
६. अनेक अपयशांनंतर तुम्ही निराशावादी विचार आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांनी घेरले जाऊ शकता, तेव्हा अशा वेळी अशा लोकांपासून प्रयत्नपूर्वक लांब राहा.
७. तुमच्यापूर्वी अशा प्रकारच्या अपयशाचा सामना केलेल्या व्यक्तीची मदत घ्या. त्याचा जास्त फायदा होईल.

– विश्वास वाडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!