Advertisement
या विद्यार्थ्याने सुरू केले शैक्षणिक सोशल नेटवर्क
कथा उद्योजकांच्या

या विद्यार्थ्याने सुरू केले शैक्षणिक सोशल नेटवर्क

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

स्टडीदुनिया डॉट कॉम ही एक शैक्षणिक वेबसाइट आहे. यात सर्व शैक्षणिक स्टडी मटेरिअल उपलब्ध आहे. IIT-JEE, AIPMT, CA, CPT तसेच अनेक स्पर्धा परीक्षांसाठी Study Material, Test Series, Papers, MCQs इत्यादी मोफत उपलब्ध आहेत.

मी दहावी पास झाल्यावर सीए बनण्याच्या ध्येयानं पुण्यात येऊन वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला; पण सीए संदर्भात इंटरनेटच्या महाजालात अभ्यासक्रमाची माहिती मिळवत असताना एक गोष्ट लक्षात आली. विद्यार्थ्यांना जे हवंय ते मोफत उपलब्धच नाहीय. आज जिथं शैक्षणिक सर्वच गोष्टींसाठी इंटरनेट हा एकमेव पर्याय म्हणून पाहिला जात असताना सीएसारख्या अभ्यासक्रमाबाबतचे स्टडी मटेरियल अगदी विखुरलेल्या अवस्थेत उपलब्ध आहे. काही ठिकाणी ते मिळते, पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत इंटरनेट पोहोचलं, पण आता त्यांना ही माहिती आणि स्टडी मटेरियल हवं असल्यास त्यासाठी पैसे मोजणं परवडणारं नव्हतं.

Advertisement
ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही अकरावीत असताना १५ फेब्रुवारी २०१६ रोजी ‘स्टडीदुनिया’ची सुरुवात केली.

अनेक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आपले करीअर घडवायचे असते, मात्र त्यासाठी लागणार्‍या नोट्स असोत की क्‍लासेस यांची फी खूप महाग असते. शहरी भागाचे हे चित्र असताना ग्रामीण भागात तर उच्च दर्जाचे क्लासेस, नोट्स, पुस्तके यांचा  पूर्णत: अभावच असतो. हीच उणीव भरून काढण्यासाठी, शैक्षणिक माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व प्रमुख अभ्यासक्रमांची मोफत माहिती, स्टडी नोट्स, मार्गदर्शक लेख, प्रश्न संच याने परिपूर्ण असलेले स्टडीदुनिया हे अॅीप बनवले.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

मी कृषिकेश सध्या पुण्यात बृहन्महाराष्ट्र कॉलेजमध्ये शिकत आहे. मी लहानपणापासूनच इंटरनेटवर बराच वेळ घालवायचो. अनेक नवनवीन प्रोग्राम डाऊनलोड करणं, त्याची कार्यपद्धती पाहणं हा माझा छंद बनला होता. वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाणं. संपूर्ण माहितीचं विश्वच माझ्यासाठी इंटरनेटनं खुलं केलं. मज्जा येत होती. नववीलाच असताना आपण अशा वेबसाइट तयार करू शकतो असं वाटू लागलं. यातूनच ‘बझकिडा डॉट कॉम’ आणि ‘अहिराणी जोक्स’ अशा दोन वेबसाइट्स मी बनवल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणून आत्मविश्वास वाढला.

कृषिकेश खैरनार

कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे अजून मी स्टार्टअप म्हणून नोंदणी केलेली नाहीय. मात्र विद्यार्थी असल्यामुळे शैक्षणिक स्टार्टअप चालवणे बरेच सोपे जाते. शिक्षणाव्यतिरिक्त इतर कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त उर्वरित वेळ स्टडीदुनियासाठी देता येतो.

स्टडीदुनियावर सध्या सर्व महत्त्वाचे कोर्सेस उपलब्ध असून भविष्यात आणखी कोर्सेस वाढवायचे आहेत. तसेच इतर प्रादेशिक भाषेतसुद्धा स्टडी मटेरिअल उपलब्ध करून द्यायचे आहे. त्याने अनेक विद्यार्थी स्टडीदुनियाशी जोडले जातील.

आमची एकूण चार लोकांची टीम आहे. यात मी, एक अँड्रॉइड डेव्हलपर, एक वेब डेव्हलपर आणि एक कंटेंट क्रिएटर आहोत. फंडिंगच्या दृष्टीने आम्ही अद्याप तरी विचार केला नाहीय. सध्या तरी बूटस्ट्रॅपिंग करत आहोत. भविष्यात इनक्यूबेटर सपोर्ट किंवा एंजल राऊंडमधून फंडिंग मिळवायची इच्छा आहे.

ई-लर्निंगच्या माध्यमातून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षित करून शिक्षण क्षेत्रात स्टडीदुनियाचं एक अग्रगण्य नाव निर्माण करावं, असे प्रयत्न आहेत.

– कृषिकेश खैरनार
९४०४५३२७८२


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!