Advertisement
कथा उद्योजकांच्या

कधी सुरुवात सायकलवरून केलेली आता बीएमडब्ल्यूने फिरणारा उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


संजय तारी हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. घोळक्यात असले तरी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारं, प्रत्येकाला आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व. त्यांचं आताचं राहणीमान आणि व्यवसाय पाहता कोणाला त्यांच्या परिश्रमाचा मागमूसही लागत नाही. पेपर टाकून कॉलेजचे शिक्षण पूर्ण करणारे संजय तारी आज एक प्रतिथयश उद्योजक आहेत आणि सायकलवरून सुरू झालेला त्यांचा उद्योजकीय प्रवास आज बीएमडब्ल्यूपर्यंत पोहोचला आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१९८५ साली स्वतःच्या पेपरलाईन सुरू करून त्यांनी पुढे सतरा वर्षे त्या चालवल्या. सकाळी साडेतीन वाजता डेपोतून पेपर घायचे, ते ग्राहकांनुसार सॉर्ट करून त्याच्या लाइन बनवायच्या, मुलांकडे त्या लाइन देऊन सकाळच्या चहापर्यंत घरोघरी ग्राहकाच्या हातात पेपर पडला पाहिजे याची काळजी घ्यायची हे वाटते तितकं सोपं काम नाही.

मेहनत, शिस्त आणि नियमितता या तिन्ही गोष्टींची यासाठी गरज असते. याचसोबत भावाचा मित्र एलआयसीमध्ये विकास अधिकारी झाला म्हणून त्याच्याकडून विमा एजन्सीपण घेतली.

कॉलेजचं शिक्षण चालू असतानाच जोडीला हे व्यवसाय सुरू होते. शिक्षणही पूर्ण झाल्यावर १९९७ साली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्युटी ऑफिसर म्हणून नोकरीला लागले. नोकरीत स्थैर आल्यावर त्यांनी आपल्या पेपरलाइन कामावर असलेल्या मुलांना देऊन टाकल्या.

तारी यांनी दहा वर्षे नोकरी केल्यावर नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा निर्धार केला. २००६ साली ते पूर्णवेळ व्यवसायात उतरले. एलआयसीसोबत ते सर्व प्रकारचे विमा, म्युच्युअल फंड, कर्ज सेवा अशा सर्व फायनान्शियल सेवा त्यांनी सुरू केल्या.

व्यवसायतली त्यांची प्रगती पाहून एलआयसीने त्यांना ‘चीफ लाइफ ऍडव्हायसर’ म्हणून नियुक्त केले. आता ते एलआयसीसाठी विमा सल्लागार नियुक्त करू शकतात.

संजय तारी यांनी सुरुवातीपासून व्यवसायात सामाजिक बांधिलकी जपत आपल्यासोबत इतरांचाही विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. एलआयसीकडून आता ही नवी संधी मिळाल्यावर आपल्याप्रमाणे फायनान्स क्षेत्रात एक हजार उद्योजक निर्माण करावे, असे त्यांनी मिशन निश्चित केले.

या नवउद्योजकांना ते ‘इन्शुप्रेन्यर’ म्हणतात. हे इन्शुप्रेन्यर जीवन विमा, अन्य विमा, म्युच्युअल फंड इत्यादी सेवा देण्याची संधी मिळणार आहे. मुख्य म्हणजे स्वतःचा अनुभव आणि प्रशिक्षण असे दोन्ही देऊन ते तरुणांना रोजगारक्षम करत आहेत.

२०२५ पर्यंत १ हजार इन्शुप्रेन्यर्स घडवण्याचा संजय तारी यांचा संकल्प आहे. संजय तारी ‘एसेन्सुअसर फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा पुरवतात. तसेच ते ‘ए स्पेसेस’ नावाने एक नवीन सेगमेन्ट सुरू करत आहेत. यामध्ये रिअल इस्टेट खरेदी, विक्री इत्यादी सर्व व्यवहार केले जाणार आहेत.

सामाजिक बांधिलकी म्हणून संजय तारी हे रोटरी क्लबफचे सक्रिय सभासद आहेत. शिवाय त्यांना व्यक्तिगत पातळीवर एक शाळा सुरू करून कमी मार्क मिळणार्‍या विद्यार्थ्यांना तिथे शिकवायचं आहे. कष्टाच्या बळावर माणसाला हवं ते यश मिळवता येतं, हाच संदेश आपल्याला संजय तारी यांच्या या प्रवासातून मिळतो.

संपर्क : संजय तारी – ९८२१६४९०७०


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!