लॉकडाउनमध्ये क्लासेस बंद पडले तेव्हा सुरू केला हा स्टार्टअप

मी आणि माझे पती आम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत. कोचिंग क्लासेस क्षेत्रात अठरा वर्षांचा अनुभव आमच्या गाठीशी आहे, परंतु अचानक कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने या क्षेत्राला पहिल्यांदाच ब्रेक लागला. आम्ही निराश झालो. शाळा बंद, कोचिंग क्लासेस बंद त्यामुळे आर्थिक संकट उभे ठाकले.

घराचे आणि इतर इएमआय कसे भरावे, हा प्रश्न उभा राहिला. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव किती वर्षे चालेल याचीच भीती जास्त. ऑनलाइन वगैरे ठीक आहे, पण सगळ्या क्षेत्राला धक्का लागल्याने सगळ्यांची आर्थिक परिस्थिती डगमगलीय.

कोणाची नोकरी गेली, कोणाचा व्यवसाय बुडाला किंवा त्यात मंदी आली, ज्यांची नोकरी आहे त्यांचे पगार कमी. अशा परिस्थितीत पालक आपल्या पाल्याला कोचिंग क्लासेसला का पाठवतील? हाही प्रश्न पुढे होताच.

म्हणतात ना, “संधी ही संकटात सापडते” त्याप्रमाणे आम्ही विचार केला या परिस्थितीत इतर कोचिंग क्लासेसवरही परिणाम झाला असेल. त्यामुळे शिक्षकांना असे कोणते प्रॉडक्ट देता येईल की जेणेकरून त्यांचे विद्यार्थी वाढतील आणि त्यांनाही फायदा होईल. आम्ही लॉकडाउनच्या कालावधीत (एप्रिल-मे २०२०) दोघांनी मिळून आठवी ते दहावी स्वतःचे chapter wise paper set (सराव संच) काढले.

आम्ही ते टाईप करून ते PDF format मध्ये तयार केले. त्याची मार्केटिंग करण्यासाठी आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम जाहिरातींचा वापर केला. या सेटची किंमत फारच कमी ठेवली. त्यामुळे सुरुवातीलाच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षकांचे चांगले अभिप्राय मिळत गेले आणि त्याबरोबर आमचे उत्पन्नही वाढत गेले.

काहीतरी नवीन स्टार्टअप केल्याचा आनंद झाला. त्याहीपेक्षा तो यशस्वी झाल्याचा आनंद खूपच मोठा होता. आमच्या आशा पल्लवित झाल्या. आम्ही मागे वळून पाहिले नाही. एका प्रॉडक्टने चालू केलेला हा व्यवसाय आता १५ प्रॉडक्टपर्यंत वाढला आहे. अजून काही प्रॉडक्टवर काम चालू आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात आमचे ५,५०० पेक्षा जास्त ग्राहक आहेत.

प्रॉडक्टविषयी माहिती : आम्ही हे सराव संच संपूर्ण महाराष्ट्रात पुरवतो. हे प्रॉडक्ट डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहचवतो. एका क्लिकवर PDF स्वरूपात ग्राहकाला ते उपलब्ध होतात.

तुमची उत्पादने व सेवा : आम्ही इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी Practice Paper sets (सराव संच) आणि इतर पूरक संच पुरवतो. हे साहित्य आम्ही जास्त करून B-2-B पद्धतीने विकतो.

सुजाता सुधीर शिगवण

कंपनीचे नाव : समर्थ टेस्ट सिरीज
आपला हुद्दा : Director
व्यवसायातील अनुभव : 18 वर्षे
विद्यमान जिल्हा : मुंबई

व्यवसायाचा पत्ता : H.O. : 15/702, Agarwal Lifestyle, Avenue B1, Global City, Virar West – 401303.
शाखा : Narwar Nagar, Road no. 5, Near Manoj Dairy, Jogeshwari (East) – 400060.
ई-मेल : samarthdigitalmarketing@gmail.com
मोबाइल : 7066062963

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?