कथा उद्योजकांच्या

सुहास गोपीनाथ : जगातला सर्वात लहान वयाचा CEO

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी सुहास गोपीनाथने Globals Inc. ची स्थापना केली त्यावेळी तो केवळ चौदा वर्षांचा होता. त्यावेळी त्यालाही याची कल्पना नव्हती की तो जगातला सर्वात लहान Chief Executive Officer (CEO) झाला आहे. आपल्या कामाची सुरुवात सुहासने एखाद्या आलिशान ऑफिसमध्ये बसून नव्हे तर ‘बंगलुरु’मधील एका छोट्या Cyber-Café तून केली होती. आज हीच कंपनी एक Multi-million dollar company आहे आणि त्याचं काम USA, UK, Spain, Australia इ. देशांतून चालतं. काहीजण वयाच्या पंचवीशीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करण्यातच गुंतलेले असतात. पण गोपीनाथची गोष्टच निराळी.

सुहास गोपीनाथ World Bank च्या ICT Advisory Council चे बोर्ड मेंबर आहेत.
सुहास गोपीनाथ

२००७ मध्ये त्यांना European parliament and International Association for Human Values ने “Young Achiever Award” ने सन्मानित केले. World Economic Forum ने त्यांना ‘Young Global Leaders’ for 2008-2009 या Award ने सन्मानित केलं. अशा या यशस्वी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचा प्रवास….


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


मी एका मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलो.

माझे वडील सैन्यात वैज्ञानिक होते. मी बंगळुरुला Air Force शाळेत शिकत होतो. त्यावेळी आमच्या घरी कॉम्प्युटर नव्हता आणि कॉम्प्युटर येणं आमच्या आवाक्यातही नव्हतं. मी जवळच आमच्या घराच्या शेजारी एक Cyber-Cafe शोधला. त्यावेळी मला महिन्याला फक्त १५ रु पॉकेट मनी म्हणून मिळायचे. एवढ्या पैशात दररोज Internet surfing करणं शक्य नव्हतं. काय करावं, याचा मी विचार करत होतो.

सायबर कॅफे दुपारी १ ते ४ बंद असते हे माझ्या लक्षात आलं. मी दुकानदारासोबत एक deal केली. दुपारी मी तुमचं दुकान सांभाळेन त्याबदल्यात तुम्ही मला दुकानात मोफत Internet Surfing करण्याची मुभा द्या. हीच माझ्या आयुष्यातील पहिली व्यावसायिक deal होती. ती यशस्वीही ठरली.

आता माझ्याकडे कॉम्प्युटर तर होतेच शिवाय Internet सुद्धा वापरता येत होतं.

हळूहळू मी Website बनवायला सुरुवात केली आणि काही काळातच माझं काम हे माझा ‘ध्यास’ झालं. इंटरनेटवर काही Markat place असतात. तिथे मी Website Developer म्हणून माझं नाव नोंदवलं. मला माझी पहिली Website विनामूल्य बनवावी लागली कारण माझ्याकडे कोणाचाही वशिला नव्हता. ती वेबसाईट न्यूयॉर्कमधल्या एका कंपनीची होती.

माझी पहिली कमाई १०० डॉलर होती. त्यावेळी माझं वय १३ वर्ष होते. माझं बँक अकाऊंट नसल्यामुळे मला वडिलांना हे सर्व सांगावे लागलं. मला पैशाचं म्हणावं तेवढं आकर्षण नव्हतं, पण माझं काम हा माझा ध्यास होता. त्या काळात मी coolhindustan.com नावाचं एक पोर्टल सुरू केलं होतं. त्यावर अनिवासी भारतीयांना focused केलं होतं, पण ते पोर्टल बनवण्यामागे माझे skills लोकांना दाखवणं हा माझा उद्देश होता आणि तो साध्य झाला. वेगवेगळ्या कंपन्या मी त्यांच्या Web Developer व्हावं म्हणून प्रयत्न करू लागल्या.

मी चौदा वर्षांचा असताना…

अमेरिकेच्या Network Solutions या कंपनीने मला पार्ट-टाईम जॉबची ऑफर दिली. US मध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठीही ते तयार होते. पण मी त्यांची Offer नाकारली. कारण याच काळात मी बिल गेट्स यांच्या Microsoft कंपनीच्या सुरुवातीविषयी ऐकले आणि मी गांभीर्याने विचार करू लागलो. त्यावेळी माझं वय लहान असल्यामुळे अनेक अमेरिकन कंपन्या माझ्या Service विषयी साशंक होत्या. माझं वय आणि क्षमता यांची तुलना करून त्या मला नाकारतही होत्या आणि म्हणूनच मी स्वत:ची कंपनी सुरू करण्याविषयी मनाशी निर्णय पक्का केला. मी ठाम निश्चय केला जेव्हा मी माझी कंपनी सुरू करेन त्यावेळी मी तरुणांना संधी देईन आणि त्यांचे Marks व शैक्षणिक पात्रता याविषयी विचारणा करणार नाही. आजही या नियमांचे मी माझ्या कंपनीत पालन करतो.

नववीच्या शालेय सुट्टी संपत आल्या होत्या…

त्या दरम्यानच मी माझी कंपनी सुरू केली. मला माझ्या कंपनीचं नाव Global किंवा Global Solutions असं हवं होतं पण दोनही उपलब्ध नसल्यामुळे Globals हे नाव ठेवावं लागलं.

भारतात १८ वर्षापेक्षा कमी वय असणारी व्यक्ती कंपनी सुरू करू शकत नाही. पण US मध्ये १५ मिनिटात कंपनी सुरू करता येते. त्यामुळे मी माझी कंपनी US मध्ये Register केली. मी कंपनीचा Owner & CEO झालो आणि अमेरिकेतील एका युनिव्हर्सिटीत शिकणारा माझा मित्र Board Member झाला. मी खूपच आनंदात होतो कारण हेच तर मला हवं होतं. आणि त्या क्षणापासून मी स्वत:च्या कंपनीला Microsoft सारखं मोठं बनवण्याचं स्वप्न पाहू लागलो. पहिल्या वर्षी Global Inc. ची उलाढाल १ लाख होती पण दुसऱ्यावर्षी तीच ५ लाखांवर गेली.

या सर्व धावपळीत मी शाळेत एकदा गणितात नापास झालो. त्यापूर्वी मी कधीही नापास नसल्यामुळे शिक्षकांनी आईला बोलावून तक्रार केली. आईने माझ्याकडून अभ्यासावरच लक्ष देईन अशी शपथ घेतली. मी माझ्या आईला Bill Gates याचं उदा. देऊन मी शिक्षण पूर्ण करावं अशी गळ घालू नको असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची आणि तुझी कुंडली एक समान नाही असं म्हणून आईने मला दटावलं.

‘व्यवसाय’ म्हणजे जणू पाप असे समजणाऱ्या कुटुंबाचा मी सदस्य.

आईचं मन राखण्यासाठी चार महिने मी माझ्या कंपनीसाठी काहीच काम केलं नाही. अभ्यास करून First Class मध्ये पास झालो.

मी १७ वर्षांचा होईपर्यंत कंपनीविषयी घरात कोणालाच काही सांगितले नव्हतं. त्यांना मी freelancer करतो असंच वाटत होतं. Online-shopping, e-commerce यांच्याशी संबंधित काम करत होतो. कधी कधी US मध्ये पार्टटाईम Programmersनाही काम देत होतो. एवढं सगळं होतं पण आमचे कुठेही ऑफिस नव्हते. Europe मध्ये त्यावेळी IT क्षेत्रात खूप संधी होत्या. मी एका Spain च्या कंपनीशी संपर्क साधला असता भारतीयांना Spanish येत नाही असं सांगून त्यांनी काम नाकारलं.

उद्योजकाला नकार चालत नाही. मी Spanish University तून ५ interns ना निवडलं आणि कामाप्रमाणे Pay करण्याच्या बोलीवर काम सुरू केलं. त्यांनी आमच्यासाठी नंतर काही Project सुद्धा केले. आणि मी त्यावेळी Spain मध्ये ऑफिस सुरू करण्याचे निश्चित केले. हाच formula इटलीतही वापरला.

एव्हाना वेगवेगळी वृत्तपत्र आणि वाहिन्या माझी दखल घेऊ लागले होते.

पण मला यात काही वेगळेपण वाटत नव्हतं. कारण कंपनी सुरू करणं हा माझा ध्यास होता. प्रकाशझोतात येणं याविषयी मी कधी विचारही केला नव्हता. बारावीनंतर मी Engineering College मध्ये प्रवेशही घेतला. वयाच्या १८व्या वर्षी मी माझी कंपनी भारतात Globals या नावाने नोंदवली आणि ४ जणांना कामासाठी भरती केलं. मी माझं ऑफीस त्या कॅफेच्या बाजूलाच सुरू केलं. पण तोपर्यंत ते Cyber बंद करून ती व्यक्ती नोकरी करू लागली होती. मी त्यांना नेहमी म्हणायचो ‘मला तुम्ही उद्योजक बनवलंत आणि स्वत: नोकरी करताय?’

डॉ. अब्दुल कलाम यांना भेटलो तेव्हा…

सुहास गोपीनाथ अब्दुल कलाम यांसोबत

केवळ १५ मिनिटांची वेळ मला मिळाली होती. परंतु आमची ती मुलाखत सुमारे एक ते दीड तास चालली. माझ्यासाठी ही भेट खूपच अनमोल आहे. डॉ. कलामांशी बोलताना सुरुवातीला औपचारिकता होती, परंतु बोलण्याबोलण्यातून त्यामध्ये खूपच खेळीमेळीचं बोलणं झालं. अशाच प्रकारे मी वर्ल्ड बँकेने मला मिटिंगसाठी बोलवले त्यावेळी खूप आनंदी होतो. मी त्यांचा बोर्ड मेंबर झालो तो क्षण ही अविस्मरणीय आहे. जगातील मोठमोठ्या कंपनींचे सी.इ.ओ वर्ल्ड बँकेचे मेंबर आहेत त्यांच्यासोबत माझी ही निवड झाली होती.

माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक अनुभव मी घेतलेत यापुढेही मला आव्हानात्मक गोष्टी खुणावतात. माझ काम हेच माझे ध्येय आहे.

– टीम स्मार्ट उद्योजक

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!