स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
शेतीला शाश्वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कापूस, तूर व सोयाबीन या पिकांसोबतच रब्बी हंगामामध्ये गहू, चणा या पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला लावून दररोज आर्थिक उत्पन्न देणारी पिके घेतल्यास कौटुंबिक संपन्नता तर वाढतेच त्यासोबतच गावांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळवू शकते. आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील शेतकर्यांनी भाजीपाला पिकांच्या उत्पादनाला सुरुवात करून इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
पारंपरिक पिकांऐवजी रोख उत्पादन देणारी शेती निश्चितच फायदेशीर ठरू शकते. रसुलाबादच्या चंद्रशेखर सावरकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या शेतात टोमॅटोचे पीक घेऊन आर्थिक प्रगतीचा मार्ग स्वीकारला. त्यांचा हा आदर्श नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या व सोयाबीन, कापूस यांसारख्या पारंपरिक पिकांऐवजी रोख उत्पादन देणार्या फळभाज्यांची शेती करून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग निश्चितच सापडू शकतो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या आर्वी येथील कृषी विभागातर्फे रोहणा, रसुलाबाद, सालदरा व परसोडी या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध असून शेतकरी केवळ पारंपरिक पीक घेत होते; परंतु शेतकर्यांना एकत्र करून कापूस, तूर, सोयाबीनऐवजी मिरची, वांगे, टोमॅटो ही भाजीपाला पिके घेतल्यास आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर होऊ शकतो.
त्यासोबतच भाजीपाला पिकांसाठी मागणी मोठ्या प्रमाणात असूनही पुरवठा होत नसल्यामुळे भावही चांगला मिळतो, हा आत्मविश्वास निर्माण केल्यावर साठ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकांची लागवड यशस्वी झाली आहे.
एकात्मिक पीक व रोग व्यवस्थापन या उपक्रमांतर्गत रसुलाबाद या गावाची निवड करून टोमॅटो पिकांची वीस प्रात्यक्षिके यशस्वीपणे राबविण्यात आली आहेत. यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करत जैविक कीटकनाशकातून वापर वाढविण्यात आल्यामुळे पिकांची उत्पादकता व गुणवत्ता ही वाढली आहे.
रसुलाबादचा आदर्श
रसुलाबाद या गावामध्ये ९५६.७५ हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून संपूर्ण शेतकर्यांनी ५५६ हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकांचे प्रात्यक्षिक घेतले आहे. त्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायजर्स यांच्या संयुक्तपणे टोमॅटो उत्पादनाला प्रोत्साहन देऊन जैविक खत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रसुलाबादच्या वीस शेतकर्यांची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून त्यांना संकरित जातीची ३ हजार ५०० टोमॅटोची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासोबतच जैविक खताचा वापर व पिकांवर येणार्या कीड, रोगांवर नियंत्रण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे गाव त्यामुळेच टोमॅटोचे गाव म्हणूनही संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जात आहे.
पाच वर्षांपासून भाजीपाला पिकांमध्ये वांगी, मिरचीचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने आम्ही घेत; परंतु एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनांतर्गत घेतलेल्या टोमॅटो पिकांची लागवड ०.२० हेक्टर क्षेत्रावर ३ बाय १ अंतरावर केली. ज्यामुळे मला दुय्यम उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे रसुलाबादच्या महिला शेतकरी वनिता कृष्णराव भबुतकर यांनी सांगितले.
‘आत्मा’ या संस्थेमार्फत पुरवण्यात आलेल्या निविष्ठेचा पूर्णपणे वापर केल्याने, तज्ज्ञांमार्फत वेळोवेळी मिळाल्याने रासायनिक कीटकनाशकावर होणार्या खर्चात घट झाली. लागवड खर्च कमी होऊन अधिक नफा झाला. प्रात्यक्षिकांमध्ये एकूण ४९० क्रेट उत्पन्न झाले.
त्याला सरासरी रुपये २२० रुपये के्रट भाव मिळाला. त्यातून एक लक्ष सात हजार ८०० रुपयांचे उत्पन्न झाले. त्यातून मला लागवड खर्च जाऊन ७७ हजार ८०० रुपयांचा नफा झाल्याचेही श्रीमती भबुतकर यांनी सांगितले.
शेतकरी चंद्रशेखर सावरकर यांनीही ०.२० हेक्टर क्षेत्रात रुंद सरी वरंभा पद्धतीने ५ बाय १ अशा अंतरावर पेरणी केली. ‘आत्मा’मार्फत सुधारित वाण अभिलाषाची रोपे, जैविक खते, कीटकनाशके व कीडरोग यांच्या नियंत्रणाकरिता सापळा पिकांचे बियाणे देण्यात आले.
त्यामुळे आमच्या मुख्य पिकांवर किडी व रोगांचे प्रमाण कमी होऊन नफा मिळाला. तसेच आम्हाला नवीन तंत्रज्ञानही अवगत झाले. तसेच एकूण ५०० क्रेटच्या माध्यमातून रुपये एक लक्ष २० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. त्यातून ८० हजार रुपयांचा नफा मिळाला असल्याचेही शेतकरी सावरकर यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
पारंपरिक पिकांऐवजी रोख उत्पादन देणारी शेती निश्चितच फायदेशीर ठरू शकते. रसुलाबादच्या चंद्रशेखर सावरकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या शेतात टोमॅटोचे पीक घेऊन आर्थिक प्रगतीचा मार्ग स्वीकारला. त्यांचा हा आदर्श नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या व सोयाबीन, कापूस यांसारख्या पारंपरिक पिकांऐवजी रोख उत्पादन देणार्या फळभाज्यांची शेती करून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग निश्चितच सापडू शकतो. तसेच शेतकर्यांमध्ये असलेले नैराश्यही दूर होऊ शकते. त्यासाठी रसुलाबादचा आदर्श निश्चितच मार्गदर्शन करणारा आहे.
– अनिल गडेकर
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.